कोकण दौरा २ दिवस: संपूर्ण प्रवास नियोजन आणि खर्च

कोकण हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन प्रदेशांपैकी एक आहे. समुद्रकिनारे, किल्ले, नारळाची झाडे, कोकणी खाद्यसंस्कृती आणि शांत वातावरण यामुळे अनेक पर्यटक विकेंड ट्रिपसाठी कोकणाची निवड करतात. फक्त दोन दिवसांतही कोकणातील अनेक सुंदर ठिकाणांचा आनंद घेता येतो. योग्य नियोजन केले तर कमी बजेटमध्येही हा प्रवास अविस्मरणीय ठरू शकतो. 

पहिला दिवस 

पहिल्या दिवसामध्ये तुम्ही पहाटे  लवकर कोकणला जावे लागेल. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा अलिबाग बीचवर जायचे आहे. अलिबाग बीच पुण्यामधून सुमारे १४९ किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून अलिबाग जाण्यासाठी अंदाजे चार तास लागतात. 

अलिबाग बीच 

अलिबाग बीच रायगड जिल्ह्यामधील प्रसिद्ध बीच आहे. मुंबई  पासून अलिबाग बीच जवळ असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी इथे खूप गर्दी असते. या अलिबाग बीच वरच कोलाबा किल्ला आहे. स्वच्छ समुद्रकिनारा, काळसर वाळू, नारळाची झाडे आणि शांत वातावरण इत्यादी गोष्टीं मुळे पर्यटकांना अलिबाग बीचलोकप्रिय आहे. ओहोटीच्या वेळी पर्यटक या किल्ल्यापर्यंत चालतही जाऊ शकतात. समुद्रकिनाऱ्यावर घोडागाडी आणि वॉटर स्पोर्ट्स इत्यादी आपण अॅक्टिविटी करू शकतो. संध्याकाळच्या वेळी अलिबाग बीचवरील सूर्यास्त अत्यंत सुंदर दिसतो. काळसर वाळूवर पडणारा सूर्याचा सोनेरी प्रकाश आणि समुद्राच्या लाटा मन मोहून टाकतात. त्यामुळे फोटोग्राफीसाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. अलिबाग बीच परिसरात अनेक हॉटेल्स रेस्टॉरंट आणि होम स्टे सुद्धा उपलब्ध आहेत. तसेच, येथे कोकणी आणि सीफूड पदार्थांचा स्वादही घेता येतो. ताजे मासे, सोलकढी आणि कोकम सरबत पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.

काशीद बीच 

अलिबाग पासून काशीद बीच हा सुमारे ३२.४ किलोमीटर अंतरावर आहे. अलिबाग वरून काशीद बीच वर जाण्यासाठी खाली मार्ग दिला आहे. 

अलिबाग बीच →नागाव →चोल →काशीद बीच 

काशीद बीच सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये आहे. काशीद बीच हा पांढरी वाळू निळाशार समुद्र आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. या काशीद बीच वरती नारळाची आणि सुरूची झाडे आहेत. येथे पर्यटकांना जेट स्की, बनाना राईड, स्पीड बोट राईड यांसारख्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो. तसेच, समुद्रकिनाऱ्यावर फिरणे, सूर्यास्त पाहणे आणि फोटोग्राफी करणे यासाठीही काशीद बीच खूप प्रसिद्ध आहे. संध्याकाळच्या वेळी समुद्रावर पडणारा सूर्यास्ताचा सोनेरी प्रकाश अत्यंत सुंदर दिसतो. 

कर्डे बीच 

काशीद बीच पासून कर्डे बीच सुमारे १४७ किलोमीटर अंतरावर आहे. कर्डे बीच हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. कर्डे बीच हा एक शांत स्वछ आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. गर्दीपासून दूर असलेला हा किनारा आपल्या स्वच्छ वाळू, निळाशार समुद्र आणि हिरव्यागार परिसरामुळे खूप प्रसिद्ध आहे. काशीद बीच वरुन कर्डे बीचवर कसे जायचे याचा मार्ग खाली दिला आहे. 

काशीद बीच → मुरुड→ म्हसळा→अंजारले →कर्डे बीच 

सकाळच्या वेळी येथे सूर्योदयाचे दृश्य अत्यंत सुंदर दिसते. समुद्रावर पडणारी सूर्यकिरणे आणि शांत वातावरण पर्यटकांना एक वेगळीच ऊर्जा देतात.

कर्डे बीचवर पर्यटकांना डॉल्फिन सफारीचा आंनद हि घेता येतो. कर्डे बीचवर पर्यटकांना डॉल्फिन सफारीचा आंनद हि घेता येतो. या बीच वरती बीच वॉक, फोटोग्राफी या गोष्टींसाठी अनेक लोक कर्डे बीच वर येत असतात. 

या कर्डे बीच वरती अनेक रेसॉर्टस हॉटेल्स आणि होमस्टे आहेत. या कर्डे बीच वर कोकम आणि खाद्य पदार्थ आणि ताजे सीफूडही प्रसिद्ध आहे. सोलकढी, फिश फ्राय आणि कोकम सरबत यांचा स्वाद पर्यटक आवडीने घेतात.

स्थानिक खाद्यपदार्थांचा आनंद

कोकण हे आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसोबतच स्वादिष्ट खाद्यसंस्कृतीसाठीही प्रसिद्ध आहे. येथे ताजे सीफूड, मालवणी मसाले आणि नारळाच्या चवीने भरलेले पदार्थ पर्यटकांना खूप आकर्षित करतात.सोलकढी, फिश फ्राय, कोकणी थाळी आणि हे येथील खास पदार्थ मानले जातात. तसेच, कोंबडी वडे आणि कोकम सरबत चाही स्वाद पर्यटक आवडीने घेतात. कोकणातील घरगुती मसाले आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेले पदार्थ प्रत्येकाला वेगळीच चव देतात. त्यामुळे कोकणात फिरताना येथील स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे हा प्रवासातील खास अनुभव ठरतो.

संध्याकाळ करणाऱ्या गोष्टी 

संध्याकाळच्या वेळी बीचवर फिरण्याचा अनुभव खूप शांत आणि आनंददायी असतो. समुद्राच्या लाटा, थंड वारा आणि मावळणारा सूर्य मनाला प्रसन्न करतो. या वेळेत तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर चालणे, सुंदर सूर्यास्त पाहणे, फोटोग्राफी करणे किंवा शांतपणे बसून निसर्गाचा आनंद घेऊ शकता. अनेक बीचवर वॉटर स्पोर्ट्स, घोडागाडी राईड आणि स्थानिक खाद्यपदार्थांचाही आनंद घेता येतो. गरम भजी, नारळपाणी किंवा चहा घेत समुद्रकिनाऱ्यावरील वातावरण अनुभवणे ही एक खास मजा असते. संध्याकाळचा बीच प्रवास मनाला शांतता आणि ताजेपणा देणारा ठरतो.

मुक्काम 

कोकण मधील मुक्काम हा पर्यटकांसाठी शांत आणि आनंददायी अनुभव असतो. येथे बीच रेसॉर्टस, होमस्टे आणि हॉटेल्स  अशा विविध राहण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. समुद्रकिनाऱ्याजवळील रिसॉर्ट  मध्ये राहिल्यास समुद्राच्या लाटांचा आवाज आणि थंड वाऱ्याचा आनंद घेता येतो. कोकणातील होमस्टे मध्ये स्थानिक कोकणी संस्कृती आणि घरगुती जेवणाचा अनुभव मिळतो. शांत वातावरण, हिरवागार निसर्ग आणि स्वादिष्ट कोकणी खाद्यपदार्थ यामुळे कोकणातील मुक्काम अविस्मरणीय ठरतो.

दूसरा दिवस 

दुसऱ्या दिवशी सकाळी जवळील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येते. मुरूड जंजिरा किल्ला हा समुद्रातील भव्य किल्ला इतिहासप्रेमींसाठी विशेष आकर्षण आहे. तसेच, कोलाबा किल्ला किंवा सुवर्णदुर्ग किल्ला यांसारखे किल्लेही पाहण्यासारखे आहेत.

त्यानंतर स्थानिक बाजारातून कोकम, काजू, आंबा उत्पादने आणि मसाले खरेदी करता येतात. दुपारनंतर परतीचा प्रवास सुरू करता येतो.

स्थानिक बाजार 

स्थानिक बाजार हे कोणत्याही पर्यटनस्थळाचे सांस्कृतिक आणि पारंपरिक वैशिष्ट्य दर्शवतात. कोकण मधील स्थानिक बाजारांमध्ये कोकम सरबत, काजू, आंबा उत्पादने, मसाले, लोणची आणि हस्तकला वस्तू मोठ्या प्रमाणावर मिळतात. येथे पर्यटकांना ताजे फळे, समुद्री पदार्थ आणि पारंपरिक कोकणी वस्तू खरेदी करता येतात. बाजारातील रंगीबेरंगी दुकाने आणि स्थानिक लोकांचे साधे जीवन पर्यटकांना वेगळाच अनुभव देतात. कोकणातील बाजारांमध्ये फिरताना स्थानिक संस्कृती आणि खाद्यपदार्थांची खरी ओळख अनुभवायला मिळते.

दुपारचे जेवण 

कोकण  मधील दुपारचे जेवण हे स्वादिष्ट आणि पारंपरिक कोकणी चवीसाठी प्रसिद्ध आहे. कोकणी थाळीमध्ये भात, आमटी, भाजी, सोलकढी, लोणचे आणि ताजे सीफूड दिले जाते. फिश फ्राय, सुरमई करी, कोळंबी आणि मालवणी मसालेदार पदार्थ पर्यटकांना खूप आवडतात. शाकाहारींसाठी नारळाच्या रसामध्ये बनवलेल्या भाज्या आणि घावणेही लोकप्रिय आहेत. समुद्रकिनाऱ्याजवळ बसून गरमागरम कोकणी जेवणाचा आस्वाद घेण्याची मजा काही वेगळीच असते. ताजे साहित्य आणि घरगुती मसाल्यांमुळे कोकणातील दुपारचे जेवण पर्यटकांसाठी खास अनुभव आहे. 

परतीचा प्रवास 

कोकण मधून परतीचा प्रवास हा सुंदर आठवणींनी भरलेला अनुभव असतो. समुद्रकिनारे, हिरवेगार डोंगर, शांत गावं आणि कोकणी खाद्यसंस्कृतीचा आनंद घेतल्यानंतर पर्यटक परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. घाटरस्त्यांमधून प्रवास करताना दिसणारा निसर्ग मन मोहून टाकतो. अनेकजण स्थानिक बाजारातून कोकम, काजू, आंबा उत्पादने आणि मसाले खरेदी करून सोबत घेऊन जातात. संध्याकाळच्या थंड वाऱ्यात आणि समुद्राच्या आठवणींसह परतीचा प्रवास अधिक खास वाटतो. कोकणातील शांतता आणि निसर्गामुळे हा प्रवास पर्यटकांच्या मनात कायमचा घर करून राहतो.

अंदाजे खर्च 

अंदाजे खर्च (सर्व खर्च रुपायांमद्धे) 

प्रवास खर्च 

स्वतःची गाडी- ४००० ते ८००० 

बस/ ट्रेन 

१००० ते ३००० प्रती व्यक्ती 

राहण्याचा खर्च 

बजेट स्टे –  १००० ते २५०० 

रिसॉर्ट स्टे – ३००० ते ७००० 

जेवण खर्च 

५०० ते १५०० प्रती व्यक्ती प्रती दिन 

एकूण खर्च 

बजेट ट्रीप ५००० ते १०००० 

लक्झरी ट्रीप १५००० किंवा त्याच्या पेक्षा जास्त 

Scroll to Top