खांदेरी किल्ल्याची माहिती मराठीत

जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळालेला खांदेरी हा किल्ला मुंबईच्या समोर एका बेटावर बांधललेला आहे. हा खांदेरी किल्ला अलिबाग पासून सुमारे ५.५ किलोमीटर अंतरावर असलेले थळ या गावी आहे. या थळ गावच्या किनारपट्टी पासून सुमारे तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या बेटावर खांदेरी हा किल्ला बांधलेला आहे. तसेच हा खांदेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला आहे. मुंबई पासून सुमारे ११९ किलोमीटर आणि पुण्यापासून सुमारे १४० किलोमीटर अंतरावर खांदेरी किल्ला आहे. १९९८ मध्ये या किल्ल्याचे नाव काह्नोजी आंग्रे असे ठेवण्यात आले होते. 

खांदेरी या किल्ल्यावरील पाहण्यासारखे ठिकाणे 

तटबंदी आणि बुरूज

या खांदेरी किल्ल्यावर आपल्याला थळ या गावच्या किनारपट्टी वरुन बोटाने जाता येते. आताच्या घडीला खांदेरी किल्ला कोसळलेला आहे, परंतु त्याच्या तटबंदी अजूनसुद्धा शाबूत आहेत. या खांदेरी किल्ल्याला एकूण २१ बुरूजे आहेत,आणि या बुरुजाचे बांधकाम दगडांच्या इंटर लॉकिंग पद्धतीने केले जात होते. तसेच या किल्ल्यावर तोफा सुद्धा आहेत. तसेच या खांदेरी किल्ल्यावर एक दोन विहिरी सुद्धा आहेत, म्हणजेच किल्ल्यावर पाणी सुद्धा आहेत. 

वेताळ मंदिर 

या खांदेरी किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे, तसेच हे मंदिर स्थानिक लोकांचे लोकप्रिय आहे. लोककथेनुसार या मंदिरमधील दगडाची पूजा केली जाते आणि हा दरवर्षी आकाराने मोठा होतो. तसेच या मंदिरामध्ये होळीच्या दिवशी मोठा उस्तव असतो. या थळ गावच्या समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमार या वेताळ मंदिरामधील मूर्तीची पूजा केल्यावरच मासेमारीसाठी त्यांच्या बोटी समुद्रात टाकतात. 

धातूचा खडक 

या खांदेरी किल्ल्याच्या जवळील जेट्टीच्या उजव्या बाजूने समोर आल्यानंतर एक खडक आहे. हा खडक दुसऱ्या खडकावर आदल्यास तो खडक धातूचा आवाज करतो. 

दीपग्रह 

ज्या बेटावर खांदेरी किल्ला बांधला आहे, ते बेट समुद्र सपाटी पासून २० ते २५ फुट उंचीवर आहे. बेटाच्या आजूबाजूचा परिसर खडकाळ आहे. समुद्रामधील बोटी या खडकाळा आदळू नये म्हणून येथे एक दीपग्रह उभारण्यात आलेला आहे. हा दीपग्रह सुमारे सतरा मीटर उंच आणि अष्टकोनी आकाराचा आहे. हा दीपग्रह ११ ऑक्टोबर २००७ रोजी मुंबईच्या पोर्ट ट्रस्टने ताब्यात घेतला. हे दीपग्रह सोरऊर्जेवर चालते. त्याची क्षमता पांढऱ्या क्षेत्रासाठी २५ नॅनो मीटर आणि  लाल क्षेत्रासाठी २२ नॅनो मीटर एवढी आहे.   

खांदेरी किल्ल्यावर कसे जायचे?

अलिबागपासून सुमारे ५.५ किलोमीटर अंतरावर थळ हे गाव आहे, आणि या थळ गावा पासून सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर खांदेरी हा किल्ला आहे. तर या थळ गावामधील स्थानिक मच्छिमार आपल्या बोटीने पर्यटकांना बोटीने किल्ल्यावर घेऊन जातात. हवामानाची परिस्थिति पाहून किल्ल्यावर पोहचता येते. 

रस्त्याने 

मुंबई पासून 

मुंबई-जसाई -खारपाडा -पेण-पोयनाड-अलिबाग (११९ किलोमीटर)

पुण्यासाठी 

पुणे-लोणावळा-पेण-अलिबाग (१४७ किलोमीटर)

रेल्वेने 

अलिबाग जवळील थळ या गावासाठी  सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन पेण या ठिकाणी आहे. या पेण रेल्वे स्टेशन पासून टॅक्सीने किंवा ऑटो ने आपण खांदेरी किल्ल्या पर्यंत जाऊ शकतो. 

या खांदेरी किल्ल्यापासून जवळचे पर्यटन स्थळे.  

मांडवा जेट्टी (१५ किलोमीटर)

करमरकर संग्रहालय (10 किलोमीटर)

अलिबाग बीच (5 किलोमीटर)

किहीम बीच (१० किलोमीटर)

FAQ

खांदेरी किल्ला कुठे आहे?

खांदेरी हा किल्ला मुंबईच्या समोर एका बेटावर बांधललेला आहे. हा खांदेरी किल्ला अलिबाग पासून सुमारे ५.५ किलोमीटर अंतरावर थळ गाव आहे. या थळ गावच्या किनारपट्टी पासून सुमारे तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या बेटावर खांदेरी हा किल्ला बांधलेला आहे. 

Scroll to Top