बोर्डी बीच | Information Bordi Beach

महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सागरीभागात, मुंबईपासून सुमारे १४० किमी अंतरावर असलेला बोर्डी समुद्र किनारा हा निसर्गप्रेमी आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. गजबजलेल्या पर्यटनस्थळांपासून दूर, साधेपणातलं सौंदर्य जपणारा हा किनारा आपल्याला समुद्राच्या लाटांसोबत मन:शांतीचा अनुभव देतो.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वसलेले बोर्डी हे छोटेसे पण निसर्गरम्य गाव आहे. स्वच्छ वाळूचा किनारा, कॅसुरिना (सुरू) झाडांची रांग, चीकूच्या बागा आणि शांत वातावरण यामुळे बोर्डीची ओळख ‘महाराष्ट्राचे मिनी गोवा’ अशीही केली जाते. पण इथे गोव्यासारखी गर्दी नाही, तर निवांतपणाचा खरा आनंद आहे.

Features of Bordi Beach | बोर्डी समुद्र किनाऱ्याचे वैशिष्ट्य

बोर्डी समुद्रकिनारा साधारण ७-८ किमी लांब पसरलेला आहे. येथील वाळू काळसर-तपकिरी असून चालण्यासाठी मऊ आणि सुरक्षित आहे. समुद्र इथे तुलनेने शांत असतो, त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी समुद्रकिनारी फेरफटका मारणे हा एक अप्रतिम अनुभव असतो.

सूर्योदयाच्या वेळी समुद्राच्या पाण्यावर पडणारी सोनेरी किरणे आणि सूर्यास्ताच्या वेळी लालसर आकाशाचा रंग मन मोहून टाकतो. शहरातील धावपळीपासून दूर, इथे बसून फक्त लाटांचा आवाज ऐकणेही मनाला समाधान देऊन जाते.

Nature and environment | निसर्ग आणि पर्यावरण

बोर्डीची खरी ओळख म्हणजे इथला स्वच्छ, प्रदूषणमुक्त परिसर. किनाऱ्यालगत उंच सुरूच्या झाडांची रांग आहे, जी समुद्राच्या वाऱ्याला सुसह्य बनवते.

या परिसरात मोठ्या प्रमाणावर चीकूच्या बागा आहेत. डहाणू- बोर्डी परिसर हा चीकू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. चीकू महोत्सव हा इथला एक विशेष आकर्षण ठरतो. स्थानिक शेतकरी आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करतात. त्यामुळे पर्यटकांना स्थानिक संस्कृतीचा जवळून अनुभव घेता येतो.

Tourism and Activities | पर्यटन आणि उपक्रम

बोर्डी हे मुख्यतः शांत पर्यटनासाठी ओळखले जाते, परंतु येथे काही रोमांचक उपक्रमांचाही आनंद घेता येतो. 

घोडेस्वारी, समुद्रकिनारी सायकलिंग, बीच कॅम्पिंग, स्थानिक होमस्टेचा अनुभव इत्यादी गोष्टींचा आंनद घेता येतो. 

Trekking in the nearby mountains | जवळच्या डोंगररांगांमध्ये ट्रेकिंग

पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन देणारे हे ठिकाण असल्यामुळे इथे मोठ्या आवाजातील पार्ट्या किंवा जल्लोषाला मर्यादा आहेत. त्यामुळे कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

खाद्य संस्कृती

आपण जेव्हा बोरडी बीच वरती जातो तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक पदार्थांचा सुद्धा आनंद घेतला पाहिजे, जसे की चिकू पासून तयार केलेले खाद्य पदार्थ यांचा समावेश होतो.

चिकू सरबत आणि आईसक्रीम

ताज्या चीकूपासून बनवलेले सरबत आणि आइसक्रीम येथे खूप प्रसिद्ध आहे.

पारसी पदार्थ

पारशी समाजाच्या पारंपरिक पदार्थांची चव चाखण्यासाठी बोर्डी हे उत्तम ठिकाण आहे. धनसाक, पॅटिस, आणि इतर पारंपरिक पदार्थ येथे सहज मिळतात.

मिठाई

चीकूपासून तयार केलेली बर्फी आणि लाडू हे स्थानिक खास पदार्थ आहेत.
फिश करी-भात : कोकणातील पारंपरिक फिश करी आणि गरम भात पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

फिश करी-भात

कोकणातील पारंपरिक फिश करी आणि गरम भात पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

वॉटर आणि ऍडव्हेंचर स्पोर्ट्स

बोर्डी समुद्रकिनारा शांत असला तरी येथे काही साहसी आणि पाण्याचे खेळ करता येतात.

बोटिंग (नौकाविहार)

शांत समुद्राच्या पाण्यात बोट राईडचा अनुभव आनंददायी ठरतो.

सायकल राईड

बोर्डीच्या चीकूच्या बागांतून सायकलिंग करणं हा एक वेगळाच अनुभव आहे.

मंदिरे आणि धार्मिक स्थळे

बोर्डी गाव आणि परिसर धार्मिक महत्त्वाच्या स्थळांसाठीही प्रसिद्ध आहे.

झांजरी मंदिर

हे स्थानिकांचे श्रद्धास्थान असून, शांत वातावरणात भक्ती अनुभवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

अश्वत्थामन मंदिर

पौराणिक कथा असलेले हे मंदिर स्थानिकांसाठी खूप महत्त्वाचे आहे.

पारशी अग्नि मंदिर

पारशी धर्मातील हे पवित्र स्थान धार्मिक पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे.

बोर्डी बीचवर किती गर्दी असते?

बोरडी बीच कमी गर्दी साठी प्रसिद्ध आहे.

बोर्डी बीच स्वच्छ समुद्रकिनारा आहे का?

शांत आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्या साठीच बोर्डी बीच प्रसिद्ध आहे.

Scroll to Top