स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड हा किल्ला पुणे शहराच्या नैऋत्येला आहे. पुण्यापासून राजगड हा किल्ला सुमारे ६२.३ किलोमीटर अंतरावर आहे. राजगड किल्ल्यावरती सुवेळा माची, पद्मावती तलाव, राजवाडा, गुंजवणे दरवाजा, पद्मावती मंदिर, संजीवनी माची, काळेश्वरी बुरूज आणि बालेकिल्ला इत्यादी ठिकाणे पाहण्यासारखे आहेत. नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यमध्ये मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. या मुरुंबदेवाच्या डोंगरावर राजगड हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळभागा मद्धे विस्तार करण्यासाठी राजगड हा किल्ला जिंकला होता. राजगड या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे १३९४ मीटर एवढी आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप मोठा आहे तसेच राजगडावर येण्यासाठी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. महाराजांनी राजगड या किल्ल्याचे सुरक्षेच महत्व लक्षात घेऊन या किल्ल्याला स्वराज्याची पहिली राजधानी बनवली. या राजगड किल्ल्यावरतीच सई बाई यांचे निधन तर राजाराम महाराज यांचा जन्म झाला होता.
राजगड किल्ल्यावरती कसे जायचे?
राजगड किल्ल्यापासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन पुणे स्टेशन असून ते सुमारे ५२.७ किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला रेल्वे ने राजगड किल्ल्यावर जायचे असेल तर सगळ्यात पहिल्यांदा रेल्वे ने पुणे स्टेशन वर यावे लागेल. पुणे स्टेशन पासून राजगड हा किल्ला सुमारे ५२.७ किलोमीटर अंतरावर आहे. पुणे स्टेशन पासून तुम्ही टॅक्सी, प्रायवेट गाडीने किंवा खाजगी वाहनाने तुम्ही राजगड किल्ल्यावरती जावू शकता. पुणे शहरांमधून तुम्ही खाजगी वाहनाने सुद्धा राजगड किल्ल्यावरती जावू शकता. राजगड हा किल्ला पुण्यापासून सुमारे ५२.७ किलोमीटर अंतरावर आहे.
राजगड किल्ल्यावरील पाहण्यासारखे ठिकाण
सुवेळा माची
राजगडच्या पूर्व बाजूला सुवेळा माची आहे. या सुवेळा माची वर छत्रपती शिवाजी महाराज यांनी चिलखती बुरूज आणि तटबंदी बुरूज बांधले आहे. या माचीची लांबी सुमारे २.५ किलोमीटर असून ती तीन टप्प्यांमध्ये विभागली आहे. या माचीच्या तिन्ही टप्प्यांमध्ये पाण्याची टाकी आणि बुरुजाचे अवशेष सापडतात. सुवेळा माची हि छत्रपती शिवाजी महाराज यांनीच बांधलेली आहे.
पद्मावती तलाव
या पद्मावती तलावाच्या चारही बाजूने दगडाचे काम केले आहे. या पद्मावती तलावाचा उपयोग त्याकाळी पानी पिण्यासाठी होत होता. गुप्त दरवाज्यातून आल्यानंतर समोरच पद्मावती तलाव आहे. या पद्मावती तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत.
संजीवनी माची
पश्चिम दिशेला असणारी संजीवनी माची हि एक अरुंद आणि लांब माची आहे. संजीवनी माची हि छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली आहे. संजीवनी माची हि सुमारे २.५ किलोमीटर लांब आहे. या माचीचे तटबंदी आणि बुरूज राजगड किल्ल्याचे संरक्षण करतात.
राजवाडा
रामेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला राजवाडेचे काही अवशेष सापडतात. या राजवाड्यामद्धे एक तलाव आहे. राजवाड्यापासून थोडेसे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो. अंबारखाना पासून थोडेसे पुढे चालत गेल्यास आपल्याला सदर पहावयास मिळते. सदर हि राजगडावरील सर्वात महत्वाची वास्तु आहे. या वाड्याच्या समोरच महरांजणी फुलांची बाग लावलेली आहे. हि बाग २५ एकरा मध्ये पसरली आहे. त्या काळी या बागेला शिवबाग असे नाव दिले आहे.
काळेश्वरी बुरूज आणि परिसर
सुवेळा माचीकडे जाणाऱ्या वाटेच्या उजव्या बाजूला आपल्याला काही पाण्याच्या टाक्या दिसतात. पुढे रामेश्वर मंदिराचे काही अवशेष आहेत. या रामेश्वर मंदिरात शिवलिंग, नंदी, यक्षमूर्ती अशी काही शिल्पे आढळतात.
बालेकिल्ला
किल्ल्याच्या वरच्या टोकाला बालेकिल्ला असे म्हणतात. या राजगडच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता कठीण आणि अरुंद आहे. या बालेकिल्ल्याच्या वरच्या बाजूला एक दरवाजा आहे त्याला महादरवाजा असे म्हणतात. हा महादरवाजा आजही सुस्थितीत आहे. या महादरवाज्याच्या प्रवेश द्वारची उंची सुमारे ६ मीटर असून यावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. या दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच जननी मातेचे मंदिर आपल्याला पहावयासमिळते. या राजगडचे भरभक्कम बुरूजे आहेत.
गुंजवणे दरवाजा
या राजगडावर एका पाठोपाठ तीन दरवाजे आहेत, यालाच गुंजवणे दरवाजा म्हणतात. हा दरवाजा अत्यंत साधा बांधणीचा आहे. मात्र या गुंजवणे दरवाजाच्या दोन्ही बाजूस भरभक्कम बुरूजे आहेत. हा गुंजवणे दरवाजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधीच्या काळामध्ये बांधलेला आहे. या गुंजवणे दरवाज्यातून आत गेल्यावर पद्मावती माची लागते.
पद्मावती मंदिर
राजगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव मुरुंबदेव असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव हे नाव बदलून राजगड असे ठेवले. महाराजांनी या किल्ल्यावर मुरुंबदेवाचे मंदिर बांधलेले आहे. २००२ साली महाराष्ट्र शासनाने या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. या मंदिरामध्ये तीन मुर्त्या आहेत. यामधील मुख्य पूजेची मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केली आहे. त्याच्या उजव्या बाजूला लहान मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांने स्थापित केलेली आहे. जय मुर्तीवर शेंदूर फासलेला तांदळा आहे. हि मूर्ती पद्मावती देवीची आहे.
गडावर जाण्यासाठी मार्ग
गुप्त दरवाजाने राजगड
महाराष्ट्र शासनाची पुणे-राजगड अशी बस पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते. या वाजेघर गावातून ट्रेकणे राजगडावर जाता येते. या वाटेने राजगडावर जाण्यासाठी तीन तास लागतात.
पाली दरवाज्याने राजगड
महाराष्ट्र शासनाच्या पुणे-वेल्हे बसने वेल्हे मार्गे खरीव या गावी उतरावे यानंतर कानंद नदी पार करून पाली दरवाजा गाठावा. हि वाट अत्यंत सोपी आहे. या वाटेने गडावर जाण्यासाठी तीन तास लागतात.
आळू दरवाज्याने राजगड
भुतोंडे मार्गाने आळु दरवाज्याने राजगड गडावर जाता येते.
गुप्त दरवाज्यामार्गे सुवेळा माची
गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्तदरवाजेमार्गे राजगडच्या सुवेळा माचीवर येते.
राजगडावरील सोयी
राहण्याची सोय
गडावरील पद्मावती मंदिरात २० ते २५ जणांची रहाण्याची सोय होते.
पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत.
जेवणाची सोय
आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय
पद्मावती मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याचे बारमाही टाके आहे.
इतिहास
राजगडचे पूर्वीचे नाव मुरुंबदेव असे होते. हा राजगड किल्ला १६४७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकला आणि या किल्ल्याचे नाव बदलले. २६ वर्ष हा राजगड किल्ला स्वराज्याची राजधानी होती. या राजगडा नंतर महाराजांनी राजधानी हलवून रायगडावर नेली. राजगडावरती अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत. स्वराज्याच्या पहिल्या महाराणी सईबाई यांचे निधन याच राजगडावर झाले होते. तसेच राजाराम महाराजांचा जन्म सुद्धा याच किल्ल्यावरती झाला होता.
वास्तुरचना
राजगड किल्ला हा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या सुरवातीच्या काळातील राजधानीचा किल्ला होता. याची वास्तु रचना अत्यंत भक्कम आणि रणनीतीपूर्वक बांधलेली आहे. किल्ला तीन प्रमुख भागांत विभागलेला आहे, बालेकिल्ला, पद्मावती माची, आणि संजीवनी माची. बालेकिल्ल्यावरून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता येते. पद्मावती माचीवर राहण्याची सोय होती, तर संजीवनी माची ही लांबट आणि सुरक्षिततेसाठी वापरली जाणारी माची होती. किल्ल्याभोवती खोल दऱ्या आणि कठीण चढाईचा मार्ग यामुळे तो अत्यंत सुरक्षित होता. मजबूत तटबंदी, दरवाजे आणि पाण्याची टाकी ही याची आणखी वैशिष्ट्ये आहेत. राजगडाची ही रचना युद्धनिती, सुरक्षितता आणि प्रशासन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन बांधलेली आहे.
पर्यटकांसाठी खास अनुभव
राजगड किल्ला हा गिर्यारोहक आणि इतिहासप्रेमी पर्यटकांसाठी खास अनुभव देणारा ठिकाण आहे. या किल्ल्याची चढाई रंजक असून निसर्गसौंदर्याने भरलेली आहे. किल्ल्यावरून दिसणारे सह्याद्रीचे विस्तीर्ण दर्शन, ढगांची संगत आणि वाऱ्याची थंड झुळूक पर्यटकांना वेगळाच आनंद देते. पद्मावती माचीवरून सूर्योदय आणि संजीवनी माचीवरून सूर्यास्त पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. इतिहासाची आठवण करून देणारा बालेकिल्ला आणि पाण्याची टाकी पाहून जुने दिवस आठवतात. किल्ल्यावर निवांत वेळ घालवता येतो तसेच रात्री मुक्काम चाही आनंद घेता येतो. त्यामुळे राजगडाची भटकंती ही केवळ ट्रेकिंग न राहता, इतिहास, निसर्ग आणि आत्मशांती यांचा संगम बनते.
भेट देण्यासाठी सर्वात्तम वेळ
हिवाळा (डिसेंबर ते फेब्रुवारी) थंडीमुळे ट्रेकिंगसाठी हे दिवस अधिक सोयीचे असतात. आकाश स्वच्छ असल्यामुळे माच्यांवरून दूरपर्यंतचा देखावा स्पष्ट दिसतो.
राजगड किल्ला भेट देण्यासाठी सप्टेंबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. पावसाळ्यानंतरचा काळ (सप्टेंबर ते नोव्हेंबर) या काळात किल्ल्याभोवती हिरवळ फुललेली असते, वातावरण आल्हाददायक असते, आणि धुके व थंड हवा यामुळे चढाईचा अनुभव खास वाटतो.
राजगड गडाला का भेट द्यावी
राजगड किल्ला भेट देण्यासारखा किल्ला आहे कारण तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या इतिहासाशी नाते जोडतो. हा किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी होती आणि अनेक ऐतिहासिक घटना येथे घडलेल्या आहेत. किल्ल्याची भव्य रचना, माच्यांची योजना, आणि बालेकिल्ल्यावरून दिसणारा नजारा पर्यटकांना इतिहासात हरवून टाकतो. निसर्गरम्य वातावरण, शांतता आणि हिरवळ यामुळे मन प्रसन्न होते. ट्रेकिंगप्रेमींसाठी ही एक साहसपूर्ण आणि समाधानी यात्रा ठरते. इतिहास, निसर्ग, आणि आत्मअनुभूती यांचा मिलाफ अनुभवण्यासाठी राजगड किल्ल्याची भेट ही अवश्य द्यावी अशी आहे. हा किल्ला आपल्याला मराठ्यांच्या वैभवाची आठवण करून देतो.