महाराष्ट्रामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अरबी समुद्राच्या किनारी निवती लाइट हाऊस हे एक पर्यटन स्थळ आहे. हे निवती लाइट हाऊस सिंधुदुर्ग पासून सुमारे ४३ किलोमीटर तसेच पुण्यापासून सुमारे ४०२ किलोमीटर तर मुंबई पासून सुमारे ४९० किलोमीटर अंतरावर आहे. हा निवती लाइट हाऊस बर्न आयलंड नावाच्या बेटावर ब्रिटिशांच्या काळामध्ये बांधण्यात आलेला होता. समुद्रमार्गे जाणाऱ्या जहाजांना दिशा दाखवण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी निवती लाइट हाऊस किंवा निवती दीपग्रह बांधण्यात आलेला होता.
Old and new lighthouses | जुने आणि नवीन दीपग्रह
जुन्या दीपगृहाचे बांधकाम ब्रिटीश काळात १८०० च्या दशकात झाले होते. त्या काळी प्रकाश योजना उशिरा पोहोचल्यामुळे तेथे लाकूड जाळून प्रकाश निर्माण केला जात असे, म्हणून याला बर्न आयलंड असेही म्हणतात. नवीन दीपग्रह आहे जे अरबी समुद्रा पासून सुमारे ८ किलोमीटरच्या अंतरावर आहे, आणि ते वेंगुर्ला रॉक्स नावाच्या खडकाळ बेटावर वसलेले आहे.
निवती लाइट हाऊसच्या जवळचे पर्यटन स्थळे
निवती बीच
निवती बीच हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला या शहराजवळ असून तो सिंधुदुर्ग पासून सुमारे ३७ किलोमीटर, मुंबई पासून सुमारे ४८४ किलोमीटर आणि पुण्यापासून सुमारे ३९७ किलोमीटर अंतरावर आहे. हा निवती बीच स्वच्छ, शांत, पांढरी वाळू आणि निळ्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. या निवती बीचवर आपण नारळी बेट, डॉल्फिन सफारी, भोगवे बीच आणि निवती दीपगृह इत्यादी वास्तु पाहू शकतो.
निवती बीच वरती कसे जायचे?
रस्त्याने
निवती बीच हा मुंबई पासून सुमारे ४८४ आणि पुण्यापासून सुमारे ३९७ किलोमीटर अंतरावर आहे. वेंगुर्ला किंवा मालवणमार्गे निवती गावात पोहोचता येते. या निवती गावातून बीचपर्यंत स्थानिक रस्ता आहे.
रेल्वेने
कुडाळ रेल्वे स्टेशन हे निवती बीच पासून जवळचे असून ते सुमारे २६ किलोमीटर अंतरावर आहे. कुडाळ रेल्वे स्टेशन पासून आपण टॅक्सी ने किंवा ऑटो ने निवती बीचवरती जाऊ शकतो.
निवती बीच वरती कोणत्या महिन्यांमध्ये जावे?
पावसाळा (जून ते सप्टेंबर)
या महिन्यांमध्ये निवती बीचच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार असतो. परंतु समुद्र हा खवळलेला असतो.
हिवाळा (ऑक्टोबर ते मार्च)
या महिन्यांमध्ये निवती बीच हा थंडगार असतो. तसेच समुद्र सुद्धा शांत असतो. आपण या महिन्यांमध्ये निवती बीच वरती जाऊ शकतो.
उन्हाळा (एप्रिल ते मे)
या महिन्यांमध्ये निवती बीच वरील तापमान जास्त असते.
Bhogway Beach | भोगवे बीच
भोगवे बीच हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असून ते सिंधदुर्ग पासून सुमारे ४२ किलोमीटर, मुंबई पासून सुमारे ४९२ किलोमीटर तर पुण्यापासून सुमारे ४२१ किलोमीटर अंतरावर आहे. हे भोगवे बीच सौंदर्यासाठी, सोनेरी वाळूसाठी आणि शांत पाण्यासाठी ओळखले जाते. हे भोगवे बीच कार्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमाजवळ आहे.
भोगवे बीच वरती कसे जायचे?
रस्त्याने
मुंबई पासून भोगवे बीच हा सुमारे ४९२ किलोमीटर आहे. तर मुंबई साठी मुंबई – चिपळूण – कणकवली – मालवण – भोगवे हा मार्ग आहे.
पुण्यापासून भोगावे बीच हा सुमारे ४०२ किलोमीटर अंतरावर आहे. तर पुण्यासाठी पुणे – कोल्हापूर – कणकवली – मालवण – भोगवे हा मार्ग सोयीस्कर आहे.
रेल्वेने
कुडाळ रेल्वे स्टेशन भोगवे बीच पासून जवळचे असून ते भोगवे बीच पासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे.
भोगवे बीच वरती कोणत्या महिन्यांमध्ये जावे?
पावसाळा (जून ते सप्टेंबर)
या महिन्यांमध्ये भोगवे बीचच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार असतो. परंतु समुद्र हा खवळलेला असतो.
हिवाळा (ऑक्टोबर ते मार्च)
या महिन्यांमध्ये भोगवे बीच हा थंडगार असतो. तसेच समुद्र सुद्धा शांत असतो. या महिन्यांमध्ये आपण भोगवे बीच वरती जाऊ शकतो.
उन्हाळा (एप्रिल ते मे)
या महिन्यांमध्ये भोगवे बीच वरील तापमान जास्त असते.
Tarkarli Beach | तारकर्ली बीच
महाराष्ट्रा मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली बीच हा सिंधुदुर्ग पासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर आहे. तर मुंबई पासून तारकर्ली बीच सुमारे ४८२ किलोमीटर आणि पुण्यापासून सुमारे ४११ किलोमीटर अंतरावर आहे. तारकर्ली बीच हा समुद्र किनाऱ्यावरील पांढरी वाळू, स्वच्छ पाणी आणि वॉटर स्पोर्ट्स साठी प्रसिद्ध आहे. या तारकर्ली बीचला सात ते आठ किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे.
तारकर्ली बीच वरती कसे जायचे?
रस्त्याने
मुंबईहून तारकर्ली बीच हा सुमारे ४८२ किलोमीटर आणि पुण्यापासून सुमारे ४११ किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वे ने
कुडाळ रेल्वे स्टेशन तारकर्ली बीच पासून जवळचे असून ते बीच पासून सुमारे ३४ किलोमीटर अंतरावर आहे. या कुडाळ रेल्वे स्टेशन पासून आपण टॅक्सीने किंवा ऑटो ने जाऊ शकतो.
तारकर्ली बीच वरती कोणत्या महिन्यांमध्ये जावे?
पावसाळा (जून ते सप्टेंबर)
या महिन्यांमध्ये तारकर्ली बीचच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार असतो. परंतु समुद्र हा खवळलेला असतो.
हिवाळा (ऑक्टोबर ते मार्च)
या महिन्यांमध्ये तारकर्ली बीच हा थंडगार असतो. तसेच समुद्र सुद्धा शांत असतो.
उन्हाळा (एप्रिल ते मे)
या महिन्यांमध्ये तारकर्ली बीच वरील तापमान जास्त असते.
Sindhudurg Fort | सिंधुदुर्ग किल्ला
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किल्ला हा कुरटे या बेटावर पसरला असून तो सुमारे ४८ एकर क्षेत्रफळा मध्ये बांधलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी समुद्रामधील आरमाराचे महत्व ओळखवून २५ नोव्हेंबर १६६४ रोजी हा किल्ला बांधला होता. या सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी हि सुमारे तीन किलोमीटर आहे. या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती ५२ बुरुज आणि ४५ दगडी जिने आहेत. तसेच या किल्ल्यांवर शिवाजी महाराज यांच्या काळामधील गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, दहीविहीर आणि साखर विहीर अशी होती.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर शंकरांच्या रूपातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर आहे. हे मंदिर १६६५ साली छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले आहे. तसेच या किल्लाला २१ जून २०१० मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे, तसेच जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन सुद्धा मिळालेले आहे. सिंधुदुर्ग हा किल्ला पुण्यापासून सुमारे ३६० किलोमीटर तर मुंबई पासून सुमारे ४६० किलोमीटर अंतरावर आहे तर गोव्यापासून सुमारे १२८ किलोमीटर आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्यावरती कधी जावे?
रेल्वे ने
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ सावंतवाडी स्टेशन, कुडाळ स्टेशन आणि कणकवली स्टेशन जवळचे असून ते अनुक्रमे सुमारे ३६, १५ आणि २२ किलोमीटर अंतरावर आहे. आपण रेल्वे ने सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली या रेल्वे स्टेशन पर्यंतच जावू शकतो. या स्टेशन पासून आपण टॅक्सी ने किंवा प्रायवेट गाडीने सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जावू शकतो. या सिंधुदुर्ग शहरामधून आपण बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जावू शकतो.
रस्त्याने
आपण आपल्या शहरामधून टॅक्सीने प्रायवेट गाडीने किंवा महाराष्ट्र शासनाच्या बसने सिंधुदुर्ग शहरा पर्यंत येऊ शकतो. या सिंधुदुर्ग शहरामधून आपण बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जावू शकतो.
सिंधुदुर्ग किल्यावर कोणत्या महिन्यांमध्ये जावे?
पावसाळा (जून ते सप्टेंबर)
या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पावसाळ्यामध्ये मध्ये भरपूर पाऊस असतो त्यामुळे पावसाळ्या मध्ये या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाता येत नाही.
हिवाळा (ऑक्टोबर ते मार्च)
हिवाळ्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये आपण सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊ शकतो.
उन्हाळा (एप्रिल ते मे)
या महिन्यांमधील तापमान हे उष्ण आणि दमट असते. या महिन्यांमध्ये अजिबातच जाऊ नये.
FAQs
निवती लाईटहाऊसला कसे जायचे?
रस्त्याने
निवती बीच हा मुंबई पासून सुमारे ४८४ आणि पुण्यापासून सुमारे ३९७ किलोमीटर अंतरावर आहे. वेंगुर्ला किंवा मालवणमार्गे निवती गावात पोहोचता येते. या निवती गावातून बीचपर्यंत स्थानिक रस्ता आहे.
रेल्वेने
कुडाळ रेल्वे स्टेशन निवती बीच पासून जवळचे असून ते सुमारे २६ किलोमीटर अंतरावर आहे. कुडाळ रेल्वे स्टेशन पासून आपण टॅक्सी ने किंवा ऑटो ने निवती बीचवरती जाऊ शकतो.
भारतातील पहिले दीपगृह कोणते होते?
भारतातील पहिले दीपगृह, महाबलीपुरम दीपगृह , पल्लव राजवंशाच्या काळात इ.स. ६४० मध्ये बांधले गेले.
