देवगड बीच | Information Devgad Beach

देवगड बीच हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असून तो सिंधुदुर्ग पासून सुमारे ७७.९ किलोमीटर अंतरावर आहे. देवगड बीच हा पुण्यापासून सुमारे ३५६ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे ४२६ किलोमीटर अंतरावर आहे. देवगड बीच हा शांत समुद्र किनारा, स्वछ वाळू आणि निळाशार समुद्र याच्यासाठी ओळखला जातो. या देवगड बीचला नारळाच्या झाडांनी वेढलेले आहे. तसेच या देवगड बीच वर सूर्यास्ताचे दृश्य अत्यंत सुंदर दिसते. या देवगड बीचवर वेळ घालवणे, फोटोग्राफी करणे इत्यादी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. तसेच देवगडचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. देवगड बीच वर शांत वातावरण आणि नेसर्गिक सोंदर्यामुळे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

How to get to Devgad Beach? | देवगड बीच वर कसे जायचे?

रेल्वेने

देवगड बीच पासून कणकवली हे रेल्वे स्टेशन जवळचे असून ते सुमारे ५७.२ किलोमीटर अंतरावर आहे. या रेल्वे स्टेशन पासून आपण टॅक्सी किंवा प्रायवेट गाडीने जावू शकतो.

पुण्याहून देवगड बीच वरती कसे जायचे?

स्वतःची गाडी किंवा खाजगी गाडी 

पुण्याहून देवगडचे अंतर सुमारे ३४८ किलोमीटर आहे. पुण्यामधुन देवगडबीच वर जाण्यासाठी खाली मार्ग दिला आहे. या मार्गाने गेल्यास अंदाजे आठ ते बारा तास लागतात. 

पुणे- कोल्हापूर – कणकवली 

रेल्वेने 

पुण्याहून रेल्वेने मुंबईला किंवा कोल्हापूरला जायचे. यानंतर कणकवली रेल्वे स्टेशन वर उतरावे. कणकवली रेल्वे स्टेशन पासून देवगड बीच हा सुमारे ५७ किलोमीटर अंतरावर आहे. 

देवगडला मुंबई हून कसे जायचे?

मुंबई पासून देवगड बीचचे अंतर सुमारे ४२६ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई मधून देवगड बीच वरती जाण्यासाठी खाली मार्ग दिला आहे. 

मुंबई-  पेण – महाड- खेड- संगमेश्वर- राजापूर- देवगड बीच 

रेल्वेने 

देवगड बीचवरती जाण्यासाठी सर्वात्तम महिना 

जून ते सेप्टेंबर 

या महिन्यांमध्ये देवगड बीच वरती मुसळधार पाऊस असतो. यामुळे समुद्र खवलेला असतो. 

ऑक्टोबर ते मार्च 

या महिन्यांमध्ये देवगड बीच वरील हवामान स्वछ असते. त्यामुळे देवगड बीचला भेट देण्यासाठी हे महिने सर्वात्तम आहेत. 

एप्रिल ते मे 

या महिन्यांमध्ये देवगड बीचवरील वातावरण कोरडे असते. 

Tourist Attractions Near Devgad Beach | देवगड बीच जवळील प्रेक्षणीय स्थळे 

देवगड किल्ला 

देवगड किल्ला हा सिंधुदुर्ग पासून सुमारे ७७ किलोमीटर असून तो अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती वसलेला आहे. देवगड किल्ला हा मराठा सम्राजांच्या काळामध्ये बांधलेला होता. समुद्रावर लक्ष्य ठेवण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या देवगड किल्ल्याच्या अवतीभवती मजबूत तटबंदी आणि बुरूज बांधण्यात आलेले आहे. 

या देवगड किल्ल्याच्या जवळच एक दीपग्रह आहे. या दिपग्रहापासून आपल्याला समुद्राचे लांब पर्यंत दृश्ये पाह्यला मिळते. देवगडचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. या आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून पर्यटक या ठिकणी येत असतात. या देवगडच्या किल्ल्याच्या भोवती सुपऱ्या आणि नारळ यांची झाडे आहेत. 

कुणकेश्वर मंदिर 

कुणकेश्वर मंदिर हे सिंधुदुर्गामधील एक आकर्षक आणि प्राचीन शिव मंदिर आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे शिव मंदिर हे शांत वातावरण, सुंदर वास्तुकला आणि धार्मिक महत्त्वामुळे भाविक व पर्यटकांना आकर्षित करते. अनेकजण या मंदिराला कोकणची काशी असेही म्हणतात. या शिव मंदिराची रचना प्राचीन कोकणी आणि दक्षिण भारतीय स्थापत्यशैली मध्ये आहे. मंदिराच्या सभोवतालचा समुद्र, नारळाची झाडे आणि हिरवागार परिसर यामुळे या शिव मंदिराच्या ठिकाणी अत्यंत प्रसन्न वाटते. महाशिवरात्रीच्या काळात येथे मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही भाविक येथे दर्शनासाठी येतात. सूर्यास्ताच्या वेळी येथे दिसणारे दृश्य अत्यंत सुंदर दिसते. 

देवगडचा हापूस आंबा 

देवगडचा हापूस आंबा हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड परिसरात पिकणारा अत्यंत प्रसिद्ध आणि दर्जेदार आंबा आहे. आपल्या गोड चवीमुळे, सुगंधामुळे आणि आकर्षक केशरी रंगामुळे हा आंबा भारतासह परदेशातही मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. कोकणातील हवामान, लाल माती आणि समुद्रकिनारी वातावरण यामुळे देवगडच्या हापूस आंब्याला विशेष चव प्राप्त होते.

या आंब्याचे साल पातळ असून गर अतिशय रसाळ असतो. त्यामुळे खाण्यासाठी हा आंबा सर्वोत्तम मानला जातो. एप्रिल ते जून हा हापूस आंब्याचा मुख्य हंगाम असतो. या काळात देवगड परिसरात आंब्याच्या बागांचे सुंदर दृश्य पाहायला मिळते.

देवगड हापूसला भौगोलिक मानांकन (GI Tag) देखील मिळाले आहे. त्यामुळे या आंब्याची ओळख आणि गुणवत्ता अधिक वाढली आहे. अनेक शेतकरी हापूस आंब्याच्या शेतीवर अवलंबून असून हा व्यवसाय स्थानिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे.

पर्यटक देवगडला भेट दिल्यावर देवगड बीच, देवगड किल्ला आणि आंब्याच्या बागांना भेट देण्याचा आनंद घेतात. उन्हाळ्यात देवगडमध्ये फिरताना ताज्या हापूस आंब्यांचा स्वाद घेणे हा पर्यटकांसाठी खास अनुभव ठरतो.

FAQ

देवगड बीच कशासाठी प्रसिद्ध आहे?

देवगड बीच हा शांत समुद्र किनारा, स्वछ वाळू आणि निळाशार समुद्र याच्यासाठी प्रसिद्ध आहे.

देवगड बीच कुठे आहे?

देवगड बीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे.

देवगड बीच किती स्वच्छ आहे?

हा समुद्रकिनारा खूप स्वच्छ , सुंदर आणि आरामदायी आहे.

Scroll to Top