महाराष्ट्रामधील सह्याद्री पर्वत रांगामद्धे एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय माळशेज घाट आहे, जो मुंबई पासून सुमारे १६५ किलोमीटर आणि पुण्यापासून सुमारे १२९ किलोमीटर अंतरावर आहे. तसेच हा घाट ठाणे, पुणे आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला आहे. हा माळशेज घाट समुद्रसपाटी पासून सुमारे ७०० मीटर उंचीवर आहे. हा माळशेज घाट पावसाळ्या मधील हिरवाई, हजारो धबधबे, दाट धुके आणि फ्लोमिंगो पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे.
Tourist places around Malshej Ghat | माळशेज घाटच्या आजूबाजूचे पर्यटन स्थळे
हरिश्चंद्र गड
हा हरिश्चंद्र गड अहिल्यानगर ठाणे आणि पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला आहे. हा हरिश्चंद्र गड अहिल्यानगर पासून सुमारे १४७ किलोमीटर अंतरावर आहे. या हरिश्चंद्र किल्ल्यांची उंची सुमारे ४६९१ फुट एवढी आहे. या हरिश्चंद्र गडावर आदिवासी आणि कोळी समाजांच्या वस्त्या आहेत. कलचुरी राज वंशाच्या काळामध्ये हरिश्चंद्र किल्ला बांधला होता.
माळशेज घाटातील धबधबे
माळशेज घाटामद्धे अनेक धबधबे आहेत, आणि हे धबधबे पावसाळ्यामध्ये जीवंत होतात. प्रामुख्याने जून ते सेप्टेंबर या महिन्यांमध्ये मुसळधार पाऊस असतो. याच महिन्यांमध्ये असंख्य धबधबे कोसळताना दिसतात. काही धबधबे रस्त्याच्या अगदी जवळ असतात, तर काही उंच कड्यांवरून खाली दरीत झेप घेताना दिसतात.
पिंपळ गाव जोगे धरण
पिंपळ गाव जोगे धरण हे पुष्पावती नदीवर वसलेले आहे. हे धरण पक्षी निरक्षकांसाठी एक शांत स्थळ आहे. या धरणांच्या ठिकाणी पावसाळा आणि हिवाळा ऋतुमद्धे स्थलांतरित पक्ष्यांची रेलचेल सुरू असते. या धरणांमद्धे फ्लेमिंगो, क्रेन्स आणि कॉर्मोरंट्स इत्यादी पक्षी पहायला मिळतात.
फ्लेमिंगो पॉइंट
फ्लेमिंगो पॉइंट हा माळशेज घाटातील एक ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक विदेशी पक्षी आणि फ्लेमिंगो पक्षी येथे येत असतात. यासोबतच बटेर, कोकीळ, अल्पाइन स्विफ्टसारखे अनेक दुर्मिळ पक्षी येथे पहायला मिळतात, ज्यामुळे पक्षीनिरीक्षक आणि छायाचित्रकारांसाठी हे आवडीचे स्थळ आहे.
कुकडेश्वर मंदिर
कुकडेश्वर मंदिर हे कुकडी नदीच्या काठावर वसलेले आहे. कुकडेश्वर मंदिर हे एक प्राचीन मंदिर असून ते शिव मंदिर आहे. हे कुकडेश्वर मंदिराला सुमारे ८०० ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या कुकडेश्वर मंदिराची शिल्पकला हेमाड पंतीची आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या काळात येथे मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होते.
आजोबा डोंगर
माळशेज घाटामधील आजोबा डोंगर हा सह्याद्रीच्या रांगामधील ऐतिहासिक महत्व असलेला डोंगर आहे. आजोबा डोंगराची उंची सुमारे फुट एवढी आहे. या आजोबा डोंगराच्या परिसरामध्ये दाट जंगल हिरवीगार वनराई धबधबे आणि शांत वातावरण आढळते.
आजोब डोंगराळा धार्मिक महत्व सुद्धा आहे.भगवान रामायणातील ऋषी वाल्मीकींचे आश्रम या आजोबा डोंगरावर होते. तसेच येथे लव आणि कुश यांच्याशी संबंधित काही कथाही सांगितल्या जातात. त्यामुळेच अनेक भावी या आजोबा डोंगराळा भेट देत असतात.
या माळशेज घाटामधील आजोबा डोंगरावर ट्रेकिंग करणे थोडेसे अवघड आहे. या आजोबा डोंगरावर ट्रेकिंग फक्त साहसी लोकच करू शकतात ,कारण या आजोबा दोनरच्या ट्रेकिंमधील मार्गामध्ये अरुंद वाट, खडकाळ चढ आणि घनदाट जंगल आहे.
माळशेज घाटामद्धे करणसारख्या गोष्टी
पक्षी निरीक्षण
सह्याद्री पर्वत रांगामधील माळशेज घाट हा निसर्गसंपन्न आणि जैवविविधतेने समृद्ध परिसर आहे. तसेच या माळशेज घाटावरील पक्षी निरीक्षण हा एक अत्यंत लोकप्रिय उपक्रम मनाला जातो. या माळशेज घाटा मध्ये हिरव्यागार दऱ्या, घनदाट जंगल आणि जलस्रोतांमुळे अनेक स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांना येथे आश्रय मिळतो.
माळशेज घाटामध्ये पावसाळा आणि हिवाळ्यामद्धे अनेक परदेशी पक्षी या माळशेज घाटामध्ये येत असतात तुम्हाला पक्षी पाहण्याचा आनंद घायचा असेल तर तुम्ही पावसाळा आणि हिवाळ्यामद्धे माळशेज घाटाला नक्की भेट द्या.
आपण पक्षी निरीक्षण करत असताना शांतता राखणे, दूरबीन वापरणे आणि पक्ष्यांना त्रास न देणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. सकाळच्या वेळेत पक्ष्यांची हालचाल अधिक असल्यामुळे हा वेळ निरीक्षणासाठी उत्तम मानला जातो.
कॅम्पिंग
माळशेज घाट हा निसर्गरम्य परिसर कॅम्पिंगसाठी (Camping) अतिशय योग्य ठिकाण मानला जातो. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला हा घाट शांतता, स्वच्छ हवा आणि सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या गोंधळापासून दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी येथे अनेक पर्यटक कॅम्पिंगचा अनुभव घेतात.
माळशेज घाटात कॅम्पिंग करताना हिरव्यागार दऱ्या, उंच डोंगर, धबधबे आणि धुक्याने भरलेले वातावरण अनुभवायला मिळते. विशेषतः पावसाळ्यात येथे कॅम्पिंगचा आनंद अधिक वाढतो, कारण त्या वेळी परिसर पूर्णपणे हिरवागार होतो आणि लहान-मोठे धबधबे वाहू लागतात. रात्रीच्या वेळी आकाशात चमकणारे तारे आणि शांत वातावरण मनाला एक वेगळाच आनंद देतात.
येथे काही ठिकाणी स्थानिक कॅम्पिंग साइट्स किंवा टेंटची सोय उपलब्ध असते. तसेच स्वतःचा टेंट घेऊनही कॅम्पिंग करता येते, पण सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्न, पाणी, टॉर्च, प्राथमिक उपचार पेटी यांसारख्या आवश्यक वस्तू सोबत ठेवाव्यात.
एकंदरीत, माळशेज घाटातील कॅम्पिंग हा निसर्गाशी जवळीक साधण्याचा आणि मनाला शांतता देणारा एक सुंदर अनुभव आहे. त्यामुळे साहसी आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण नक्कीच आकर्षक आहे.
छायाचित्रण
माळशेज घाट हा छायाचित्रणासाठी लोकप्रिय ठिकाण मानले जाते. माळशेज घाट हा सहयादरच्या पर्वत रांगेमद्धे वसलेला असून तो निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याने भरलेला आहे. या माळशेज घाटावरील उंच डोंगर, खोल दऱ्या, धबधबे आणि धुक्याने वेढलेले दृश्य छायाचित्रकारांना वेगळा अनुभव देतात.
पावसाळा या ऋतुमध्ये मालशेज घाट हा अधिक खुळून दिसते. कारण, पावसाळ्यामुळे सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. पावसाळ्यामध्ये माळशेज घाटावरील अनेक लहान मोठे धबधबे वाहू लागतात. या पावसाळ्या ऋतुमध्ये माळशेज घाटावरील घेतलेले फोटो अत्यंत आकर्षक आणि जिवंत वाटतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी आकाशातील रंगछटा आणि डोंगरांवरील प्रकाशछाया यामुळे छायाचित्रणासाठी उत्तम संधी मिळते.
येथे वन्यजीव आणि पक्ष्यांचेही सुंदर फोटो काढता येतात. धुक्यामुळे आणि बदलत्या हवामानामुळे प्रत्येक क्षण वेगळा दिसतो, त्यामुळे छायाचित्रकारांना नवीन फ्रेम्स मिळतात. मात्र, छायाचित्रण करताना सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः पावसाळ्यात घसरडी ठिकाणे टाळावीत.
एकंदरीत, माळशेज घाट हा निसर्ग छायाचित्रणासाठी स्वर्गच आहे. येथे येऊन प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो.
How to get to Malshej Ghat? | माळशेज घाटावर कसे जायचे?
रेल्वेने
कल्याण रेल्वे स्टेशन माळशेज घाटापासून जवळचे असून ते सुमारे ८६ किलोमीटर अंतरावर आहे. या रेल्वे स्टेशन पासून आपण टॅक्सीने, ऑटोने किंवा प्रायवेट गाडीने जाऊ शकतो.
रस्त्याने
मुंबईसाठी
मुंबई → कल्याण → मुरबाड → माळशेज घाट या मार्गांनी तुम्ही माळशेज घाटावर पोहचवू शकता.
पुणेसाठी
पुणे → चाकण → नारायणगाव → जुन्नर → माळशेज घाट या मार्गांनी तुम्ही माळशेज घाटावर पोहचवू शकता.
माळशेज घाटावर जाण्यासाठी सर्वात्तम महिना
पावसाळा (जून ते सेप्टेंबर)
या महिन्यांमध्ये पावसाळ्यामुळे आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला असतो. हा ऋतु निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि ट्रेकर्ससाठी सर्वोत्तम मानला जातो.
हिवाळ्यात (ऑक्टोबर ते फेब्रुवारी)
या महिन्यांमधील वातावरण थंड आणि ट्रेकिंग साठी तसेच ट्रेकर्स साठी सर्वात्तम मानले जाते. तसेच सहलींसाठी सुद्धा हे महीने सर्वात्तम आहेत.
उन्हाळा (मार्च ते मे)
या महिन्यांमधील वातावरण उष्ण आणि दमट असते. या महिन्यांमध्ये अजिबात फिरायला जाऊ नये.
FAQs
माळशेज घाटाला भेट देण्यासाठी सर्वात चांगली वेळ कोणती आहे?
जुलै ते ऑक्टोबर हे महिने माळशेज घाटाला भेट देण्यासाठी सर्वात चांगले आहेत.
कोणते रेल्वे स्टेशन माळशेज घाटाच्या जवळ आहे?
कल्याण जंक्शन हे माळशेज घाटाच्या जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
पुण्यापासून माळशेज घाट किती अंतरावर आहे?
पुण्यापासून माळशेज घाट सुमारे १४४ किलोमीटर अंतरावर आहे.
माळशेज घाटासाठी एक दिवस पुरेसा आहे का?
एका दिवसाची सोपी सहल अप्रतिम असते – घाटावर गाडी चालवत जा, एमटीडीसी रिसॉर्टमध्ये अल्पोपहार करा, रिसॉर्टजवळील विशाल कड्याचा अनुभव घ्या आणि त्या ठिकाणाच्या आठवणीत रमून रस्त्याने परत फिरा. हो, आपले डोळे रस्त्यावरच ठेवण्याचा प्रयत्न करा. सुदैवाने मला रिसॉर्टमध्ये खोल्या मिळाल्या आणि रात्रीचा मुक्काम खूपच छान होता!
