पावसाळ्यात कोकण: मान्सूनमध्ये भेट द्यायची सर्वोत्तम ठिकाणे

कोकण मधील पावसाळी पर्यटनाचा सुंदर अनुभव जाणून घ्या. हिरवेगार डोंगर, धबधबे, समुद्रकिनारे आणि निसर्गरम्य ठिकाणांसह मान्सूनमध्ये भेट द्यायची सर्वोत्तम ठिकाणे, प्रवास टिप्स आणि कोकणातील खास आकर्षणे या ब्लॉगमध्ये पाहा.

आंबोली 

कोकणामधील आंबोली ही सर्वात प्रसिद्ध हिलस्टेशन आहे. आंबोली या ठिकाणी पावसाळ्यामध्ये दाट धुके थंड हवामान आणि हिरवाई इत्यादी गोष्टींमुळे आंबोली हे पर्यटन स्थापवसालींमद्धे अत्यंत सुंदर दिसते. पावसाळ्यामध्ये धडब्याचे दृश्य अत्यंत सुंदर दिसतो. आंबोली धबधबा हा आंबोली मधील सर्वात्तम पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यामध्ये आंबोली धबधबा अतिशय वेगाने वाहतो.

पावसाळ्यात आंबोलीमध्ये प्रवेश करताच थंड वाऱ्याची झुळूक आणि धुक्याने भरलेले वातावरण मनाला वेगळाच आनंद देते. घाटरस्त्यांवरून प्रवास करताना एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या दिसतात. रस्त्याच्या कडेला वाहणारे छोटे-मोठे धबधबे आणि ढगांमध्ये हरवलेले डोंगर पाहताना निसर्गाची खरी जादू अनुभवायला मिळते. 

दापोली 

दापोलीलाच मिनी महाबळेश्वर म्हंटले जाते. पावसाळ्यामध्ये दापोली मधील डोंगर हिरवेगार झालेले असतात. कर्डे बीच, लाडघर बीच आणि आंजर्ले बीच हे समुद्र  किनारे पावसाळ्यामध्ये अधिक सुंदर दिसतात. 

पावसाळ्यात दापोलीकडे जाणारा प्रवास खूप सुंदर वाटतो. घाटरस्त्यांवरून प्रवास करताना धुक्याने झाकलेले डोंगर, रस्त्याच्या कडेला वाहणारे धबधबे आणि हिरवीगार झाडे मन मोहून टाकतात. थंड वारा आणि पावसाच्या सरींमुळे प्रवासाचा आनंद अधिक वाढतो.

रायगड

 महाराष्ट्र मधील रायगड किल्ला हा स्वराज्याची किंवा मराठा साम्राज्याची राजधानी होती. पावसाळ्यामध्ये रायगड किल्ल्याला  हजारो पर्यटक भेट देतात, पण पावसाळ्यात रायगडाचे सौंदर्य अत्यंत सुंदर दिसते.  ढगांनी वेढलेले डोंगर, हिरव्यागार दऱ्या आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळे संपूर्ण परिसर हिरवागार दिसतो. रायगड किल्ल्याच्या परिसरामध्ये जून महिनामद्धे पावसाळा सुरवात होते. रायगड किल्ल्यावर जाताना आपल्याला घाट रस्त्यावरून जावे लागते. या घाट रस्त्यावरून जात असताना आपल्याला आजूबाजूला हिरवाईने भरलेले डोंगर वेगाने वाहताना धबधबे दऱ्या इत्यादी गोष्टींचे दृश्य अत्यंत सुंदर दिसते. रायगड परिसरातील स्थानिक खाद्यपदार्थांचाही आनंद येथे घेता येतो. गरमागरम भजी, चहा आणि पिठलं-भाकरी खाण्याची मजा पावसाळ्यात काही वेगळीच असते. थंड हवामानात गरम चहाचा प्रत्येक घोट प्रवासाचा आनंद वाढवतो.

गणपतीपुळे बीच 

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणपतीपुळे पर्यटन स्थळ असून ते रत्नागिरी पासून सुमारे २५.८ किलोमीटर अंतरावर आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले गणपतीपुळे आपल्या स्वच्छ समुद्रकिनाऱ्यासाठी, शांत वातावरणासाठी आणि प्रसिद्ध गणपती मंदिरासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. वर्षभर येथे पर्यटकांची गर्दी असते, मात्र पावसाळ्यात गणपतीपुळ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. हिरवाईने नटलेले डोंगर, समुद्राच्या उंच लाटा, थंड वारा आणि पावसाच्या सरी यामुळे गणपतीपुळ्यातील वातावरण अतिशय सुंदर दिसते. जून महिन्यापासून गणपतीपुळे परिसरात पावसाळ्याची सुरुवात होते. पावसाच्या पहिल्या सरींसोबतच येथील निसर्ग पूर्णपणे बदलून जातो. समुद्रकिनाऱ्यालगत असलेली नारळाची आणि सुपारीची झाडे अधिक ताजी आणि हिरवीगार दिसू लागतात. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळताना निर्माण होणारा आवाज आणि त्यासोबत वाहणारा थंड वारा मनाला एक वेगळीच शांतता देतो.

चिपळूण 

रत्नागिरी जिल्हयामध्ये चिपळूण हे पर्यटन स्थळ आहे. रत्नागिरी पासून चिपळूण सुमारे ८६.६ किलोमीटर  अंतरावर आहे. सह्याद्री पर्वतरांगा आणि  वशिष्ठी नदी याच्या कुशीमद्धे चिपळूण हे पर्यटन स्थळ लपलेले आहे. चिपळूण मध्ये जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो. तसेच या महिन्यांमध्ये चिपळूच संपूर्ण परिसर हिरवाईने टलेला असतो. धुक्याने झाकलेले डोंगर, वाहणारे धबधबे, हिरवीगार शेते आणि थंड वारा यामुळे पावसाळ्यात चिपळूणला भेट देण्याचा अनुभव खूप खास असतो.चिपळूण मधील परशुराम हे मंदिर पावसाळ्यामध्ये अत्यंत सुंदर दिसते. सावट धबधबा हा धबबा पावसात मोठा प्रवाह. येथे अनेक महिला फोटोफी आणि निसर्गाचा आनंदग्राहक.चिपळूण बाजारपेठ कोकणी खाद्यपदार्थ पुरुषांना खूप पसंती. रागरम भजी, वडे, सोलकढी, ताजे मासे आणि कोकम सरबत स्वाद फ्रेंच भाषेत अधिकच आनंददायी. थंड हवेत गरमागरम जेवणाचा आस्वाद घेत निसर्ग पाहण्याची मजा काही मजाच असते.

मालवण 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून ते सिंधुदुर्ग पासून सुमारे २९.८ किलोमीटर अंतरावर आहे. कोकणातील निळाशार समुद्र, ऐतिहासिक किल्ले आणि स्वादिष्ट मालवणी खाद्यसंस्कृतीसाठी मालवण संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. वर्षभर येथे पर्यटकांची गर्दी असते, मात्र पावसाळ्यात मालवणचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. हिरवेगार डोंगर, समुद्राच्या उंच लाटा, थंड वारा आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळे संपूर्ण परिसर अतिशय सुंदर दिसतो. जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये मालवण परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतो. किनाऱ्यावर आदळणाऱ्या फेसाळ लाटा आणि काळसर ढगांनी भरलेले आकाश पाहताना निसर्गाची भव्यता अनुभवायला मिळते. या काळात समुद्रकिनाऱ्यावर शांतपणे फिरण्याचा अनुभव खूप खास असतो.

Scroll to Top