गर्दीपासून लांब आणि निवांत वेळ घालवायचा असेल तर त्यासाठी किहीम बीच हा उत्तम समुद्र किनारा आहे. या किहीम समुद्र किनाऱ्यावरील वाळू पांढरी असून समुद्र किनारा रुंद आहे. किहीमच्या समुद्र किनाऱ्यावरती नारळ आणि सुपारीच्या बागा आणि कॅसुआरिनाच्या झाडांनी म्हणजे सुरूच्या झाडांनी वेढलेला समुद्र किनारा आहे. किहीम बीच हा वॉटर स्पोर्ट्स आणि पक्षी निरक्षणासाठी प्रसिद्ध आहे.
How to get to Kihim Beach? | किहीम बीच वरती कसे जायचे?
बोटीने
मुंबईहून बोटीने मांडावा पर्यंत जाता येते. मांडव्यापासून आपण टॅक्सी, रिक्षा किंवा प्रायवेट गाडीने किहीम बीच वरती जाऊ शकतो.
रेल्वेने
किहीम बीच पासून जवळचे रेल्वे स्टेशन पेण या ठिकाणी आहे. किहीम बीच पासून पेण रेल्वे स्टेशन सुमारे ३०.६ किलोमीटर अंतरावर आहे. या पेण रेल्वे स्टेशन पासून टॅक्सी किंवा रिक्षाने किहीम बीच वरती आपल्याला जाता येते.
किहीम बीच वरती जाण्यासाठी सर्वात्तम ऋतु
पावसाळा(जून ते सेप्टेंबर)
पावसाळ्यात किहीमचा परिसर हिरवागार आणि निसर्गरम्य दिसतो. परंतु समुद्र खवळलेला असल्याने आणि मुसळधार पावसामुळे जलक्रीडा म्हणजे वॉटर स्पोर्ट्स बंद असतात.
हिवाळा (नोव्हेंबर ते फेब्रुवारी)
नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे फिरण्यासाठी सर्वोत्तम महिने आहेत. हवामान आल्हाददायक १५°C ते २५°C असते. या काळात विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी आणि फुलपाखरे किहीममध्ये पाहायला मिळतात, जे या बीचचे मुख्य आकर्षण आहे.
उन्हाळा (मार्च ते मे)
उन्हाळ्यात दुपारचे तापमान ३५°C पर्यंत जाऊ शकते. मात्र, ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यांचा हंगाम साधारणपणे मार्च आणि एप्रिलमध्ये असतो, जो निसर्गप्रेमींसाठी खास अनुभव असतो.
Water sports at Kihim Beach | किहीम बिचवरील वॉटर स्पोर्ट्स
किहीम बीच वरती पर्यटकांसाठी अनेक आकर्षणे आहेत. त्यापेकी वॉटरस्पोर्ट्स हा एक आहे. जेट स्कीइंग, बनाना बोट राईड, बंपर राईड आणि पॅरासेलिंग इत्यादी वॉटर स्पोर्ट्सचा आनंद आपण किहीम बीच वरती घेऊ शकतो.
लाटांवर स्वार होण्याचा आणि हवेत उडण्याचा थरार आणि मजा आपण किहीम बीच वरती घेऊ शकतो. हे वॉटर स्पोर्ट्स चे उपक्रम नवशिक्यांसाठी आणि तज्ञ दोघांसाठीही योग्य आहेत, कारण ते प्रशिक्षित आणि प्रमाणित प्रशिक्षकांद्वारे आयोजित केले जातात जे तुमची सुरक्षितता आणि आनंद सुनिश्चित करतात.
Camel ride on Kihim Beach | किहिम बीचवर उंटाची सवारी
या किहीम बीच वरती आपण उंटाच्या सवारीचा सुद्धा आनंद घेऊ शकतो. या उंटाची सवारी करत असताना आपण आपल्या आजूबाजूचा परिसर पाहू शकतो. तुम्ही एकटे किंवा जोडीदारासोबत उंटावर स्वार होऊ शकता आणि समुद्र, आकाश आणि हिरवळीचे दृश्ये पाहू शकता. तसेच तुम्ही उंटासह काही अद्भुत फोटो आणि सेल्फी देखील काढू शकता आणि तुमच्या मित्रांना आणि मित्रांच्या कुटुंबाला दाखऊ शकता.
Bird watching and butterfly watching at Kihim Beach | किहिम बीचवर पक्षी निरीक्षण आणि फुलपाखरू निरीक्षण
जर तुम्ही निसर्गप्रेमी आणि वन्यजीवप्रेमी असाल, तर तुम्हाला किहिम बीच त्याच्या समृद्ध जैवविविधतेसाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी नक्कीच आवडेल. किहिम बीच आणि त्याच्या सभोवतालच्या परिसरात विविध प्रकारचे पक्षी आणि फुलपाखरे आहेत, त्यापैकी काही दुर्मिळ आणि धोक्यात आहेत. तुम्ही त्यांना सकाळी आणि संध्याकाळी पाहू शकता, जेव्हा ते सर्वात जास्त सक्रिय आणि दृश्यमान असतात. तेव्हा तुम्ही जवळच्या किहिम वन्यजीव अभयारण्याला देखील भेट देऊ शकता. जे वनस्पती आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्र आहे. किहिम बीचवर तुम्हाला दिसणाऱ्या पक्ष्यांच्या आणि फुलपाखरांच्या काही प्रजाती म्हणजे किंगफिशर, एग्रेट्स, हेरन्स, सनबर्ड्स, मोनार्क, स्वॅलोटेल्स आणि ब्लूज
Places to visit on Kihim Beach | किहिम बीचवरील प्रेक्षणीय स्थळे
या किहिम बीचजवळ अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आकर्षणे आहेत, जिथे तुम्ही भेट देऊ शकता आणि अलिबाग आणि महाराष्ट्राच्या भूतकाळ आणि वर्तमानाबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. किहिम बीचजवळ तुम्ही भेट देऊ शकता अशी काही आकर्षणे म्हणजे कुलाबा किल्ला, कनकेश्वर देवस्थान मंदिर, अलिबाग बीच आणि वर्सोली बीच.
कुलाबा किल्ला
आलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरती कुलाबा किल्ला आहे. हा कुलाबा किल्ला सतराव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला होता. छत्रपती शिवाजी महाराज या कुलाबा किल्ल्याचा वापर इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धी यांच्या विरुद्ध लढण्यासाठी करत असे. या कुलाबा किल्ल्यावरती घोडा गाडीतून सुद्धा जाता येते. तसेच अहोटीच्या वेळी पाणी किल्ल्याच्या पलीकडे जाते. तेव्हा चालत या किल्ल्याकडे जाता येते. या कुलाबा किल्ल्याकडे जाताना भरती आणि अहोटीचे वेळापत्रक बघूनच जावे लागते.
कनकेश्वर मंदिर
अलिबाग पासून कणकेश्वर मंदिर सुमारे १३ किलोमीटर अंतरावर मापगाव या गावामध्ये आहे. भगवान शिवांचे जागृत मंदिर असून ते कान्होजी आंग्रे यांचे कुलदेवत आहे. हे कणकेश्वर मंदिर सुमारे ९०० फुट उंचीवर असून या मंदिरात जाण्यासाठी सुमारे ७०० ते ७५० दगडी पायऱ्या चढाव्या लागतात. या कणकेश्वर मंदिराची स्थापत्य शैली यादव कालीन आहे. या मंदिरामधील शिवलिंग सुमारे चार फुट उंचीचे स्वयंभू शिवलिंग आहे. या कणकेश्वर मंदिराच्या परीसरामध्ये काही धर्मशाळा आणि भक्त निवासे उपलब्ध आहेत. आपल्याला कणकेश्वर मंदिराची पहाटेची आरती अनुभवायची असेल तर आपण या धर्मशाळेमद्धे किंवा भक्त निवासा मध्ये राहण्याची सोय करू शकतो. या मंदिराच्या आजूबाजूला काही छोटी हॉटेल्स उपलब्ध आहेत. या हॉटेल्स मध्ये आपल्याला पोहे, चहा-नाश्ता किंवा पिठलं-भाकरी मिळू शकते.
Alibaug Beach | अलिबाग बीच
अलिबाग हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात वसलेले एक सुंदर किनारी शहर आहे. हे कोकण किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या काठावर वसलेले आहे. या अलिबाग शहराची स्थापना सतराव्या शतकामध्ये मराठा सम्राज्याचे नोदलाचे ॲडमिरल कान्होजी आंग्रे यांनी केली होती. अलिबाग हे एक पर्यटन स्थळ असून मुंबई पासून सुमारे ९९ किलोमीटर आणि पुण्यापासून सुमारे १४५ किलोमीटर अंतरावर आहे. तसेच रायगड पासून सुमारे ११२ किलोमीटर अंतरावर आहे. अलिबागचा समुद्र किनारा हा सूर्योदय आणि सूर्यास्त साठी प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरती काळी मऊ वाळू आहे. अलिबाग या ठिकाणी नारळाच्या दुधाचा वापर करून बनवलेले मासे लोकप्रिय आहेत.
Varsoli Beach | वरसोली बीच
अलिबाग पासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असणारे वरसोली बीच हे स्वच्छतेसाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. तसेच या वरसोली बीच वरती कमी गर्दी असते. त्यामुळे ज्या पर्यटकांना कमी गर्दी आणि शांत वातावरण हवे आहे, त्यांच्यासाठी वरसोली बीच हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. तसेच वरसोली बीच हा पांढऱ्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे. या वरसोली बीचवरती आपण पॅरासेलिंग, जेट स्कीइंग, बनाना राईड, बंपर राईड यांसारख्या जलक्रीडांचा सुद्धा आनंद घेऊ शकतो. वरसोली बीचच्या आसपास खाजगी रिसॉर्ट्स, कॉटेज आणि होमस्टे उपलब्ध आहेत. या ठिकाणी आपण राहण्याची सोय करू शकतो. या वरसोली बीचवरती स्थानिक कोकणी पद्धतीचे मासे आणि विविध प्रकारचे कोकणी पदार्थ मिळतात.
किहिम बीचवर राहण्याची सोय
तुम्ही समुद्रकिनाऱ्याजवळील रिसॉर्ट्स, कॉटेज, हॉटेल्स आणि होमस्टेमधून निवडू शकता आणि समुद्राजवळ राहण्याचा आराम आणि सोयीचा आनंद घेऊ शकता.
किहिम बीचपासून अलिबाग बीच किती अंतरावर आहे?
किहीम बीच पासून अलिबाग हे सुमारे ९ किलोमीटरच्या अंतरावर आहे.
