आमच्याबद्दल
नमस्कार मंडळी! मराठी ट्रॅव्हल हे मराठी माणसांसाठी, मराठीत लिहिलेलं फिरायचं मार्गदर्शन आहे. किल्ले, मंदिरं, बीच, धबधबे, लेणी आणि हिल स्टेशन. कुठे आहे, कसं जायचं, कधी जायचं आणि तिथे काय बघायचं, हे सगळं सोप्या भाषेत.
हे कोण चालवतं?
मराठी ट्रॅव्हल हे पुण्याच्या Webcof चं प्रॉडक्ट आहे. Trek Maharashtra, Saltrush आणि Best Indian Treks या आमच्या इतर वेबसाईटही याच परिवाराचा भाग आहेत.
मराठी ट्रॅव्हलवरचं सगळं लिखाण आणि माहिती Webcof चे Content Manager विवेक कदम सांभाळतात.
आमचा उद्देश
पैसे कमावणं हा इथला उद्देश नाही. फिरायला जाणाऱ्या मराठी माणसाला आपल्या भाषेत, खरी आणि ताजी माहिती मिळावी आणि फिरणाऱ्यांचा एक कट्टा तयार व्हावा, एवढंच.
आमच्या कट्ट्यात या
आपला समुदाय WhatsApp वर आहे. प्रश्न, फोटो, लोकांचे अनुभव आणि सिझननुसार ठिकाणं तिथे आधी येतात. WhatsApp कट्टा Join करा.
माहिती कशी चेक करतो ते इथे वाचा.