दिवाळीचा किल्ला फोटो चॅलेंज
दिवाळीत अंगणात किल्ला करणं ही आपली जुनी परंपरा. माती, दगड, मावळे आणि शिवरायांची मूर्ती. यंदा तुमचा किल्ला सगळ्यांना दाखवा. घरी, सोसायटीत किंवा गावी केलेल्या किल्ल्याचा फोटो पाठवा; निवडक किल्ले तुमच्या नावासकट इथे आणि WhatsApp कट्ट्यावर टाकू.
फोटो पाठवण्याची मुदत
१ ते १५ नोव्हेंबर
कसं भाग घ्यायचं?
- किल्ल्याचा एक चांगला, उजेडातला फोटो काढा. एका घरून जास्तीत जास्त ३ फोटो.
- सोबत लिहा: किल्ल्याचं नाव (कोणत्या किल्ल्याची प्रतिकृती), बनवणाऱ्यांची नावं आणि गाव किंवा शहर.
- आमच्या कट्टा गप्पा WhatsApp ग्रुपमध्ये टाका. WhatsApp नसेल तर ईमेल करा: hello@marathitravel.com
नियम
- किल्ला तुम्ही (घरच्यांनी, मित्रांनी, सोसायटीने) स्वतः केलेला असावा आणि फोटोही तुमचाच असावा.
- फोटोत फक्त किल्ला असू द्या. मुलांचे चेहरे, घराचा पत्ता किंवा फोन नंबर दिसणार नाही याची काळजी घ्या.
- फोटो पाठवून तुम्ही तो तुमच्या नावासकट मराठी ट्रॅव्हल साईटवर आणि आमच्या WhatsApp कट्ट्यावर वापरायला परवानगी देता.
- कोणते फोटो टाकायचे हे आम्ही ठरवू. सगळे फोटो टाकता येतीलच असं नाही.
पुढे काय?
निवडक किल्ल्यांची गॅलरी नोव्हेंबरमध्ये इथेच टाकू. नवे फोटो आणि गॅलरीची लिंक WhatsApp कट्ट्यावर आधी मिळेल.