लोहगड किल्ल्याची माहिती

लोणावळा पासून जवळ असलेला लोहगड हा किल्ला पुण्यापासून सुमारे ६४.३ किलोमीटर तर लोणावळ्यापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतहून मिळवलेली संपत्ती या लोहगड किल्ल्यावरती ठेवली होती. भारत शासनाने लोहगड या किल्ल्याला २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. लोहगड या किल्ल्यावरती गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, नारायण दरवाजा आणि महादरवाजा इत्यादी ठिकाणे पाहण्यासारखे आहेत. या लोहगडावरील विंचू काटा हा बुरूज पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या लोहगड किल्ल्यामुळे इंद्रायणी आणि पवना खोरे वेगळे झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४८ मध्ये लोहगड हा किल्ला जिंकला होता. परंतु पुरंदरच्या तहामद्धे हा किल्ला मुघलांना द्यावा लागला होता.

गडावर पाहण्यासारखे ठिकाणे 

नाना दरवाजा 

नाना दरवाजा हा नाना फडवणीस यांनी बांधला आहे. या नाना दरवाज्याच्या जवळच एक भुयार आहे. या भुयाऱ्या मध्ये भात आणि नाचणी साठवून ठेवण्यात येई. 

हनुमान दरवाजा 

हा हनुमान दरवाजा या लोहगड किल्ल्यावरील सर्वात प्राचीन दरवाजा आहे. 

महादरवाजा 

हा महादरवाजा लोहगडचा मुख्य दरवाजा असून तो नाना फडवीणसांनी सुमारे १७९० साली बांधला आहे. महादरवाज्यातून आत गेल्यानंतर एक दर्गा लागते. या दर्ग्या शेजारीच सदर आणि लोहार खानाच्या भंगारचे अवशेष पडलेले दिसतात. या दर्ग्या समोरच बांधकामाला लागणारा चुनाच्या घाणी आहेत. या दर्ग्याच्या उजव्या बाजूला ध्वज स्तंभ आहे. या ध्वज स्तंभाच्या उजव्या बाजूला चालत गेल्यास लक्ष्मी कोठी लागते. या लक्ष्मी कोठीमद्धे राहायची सोय सुद्धा आहे. दर्ग्याच्या उजव्या बाजूला चालत गेल्यास एक शिवमंदिर आहे. या शिव मंदीरा समोरच अष्ट कोनी आकाराचे तलाव आहे. याच तलावाचे पानी गडावरील लोक पिण्यासाठी वापरतात. 

विंचू काटा 

लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचू काटा आहे. हि विंचुकाटा या लोहगडावरील सर्वात प्रसिद्ध वास्तु आहे. हि विंचूकाटा पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद आहे. विंचू काट्याकडे गडावरुन बघितल्यानंतर हा भाग विंचवाच्या नांगणी सारखा दिसतो, म्हणून यास विंचू काटा म्हणतात. या भागात पाण्याची उत्तम सोय आहे. या विंचुकाटाच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचुकाट्याचा उपयोग होत असे. या लोहगडावरून येत असताना भाजे लेणी अवश्य पहावी. 

लोहगडावरती कसे जावे?

लोहगडवाडी गाव हे लोहगड किल्ल्याच्या पायथ्या गावाचे नाव आहे. या लोहगडवाडी पर्यंत तुम्ही टॅक्सीने किंवा खाजगी वाहनाने येवू शकता. पुण्यापासून लोहगड सुमारे ५५.७ किलोमीटर तर मुंबई सुमारे १०३ किलोमीटर आहे. लोणावळ्या पासून लोहगड हा किल्ला सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आहे. पुणे, मुंबई किंवा लोणावळ्या मधून टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने लोहगडावरती तुम्ही येवू शकता. 

 लोहगड किल्ल्याच्या जवळचे रेल्वे स्टेशन मळवली आहे. ते पुण्यापासून सुमारे ५५.७ किलोमीटर अंतरावर आहे. मळवली पासून लोहगड किल्ला सुमारे ५.६ किलोमीटर अंतरावर आहे. या मळवली स्टेशन पासून तुम्ही खाजगी वाहनाने लोहगड किल्ल्यावरती जावू शकता. 

लोहगड किल्ल्याचा ट्रेक 

लोहगडवाडी गाव हे लोहगड किल्ल्याच्या पायथ्या गावाचे नाव आहे. या लोहगडवाडी मधूनच लोहगड किल्ल्यासाठी ट्रेक सुरू होतो. या लोहगडवाडी पासून थोडेसे पुढे चालत गेल्यास तुम्हाला लोहगड किल्ल्याच्या दगडी पायऱ्या दिसून येतात. याच पायऱ्याने तुम्ही लोहगड किल्ल्यावरती जावू शकता. लोहगड किल्ल्याच्या या ट्रेकची वाट अत्यंत सोपी आहे. 

या लोहगडवाडीच्या जवळ भांजे गाव आहे. या भांजे गावापासून लोहगड किल्ल्यावरती जाणारी वाट हि कठीण आहे. 

लोहगड किल्ल्याची स्थापत्य 

लोहगड हा किल्ला समुद्र सपाटी पासून सुमारे १०३३ मीटर उंच आहे. या लोहगड किल्ल्याला गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, नारायण दरवाजा आणि  महादरवाजा असे चार दरवाजे आहेत. या दरवाज्यांवर कोरीव काम केलेल्या मुर्त्या सुद्धा आहेत. त्यापेकी महादरवाजा हा लोहगड किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. या लोहगडावरील विंचू काटा हि प्रसिद्ध कडा आहे. 

इतिहास

१६४८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकला होता. परंतु पुरंदरच्या तहामद्धे हा किल्ला मुघलांना द्यावा लागला होता. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६७० मध्ये हा किल्ला जिंकून घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांना सूरतला मिळालेली संपत्ती या लोहगडावर जपून ठेवलेली होती. पेशवांच्या काळामध्ये नाना फडवणीस यांनी या लोहगड किल्ल्यावरती काही काळ वास्तव केले आहे. नाना फडणवीस यांनी या लोहगडावरील अनेक वास्तूंचे जीर्णोद्धार केलेला आहे. 

भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ

लोहगड किल्ल्याला भेट देण्यासाठी पावसाळ्यामध्ये जून ते सेप्टेंबर हे महिने सर्वात्तम आहेत. तर हिवाळ्यामध्ये ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे महिने सर्वात्तम आहेत. पावसाळ्यामध्ये या लोहगड किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर हिरवागार होतो आणि हिवाळ्यामधील थंड हवामान ट्रेकिंगसाठी अनुकूल आहे.








Scroll to Top