ढाकोबा किल्ल्याची मराठी माहिती

पुणे जिल्ह्यामधील जुन्नर परिसरामध्ये ढाकोबा किल्ला असून तो पुण्यापासून सुमारे १०८ किलोमीटर आहे. जुन्नर परिसरातील घाटाच्या अगदी कडेला असणारा ढाकोबा हा किल्ला आसपासच्या घाटावर लक्ष्य ठेवत होता. या ढाकोबा किल्ल्याच्या शेजारी कळसुबाई, कुलंग, रतनगड, आजोबा पर्वत,हरिश्चंद्रगड ,जीवधन दुर्गा किल्ला, सिद्धगड, नानाचा अंगठा इत्यादी किल्ले आणि शिखरे पाहण्यासारखे आहेत. ढाकोबा किल्ल्यावरील ट्रेक हा पूर्ण दिवसाचा आहे. ढाकोबा किल्ला हा ट्रेकिंगसाठी मध्यम पातळीचा आहे. तसेच ढाकोबा किल्ल्याचा ट्रेक ट्रेकर्स साठी लोकप्रिय आहे. 

ढाकोबा किल्ल्यावर कसे जायचे?

दुर्गेवाडी मार्गे 

 जुन्नर-आपटाळे मार्गाने जाणाऱ्या बसने तुम्ही ढाकोबा किल्ल्यावर जावू शकता. या जुन्नर-आपटाळे मार्गाने दर तासाला बसेस उपलब्ध आहेत. आंबोळी गावा पर्यंत तुम्हाला खाजगी वाहन उपलब्ध आहे. आंबोळी या गावामधूनच दाऱ्या घाटाकडे जाणारी वाट आहे. या वाटेने पुढे चालत गेल्यास एक गुहा दिसते. या वाटेने आपण पुढे चालत गेल्यास आपल्याला ढाकेश्वरचे मंदिर लागते. 

हातवीज मार्गे   

या वाटेने ढाकोबा किल्ल्यावर जाण्यासाठी महाराष्ट शासनाची बसेस उपलब्ध आहेत. या वाटेने ढाकोबा किल्ल्याच्या पायथ्या गावापर्यंत जाता येते. या वाटेने तुम्ही बसने गेल्यावर हातवीज या गावी उतरावे लागते. हातवीज फाट्यापासून तीन किलोमीटर अंतरावर ढाकोबा किल्ला आहे. या वाटेने ढाकोबा किल्ल्यावर जाण्यासाठी तीन ते चार तास लगतात.

ढाकोबा किल्ला पाहण्यासारखे ठिकाण

ढाकेश्वर मंदिर 

ढाकोबा किल्ला उतरताना एक पठार लागते त्या पठारावरच ढाकेश्वराचे मंदिर आहे. या मंदिरासमोरच समाध्या  आहेत. या मंदिरामध्ये शेंदूर लावलेली दगडाची मूर्ती आहे. या मूर्ती शेजारीच लाकडा मध्ये मुर्त्या कोरलेल्या आहेत. या मंदिरामध्ये पानी साठवण्यासाठी दगडात कोरलेले एक भांडे आहे. तसेच या मंदिराच्या डाव्या बाजूला विहीर आहे. 

Scroll to Top