किल्ले सिंहगड | सिंहगडाची माहिती

सह्याद्री पर्वत रांगेमद्धे वसलेला सिंहगड हा किल्ला पुण्यापासून सुमारे ४० किलोमीटरच्या अंतरावर आहे. स्वराज्याचे सुभेदार तानाजी मालुसरे यांचे स्मारक, लोकमान्य टिळक, छत्रपती राजाराम महाराज यांचे स्मारक, दारुगोळ्याचे कोठार, झुंजार बुरूज इत्यादी ठिकाणे पाहण्यासारखे आहेत. 

सिंहगड च्या पायथ्याच्या गावाला कसे जावे?

डोणजे हे गाव सिंहगडच्या पायथ्याशी आहे. पुण्यापासून डोणजे हे गाव २५.२ किलोमीटर अंतरावर आहे. खाजगी वाहनाने आपण डोणजे या गावाला जावू शकतो. 

टॅक्सी 

आपण टॅक्सी ने सुद्धा सिंहगडावरती जावू शकतो. पुण्यापासून सिंहगड हा सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे. या सिंहगड किल्ल्यावरती पार्किंगची सुद्धा सोय आहे. परंतु पार्किंगसाठी वनविभाग आपल्याकडून दुचाकीसाठी २० रुपये तर चार चाकी साठी ५० रुपये शुल्क घेते. 

महाराष्ट्र शासनाची बस 

महाराष्ट्र शासनाच्या बस ने सुद्धा आपण सिंहगडावरती जावू शकतो. पुण्याच्या बस स्टँडच्या ५० नंबरच्या प्लॅटफॉर्म वर सिंहगड गडावर जाण्यासाठी बस थांबते. बसची सुविधा कोंढणपुर या गावापर्यंतच आहे, तेथून खाजगी वाहनाने गडाच्या पायथ्याशी म्हणजेच कल्याण किंवा डोणजे या गावी उतरून आपण गडावर प्रवेश करू शकतो.

विमानाने 

पुण्यामधील विमानतळावर उतरून आपण टॅक्सीने किंवा खाजगी वाहनाने स्वारगेटला  जावावे.  तेथून ५० 

नंबरच्या प्लॅटफॉर्म वर सिंहगड गडावर जाण्यासाठी बस थांबते. या बसने आपण सिंहगडाच्या पायथ्या कल्याण गावा  पर्यंत जावू शकतो. 

सिंहगडाच्या पायथ्या पासून गडापर्यंत जाणाऱ्या वाटा

पुणे ते डोणजे फाटा 

सिंहगडाच्या पायथ्याला असणाऱ्या डोणजे या गावातून हि वाट सुरू होते. या मार्गावरून सिंहगड या किल्ल्यावरती जाण्यासाठी २ ते ३ तास लागतात. या पाय वाटेवरून जात असताना आजूबाजूचे दऱ्या, धबधबे आणि टेकड्या तुमच्या नजरेस येतात. 

कात्रज ते सिंहगड 

हि पायवाट कात्रजच्या बोगद्यापासून सुरू होते. हि पायवाट खूप कठीण आहे. 

गाडीचा रस्ता 

सिंहगड या किल्ल्यावर जाण्यासाठी एक गाडीचा रस्ता सुद्धा आहे. ट्रेकिंग टाळण्यासाठी आपण या रस्ताचा वापर करतो. 

सिंहगड किल्ल्यावरती पाहण्यासारखे ठिकाण

खांड कडा 

खांड कडा पाहण्यासाठी तुम्हाला पुणे दरवाज्यातून प्रवेश करावा लागतो. या खांड कडेवरती बुरूज आणि तटबंदी आहेत. या खांड कडेच्या समोरच कल्याण दरवाजा आहे. 

दारुगोळ्याचे कोठार 

पूर्वी तोफखाण्यासाठी दारुगोळा लागत असे. हा दारूगोळा साठवण्यासाठी जी जागा वापरली जात होते त्याला दारुगोळ्याचे कोठार म्हणतात. 

छत्रपती राजाराम महाराज यांचे स्मारक 

स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी याच सिंहगडावरती आहे. अकरा वर्ष मुघलांशी लढवून जीवनातले शेवटचे दिवस राजाराम महाराजांनी या सिंहगड किल्ल्यावर घालवले. 

लोकमान्य टिळक यांचे घर 

लोकमान्य  टिळकांना काही ग्रंथ लिहायचे होते, त्यासाठी त्यांनी या सिंहगडाची निवड केली. या सिंहगडावरील टिळक यांचे  घर त्यांनी रामलाल नाईक यांच्याकडून विकत घेतले होते. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची भेट याच किल्ल्यावरती झाली होती. 

सुभेदार तानाजी मालुसरे यांचे स्मारक 

सुभेदार तानाजी मालुसरे यांनी सिंहगड हा किल्ला मुघलांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना जिंकून दिला. या लढाईमध्ये सुभेदार तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले, यांच्या स्मरणार्थ महाराजांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांचे स्मारक बांधले होते. 

झुंजार बुरूज

या सिंहगडच्या दक्षिण टोकाला झुंजार बुरूज असे म्हणतात. 

डोणगिरीचा बुरूज उर्फ तानाजी कडा 

याच बुरुजावरून तानाजी मालुसरे आपल्या मावळ्या सह किल्ल्यावर चढले होते. 

सिंहगडावरील मंदिरे 

कोंढाणेश्वर मंदिर 

कोंढाणेश्वर मंदिर हे मंदिर यादव कालीन असून ते यादवांचे कुलदेवत आहे. 

अमृतेश्वर मंदिर 

हे मंदिर भेरवाचे असून या मंदिरात दोन मूर्ती आहेत. यादवांच्या आधी कोळयांची वस्ती या सिंहगडावरती होती. 

या किल्ल्याचे नाव सिंहगड कसे पडले?

स्वराज्याचे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा याचे लग्न ठरले होते. तर या लग्नाची पत्रिका देण्यासाठी रायगडावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कडे गेले होते. स्वराज्याचे महाराज छत्रपती शिवाजी महाराज सिंहगड लढाईच्या योजनेमद्धे व्यस्त आहेत. हि माहिती सुभेदार तानाजी मालुसरे यांना समजताच त्यांनी स्वराज्याच्या महाराजांची भेट घेतली आणि या सिंहगड लढाईचे नेतृत्व मला द्यावे अशी विनंती केली. या लढाई मध्ये सुभेदार यांना वीरमरण आले. हि माहिती महाराजांना समजताच “गड आला पण  सिंह गेला” असे वाक्य उदगारले. 

सिंहगडावरील उपलब्ध सोयी

राहण्याची सोय

गडावर राहण्याची सोय नाही.

जेवणाची सोय

गडावरील हॉटेल्स यामध्ये जेवणाची सोय होते.

पाण्याची सोय

देवटाक्यांमधील पाणी बारा महिने पुरते.

जाण्यासाठी लागणारा वेळ

पायथ्या पासून २ ते ३ तास लागतात.

Scroll to Top