हम्पी हे पर्यटन स्थल कर्नाटक मधील तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. हम्पी हे शहर विजयनगर या साम्राज्याची राजधानी होती. हम्पी हे पर्यटन स्थळ पुण्यापासून सुमारे ५६४ किलोमीटर मुंबई पासून सुमारे ७५२ किलोमीटर आणि सोलापूर या शहरापासून सुमारे ३१४ किलोमीटर अंतरावर आहे. हम्पी हे पर्यटन स्थळ पाहण्यासाठी परदेशीय लोक सुद्धा येत असतात. हम्पी हे पर्यटन स्थळ युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. हम्पी मधील विरुपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर, हंपी बाजार, लोटस महाल, हत्तीशाळा इत्यादी पर्यटन स्थळे प्रसिद्ध आहे.
How to get to Hampi? | हम्पीला कसे जायचे?
रेल्वेने
हम्पी पासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन होस्पेट या शहरामध्ये असून ते हम्पी पासून सुमारे १३.७ किलोमीटर अंतरावर आहे. या होस्पेट रेल्वे स्टेशन पासून तुम्ही ऑटोने किंवा टॅक्सीने हम्पीला जावू शकता.
पुण्याहून रेल्वेने कसे जायचे?
पुणे – होस्पेट पुण्यापासून होसपेटला जाण्यासाठी डायरेक्ट रेल्वे आहे परंतु या रेल्वेने जाण्यासाठी सुमारे १० ते १२ तास लागतात.
रस्त्याने
पुण्यामधून हम्पीला जाण्यासाठी खाली मार्ग दिला आहे.
पुणे → सोलापूर → कलबुर्गी → हॉस्पेट → हम्पी
या मार्गाने पुण्यापासून हम्पी सुमारे ६६७ किलोमीटर अंतरावर आहे. या मार्गाने जाण्यासाठी अंदाजे १४ तास लागतात.
बसने
पुणे -होसपेट -हम्पी
अशा मार्गाने तुम्ही हम्पीला जाऊ शकता.
पुण्याहून हम्पीला जाण्यासाठी बेस्ट मार्ग
पुण्यामधून तुम्हाला दुपारच्या ११ वाजल्या पासून रेल्वे आहेत, या रेल्वेने तुम्ही सोलापुरला जायचे. तुम्ही सोलापूर मध्ये संध्याकाळच्या ४ ते ७ पर्यंत पोहचला पाहिजेन. पुण्यामधून रेल्वेने सोलापूर जाण्यासाठी सुमारे चार तास लगतात. सोलापुर मधून तुम्ही प्रायवेट बसने, खाजगी वाहनाने किंवा कारने हम्पीला जाऊ शकता. सोलापूर पासून हम्पी सुमारे ३१४ किलोमीटर अंतरावर आहे.
हम्पीला भेट देण्यासाठी योग्य वेळ
हम्पीला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे महिने सर्वात्तम आहेत. तर उन्हाळ्यामद्धे हम्पी या ठिकाणी भरपूर उष्णता असते. त्यामुळे हम्पीला उन्हाळ्यामद्धे जावू नये.
Major Tourist Attractions in Hampi | हम्पी मधील प्रमुख पर्यटन स्थल
विरुपाक्ष मंदिर
तुंगभद्रा नदीच्या काठावर विरुपाक्ष मंदिर असून ते हम्पी मधील प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हे विरुपाक्ष मंदिर भगवान शिवाच्या विरुपाक्ष रूपाला समर्पित असून आजही येथे नियमित पूजा-अर्चा केली जाते. या विरुपाक्ष मंदिराचे प्रवेशद्वार सुमारे ५० मीटर उंच आहे. हे प्रवेशद्वार ९ मजली असून ते विजयनगर साम्राज्याचा स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. तसेच या प्रवेशद्वारावर विविध देवतांच्या आणि पौराणिक दृश्यांच्या सुंदर कलाकृती कोरलेल्या आहेत.
विजयनगर साम्राज्याच्या काळामध्ये या विरुपाक्ष मंदिराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे. या विरुपाक्ष मंदिरामधील शिल्पकला, कोरीवकाम आणि भित्तिचित्रे अत्यंत आकर्षक आहेत. विजयनगर साम्राज्याच्या काळात समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडते. या विरुपाक्ष मंदिराच्या आजूबाजूला अनेक लहान मंदिरे आणि स्तंभयुक्त मंडप आहेत, जे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
विठ्ठल मंदिर
हम्पीमधील विठ्ठल मंदिर हे भव्य आणि आकर्षक मंदिर आहे. हे मंदिर भगवान विठ्ठल यांना समर्पित आहे. विठ्ठलाचे हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या काळामध्ये बांधलेले असून ते अप्रतिम वास्तूकलेसाठी प्रसिद्ध आहे.
या विठ्ठल मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे दगडी रथ जो हम्पीचे प्रतीक मानले जाते. मंदिरातील संगीत स्तंभ हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या स्तंभांना हलक्या हाताने ठोठावल्यास वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी निर्माण होतात, जे त्या काळातील उत्कृष्ट अभियांत्रिकीचे उदाहरण आहे. या विठ्ठल मंदिराचा परिसर मोठा असून यामध्ये सुंदर मंडप, कोरीकाम आणि शिल्पकला पहायला मिळते. तुम्ही हम्पीला भेट देत असताना विठ्ठल मंदिर नक्कीच पहा.
या विठ्ठल मंदिरावर परकीय आक्रमण सुरू झाले होते, त्यावेळीसच विठ्ठलाची मूर्ती महाराष्ट्रामध्ये पळवली आणि ती पंढरपूर मध्ये स्थापित केली. या घटनेवरून मराठी मध्ये एक गीत आहे. “कानडा राजा पंढरीचा” हे गीत आहे.
हम्पीमधील बाजार
हम्पीचा बाजार हा विजयनगर साम्राज्याच्या काळामध्ये व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. हम्पी बाजार हा हम्पी मधील एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध बाजार परिसर आहे. हा बाजार विरुपाक्ष मंदिराच्या परिसरामध्ये पसरलेला आहे. या हम्पीच्या बाजारामद्धे दागिने, रेशीम, मसाले आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असे.
हम्पी बाजार सुमारे १ किलोमीटर लांब असून दोन्ही बाजूंना दगडी मंडपांच्या रांगा दिसतात. या मंडपांमध्ये व्यापारी आपला माल विकत असत. आज हा बाजार अवशेषांच्या स्वरूपात असून त्यातून त्या काळातील वैभव आणि समृद्धीची कल्पना येते.
लोटस महाल
लोटस महाल हा कमळाच्या आकाराचा असल्यामुळे लोटस महाल असे नाव देण्यात आलेले आहे. लोटस महाल हा विजयनगर साम्राज्यामधील अत्यंत सुंदर आणि अनोख्या वास्तुकलेचा नमुना मानला जातो. हा लोटस महाल विजयनगर साम्राज्याच्या राजघराण्यातील स्त्रियांसाठी वापरला जात असे.
या लोटस महालाची रचना हिंदू आणि इस्लामिक स्थापत्यशैलीच्या सुंदर मिश्रणाचे उदाहरण आहे. या लोटस महाला मध्ये कमानीदार दरवाजे, सुबक खिडक्या आणि बहुमजली रचना दिसून येते. महालाच्या वरच्या भागात कमळाच्या पाकळ्यांसारखी आकृती असल्यामुळे तो अत्यंत आकर्षक दिसतो. त्याची बांधणी इतकी उत्कृष्ट आहे की आजही तो मोठ्या प्रमाणात सुरक्षित अवस्थेत आहे. या लोटस महालाच्या आजूबाजूला हिरवळ आणि शांत वातावरण आहे. या लोटस महालाच्या जवळच हत्ती शाळा आहे.
आज लोटस महाल हे हम्पी मधील एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. येथे येणारे पर्यटक त्याच्या अद्भुत वास्तुकलेचे आणि ऐतिहासिक महत्त्वाचे कौतुक करतात.
हत्तीशाळा
हत्ती शाळा हि हम्पी मधील एक भव्य आणि आकर्षक वास्तु आहे. हत्तीशाळा हि विजयनगर साम्राज्याच्या राजांच्या हत्तीसाठी बांधण्यात आलेली होती. विजयनगर साम्राज्याच्या काळामध्ये हत्ती हे राजदरबारातील महत्वाचे आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जात होते.
हत्ती शाळेची रचना अत्यंत भव्य आहे आणि यामध्ये एकूण ११ घुमटाकार खोल्या आहेत. या प्रत्येक खोलीमध्ये एक हत्ती ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा करण्यात आलेली होती. या इमारतीची वास्तुकला हिंदू आणि इस्लामिक शैलीच्या सुंदर मिश्रणाचे उदाहरण आहे. प्रत्येक घुमट वेगळ्या आकाराचा असून त्यावर केलेले कोरीवकाम अत्यंत आकर्षक आहे.
हत्तीशाळेच्या समोर मोठे मैदान आहे, जिथे हत्तींचे प्रशिक्षण आणि देखभाल केली जात असे. या वास्तूची मजबुती आणि भव्यता आजही पाहणाऱ्यांना थक्क करते.
आज हत्तीशाळा हे हम्पीमधील एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. येथे येणारे पर्यटक या ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य आणि त्या काळातील राजवैभव अनुभवतात. हम्पीला भेट देताना हत्तीशाळा पाहणे हा एक खास अनुभव आहे.
Natural beauty in Hampi | हम्पीमधील निसर्ग सोंदर्य
हम्पी हे ठिकाण केवळ ऐतिहासिक वारसा साठीच नव्हे तर त्याच्या अप्रतिम निसर्ग सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले हम्पी हे मोठमोठ्या दगडांच्या रचना, टेकड्या आणि हिरवाईने नटलेले एक ठिकाण आहे. येथे दिसणारे खडकांचे नैसर्गिक समूह अत्यंत वेगळे असून ते पाहताना निसर्गाची अनोखी कलाकृती अनुभवता येते.
तुंगभद्रा नदी हि हम्पीच्या सौंदर्या मध्ये भर घालते. तुंगभद्रा नदीकाठी बसून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. सकाळच्या शांत वातावरणात पक्ष्यांचा किलबिलाट आणि थंड वारा मनाला प्रसन्न करतो, तर संध्याकाळी आकाशातील बदलणारे रंग मन मोहून टाकतात.
हम्पी मधील टेकड्यांवर चढून आजूबाजूचा सुंदर परिसर सुद्धा पाहता येतो. विशेषतः मटंगा हिलवरून दिसणारा सूर्योदय खूप प्रसिद्ध आहे. तसेच हिरव्या शेतीचे पट्टे, नारळाची झाडे आणि नदीकाठचा निसर्ग यामुळे येथे एक शांत आणि रमणीय वातावरण तयार होते.
हम्पीमधील निसर्ग आणि इतिहास यांचा संगम या ठिकाणाला अधिक खास बनवतो. प्राचीन मंदिरांचे अवशेष आणि त्यांच्या आजूबाजूला पसरलेले नैसर्गिक सौंदर्य पाहताना पर्यटकांना एक वेगळाच अनुभव मिळतो.
The History of Hampi | हम्पीचा इतिहास
हम्पीचा इतिहास अत्यंत समृद्ध आणि वैभवशाली आहे. प्राचीन काळी या भागाला पंपा क्षेत्र म्हणून ओळखले जात असे. 14व्या शतकात विजयनगर साम्राज्याची स्थापना हरिहर आणि बुक्क राय यांनी केली. त्यानंतर हम्पी हि या साम्राज्याची भव्य राजधानी बनली.
विजयनगर साम्राज्याच्या काळात हम्पी हे भारतातील सर्वात समृद्ध आणि प्रगत शहरांपैकी एक होते. व्यापार, कला, संस्कृती आणि स्थापत्यकलेत हम्पीने मोठी प्रगती केली आहे. परदेशी प्रवासी निकोलो दे कोंती आणि अब्दुर रज्जाक यांनीही हम्पीच्या वैभवाचे कौतुक केले आहे. त्या काळात येथे मोठ्या बाजारपेठा, भव्य मंदिरे आणि राजवाडे उभारण्यात आले होते.
मात्र १५६५ मध्ये झालेल्या तालिकोटाची लढाई नंतर विजयनगर साम्राज्याचा पराभव झाला आणि हम्पी शहर मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले. अनेक भव्य इमारती, मंदिरे आणि बाजारपेठा नष्ट करण्यात आल्या.
आज हम्पी मध्ये त्या काळातील अवशेष पाहायला मिळतात, जे त्याच्या भूतकाळातील वैभवाची साक्ष देतात. हंपीला युनेस्को जागतिक वारसा स्थळचा दर्जा मिळाल्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व जगभर मान्य झाले आहे. त्यामुळे हम्पी हे इतिहासप्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि आकर्षक पर्यटनस्थळ मानले जाते.
FAQs
हम्पी बद्दल काय माहिती आहे?
हंपी हे कर्नाटक राज्यातील एक ऐतिहासिक आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. हे तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले असून, प्राचीन काळी ते विजयनगर साम्राज्य ची राजधानी होते.
विरुपाक्ष मंदिर म्हणजे काय आणि त्याबद्दल काय माहिती आहे?
विरुपाक्ष मंदिर हे कर्नाटकातील हम्पी येथे असलेले एक प्राचीन आणि प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिवाच्या विरुपाक्ष या रूपाला समर्पित आहे.
हम्पी कोणत्या साम्राज्याची राजधानी होती?
हम्पी विजयनगर या साम्राज्याची राजधानी होती.
हम्पी कोणत्या नदीवर वसलेले आहे?
हम्पी हे पर्यटन स्थल कर्नाटक मधील तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले पर्यटन स्थळ आहे.
हम्पीमध्ये काय प्रसिद्ध आहे?
हम्पी हे ऐतिहासिक वारसा आणि सुंदर वास्तुकलेसाठी खूप प्रसिद्ध आहे. प्राचीन काळात ते विजयनगर साम्राज्य ची राजधानी होते, त्यामुळे येथे समृद्ध इतिहासाची झलक पाहायला मिळते
