# नवीन वर्षासाठी पुण्याजवळची १० ठिकाणं

New Year places near Pune Information in Marathi

Author: Vivek Kadam (विवेक कदम), Content Manager, Webcof
Source: https://marathitravel.com/new-year-places-near-pune/
Updated: 2026-11-10

३१ डिसेंबर आणि नवीन वर्षासाठी पुण्याजवळची १० ठिकाणं: पवना कॅम्पिंग, महाबळेश्वर, पाचगणी, कोलाड, राजमाची, दिवेआगर, भंडारदरा. अंतर, खर्च, नियम आणि बुकिंग टिप्स.

३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला पुण्याच्या आसपास कुठे जायचं? खाली १० ठिकाणं: कॅम्पिंग, हिल स्टेशन, बीच आणि शांत गावं. प्रत्येक ठिकाणाची पूर्ण माहिती नावावर क्लिक करून मिळेल.

> **नवीन वर्षाच्या आधी हे लक्षात ठेवा:** ३१ डिसेंबर २०२५ ला पुणे जिल्ह्यातल्या किल्ल्यांवर रात्री राहायला बंदी होती, आणि लोणावळ्याचे टायगर पॉइंट-लायन्स पॉइंट ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला बंद होते. या वर्षीचे आदेश साधारण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येतात; निघण्याआधी तपासा. या आठवड्यात राहायचे दर ३-४ पट होतात, म्हणून बुकिंग आत्ताच करा.

### १. [पवना लेक कॅम्पिंग](/pawna-lake-camping/)

धरणाकाठी तंबू, शेकोटी, बार्बेक्यू आणि समोर तुंग-तिकोना. पुण्याहून सगळ्यात लोकप्रिय न्यू इयर कॅम्पिंग. ३१ डिसेंबरला दर वाढतात आणि जागा लवकर भरतात.

**पुण्याहून साधारण ५५ किमी · कॅम्प ₹१,५००-३,००० माणशी (३१ डिसेंबरला)**

### २. [महाबळेश्वर ट्रिप प्लॅन आणि खर्च](/mahabaleshwar-trip-cost-from-pune/)

थंडी, स्ट्रॉबेरी आणि पॉइंट्स. पण ३१ डिसेंबरला महाबळेश्वरमध्ये प्रचंड गर्दी आणि ट्रॅफिक असतं; शक्य असेल तर २९-३० ला पोचा आणि १ तारखेला दुपारी परता.

**पुण्याहून साधारण १२० किमी · हॉटेल ₹३,०००-१०,०००+ रात्रीला**

### ३. [पाचगणी](/panchgani-information-in-marathi/)

महाबळेश्वरपेक्षा थोडी कमी गर्दी, टेबल लँडवरून सूर्यास्त आणि थंडीतली सकाळ.

**पुण्याहून साधारण १०० किमी**

### ४. [कोलाड रिव्हर राफ्टिंग](/kolad-river-rafting/)

दिवसा कुंडलिकेवर राफ्टिंग आणि रात्री नदीकाठचे कॅम्प किंवा रिसॉर्ट. मित्रांच्या ग्रुपसाठी उत्तम.

**पुण्याहून साधारण १२० किमी · राफ्टिंग ₹९००-१,७००**

### ५. [राजमाची किल्ला](/rajmachi-fort/)

गाडी जात नाही अशा गावात, घरगुती जेवण आणि शांत रात्र. गर्दीपासून दूर नवीन वर्ष हवं असेल तर. (गडावर नाही, गावात मुक्काम.)

**लोणावळ्याहून साधारण १५ किमी (चालत किंवा जीपने)**

### ६. [दिवेआगर बीच](/diveagar-beach-information-in-marathi/)

स्वच्छ किनारा, सुपारीच्या बागा आणि घरगुती मुक्काम. अलिबाग-गोव्यापेक्षा शांत.

**पुण्याहून साधारण १७० किमी**

### ७. [हरिहरेश्वर](/harihareshwar-beach/)

मंदिर, किनारा आणि खडकांवरून सूर्यास्त. फॅमिलीसाठी चांगलं.

**पुण्याहून साधारण १७० किमी**

### ८. [भंडारदरा](/bhandardara-information-in-marathi/)

आर्थर लेकच्या काठावर कॅम्प, थंडी आणि ताऱ्यांनी भरलेलं आकाश. सकाळी रंधा धबधबा आणि अम्ब्रेला फॉल्स.

**पुण्याहून साधारण १७०-१८० किमी**

### ९. [पानशेत धरण](/panshet-dam/)

लांब जायचं नसेल तर: धरणाकाठी फार्महाऊस किंवा कॅम्प, आणि १ जानेवारीला सकाळी परत.

**पुण्याहून साधारण ४५ किमी**

### १०. [सिंहगड किल्ला](/sinhagad-fort/)

१ जानेवारीची सुरुवात गडावरून सूर्योदय बघून. पहाटे लवकर गेलात तर पिठलं-भाकरी आणि ताक. (रात्री गडावर राहायला परवानगी नसते.)

**पुण्याहून साधारण ३५ किमी · सकाळी ६ च्या आसपास पोचा**


## या चुका टाळा

- **३१ च्या संध्याकाळी निघणं:** एक्सप्रेसवे, महाबळेश्वर घाट आणि ताम्हिणीत रात्रभर ट्रॅफिक. आदल्या दिवशी किंवा पहाटे निघा.
- **दारू पिऊन गाडी:** पोलिसांची तपासणी असते, आणि घाटात जीवघेणं.
- **किल्ल्यावर रात्री मुक्काम:** गेल्या वर्षी बंदी होती. गावात किंवा कॅम्पमध्ये राहा.
- **ऐनवेळी बुकिंग:** दर ३-४ पट आणि जागा मिळत नाहीत.

## जवळपास अजून काय बघायचं

- **[मुंबईजवळची नवीन वर्षाची ठिकाणं](/new-year-places-near-mumbai/)**
- **[हिवाळ्यात फिरायची ठिकाणं](/winter-places-in-maharashtra/)**
- **[पुण्याजवळ फिरायला ठिकाणं](/places-near-pune/)**

## लोक नेहमी विचारतात

### पुण्याजवळ ३१ डिसेंबरला कुठे जायचं?

कॅम्पिंगसाठी पवना धरण, भंडारदरा आणि कोलाड; थंडीसाठी महाबळेश्वर-पाचगणी; बीचसाठी दिवेआगर आणि हरिहरेश्वर; शांततेसाठी राजमाची गाव.

### पुण्याजवळ नवीन वर्षासाठी कॅम्पिंग कुठे?

पवना धरणाकाठी सगळ्यात जास्त कॅम्प आहेत (पुण्याहून साधारण ५५ किमी). भंडारदरा आणि कोलाडलाही नदी-धरणाकाठी कॅम्प असतात. ३१ डिसेंबरला दर जास्त असतात आणि जागा लवकर भरतात.

### ३१ डिसेंबरला किल्ल्यावर राहता येतं का?

३१ डिसेंबर २०२५ ला पुणे जिल्ह्यातल्या किल्ल्यांवर रात्री राहायला बंदी होती. या वर्षीचा आदेश डिसेंबरच्या शेवटी येईल; तोपर्यंत गडाऐवजी पायथ्याच्या गावात किंवा कॅम्पमध्ये राहायचं ठरवा.

### नवीन वर्षाला महाबळेश्वरला जावं का?

जाऊ शकता, पण ३१ डिसेंबरला प्रचंड गर्दी, ट्रॅफिक आणि दर ३-४ पट असतात. शांत हवं असेल तर पाचगणी, राजमाची किंवा दिवेआगर निवडा.

## स्रोत

- [Maharashtra Tourism](https://www.maharashtratourism.gov.in/)
- [Pune Rural Police](https://puneruralpolice.gov.in/)
