लिंगमळा धबधबा | Lingmala Waterfall Information In Marathi

महाराष्ट्र राज्यामधील महाबळेश्वर या ठिकाणी असणारा लिंगमळा धबधबा हा महाबळेश्वर बस स्थानकापासून सुमारे ६.१ किलोमीटर अंतरावर आहे. लिंगमळा धबधबा हा पुण्यापासून सुमारे ११७ किलोमीटर अंतरावर आणि मुंबई पासून सुमारे २३१ किलोमीटर अंतरावर आहे. महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री अशा पाच नद्यांचा उगमस्थान आहे. 

या पाच नद्यांपेकी वेण्णा नदी हि बाकीच्या चारी नद्यांच्या गोमुखातून वाहते. पुढे या नद्या एकत्र येऊन एक सरोवराची निर्मिती होते.याच सरोवराला वेण्णा लेक असे म्हणतात. या सरोवरातून पाणी वाहत जाऊन जवळ असलेल्या लिंगमळा धबधब्यावरून खाली दरीत कोसळते. यामुळेच लिंगमळा धबधब्याला वेण्णा लेक असेही म्हणतात. 

How do I get there? | कसे जायचे?

रेल्वेने 

लिंगमळा धबधब्यापासून जवळचे रेल्वे स्टेशन सातारा या ठिकाणी आहे. सातारा रेल्वे स्टेशन पासून लिंगमळा धबधबा हा सुमारे ६०.६  किलोमीटर अंतरावर आहे. स्तर रेल्वे स्टेशन पासून आपण ऑटो ने टॅक्सी ने किंवा प्रायवेट  गाडीने सुद्धा जाऊ शकतो. 

बसने 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस पुणे, मुंबई आणि सातारा येथून महाबळेश्वरसाठी उपलब्ध आहेत. महाबळेश्वर बसस्थानकावरून टॅक्सी किंवा स्थानिक वाहनाने धबधब्यापर्यंत पोहोचता येते.

खासगी वाहनाने

महाबळेश्वर–पुणे रस्त्यावरून लिंगमळा धबधब्यापर्यंत थेट जाता येते. धबधब्याजवळ पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. पार्किंगपासून धबधबा पाहण्यासाठी थोडे अंतर पायी चालावे लागते.

लिंगमळा धबधब्यावर जाण्यासाठी सर्वात्तम काळ 

पावसाळा (जून ते सप्टेंबर)

लिंगमळा धबधबा पाहण्यासाठी पावसाळा हा सर्वोत्तम ऋतू आहे. या काळात धबधब्यातील पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढतो. उंच कड्यावरून कोसळणारे पांढरेशुभ्र पाणी, दाट धुके आणि हिरवाईने भरलेला परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. 

हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी)

हिवाळ्यात महाबळेश्वरचे हवामान थंड असते. धबधब्यातील पाण्याचा प्रवाह पावसाळ्याच्या तुलनेत कमी असला तरी परिसरातील हिरवाई कायम असते. 

 उन्हाळा (मार्च ते मे)

उन्हाळ्यात लिंगमळा धबधब्यातील पाण्याचा प्रवाह खूप कमी होतो. काही वेळा धबधबा जवळपास कोरडा देखील पडतो. मात्र, महाबळेश्वरचे थंड हवामान आणि आसपासची पर्यटनस्थळे पाहण्यासाठी हा काळ योग्य ठरतो. 

Tourist spot near Lingmala | लिंगमाळेच्या जवळील पर्यटन स्थळ

केटस पॉइंट 

महाबळेश्वर मधील केटस पॉइंट हा एक प्रसिद्ध आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. महाबळेश्वर या शहरापासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर केटस पॉइंट हे पर्यटन स्थळ आहे. केटस हे पर्यटन स्थळ समुद्र सपाटी पासून सुमारे १२९० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथून सह्याद्री पर्वतरांगा, हिरव्यागार दऱ्या आणि कृष्णा खोऱ्याचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. 

या ठिकाणाचे नाव ब्रिटिश गव्हर्नर सर जॉन मॅल्कम यांची मुलगी केट हिच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. केट्स पॉइंटचे प्रमुख आकर्षण म्हणजे  एलिफंट्स हेड पॉइंट किंवा  नीडल होल पॉइंट. हा नैसर्गिक खडक हत्तीच्या डोक्यासारखा दिसत असल्यामुळे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरतो. पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंमध्ये येथील सौंदर्य अधिक खुलून दिसते.

आर्थर सीट

आर्थर सीट हे महाबळेश्वरमधील सर्वात प्रसिद्ध आणि आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले हे व्ह्यूपॉइंट समुद्रसपाटीपासून सुमारे १३४० मीटर उंचीवर स्थित आहे. येथून सावित्री नदीचे खोरे, दाट जंगले आणि खोल दऱ्यांचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. या ठिकाणाला महाबळेश्वरची राणी असेही संबोधले जाते.

आर्थर सीट हे नाव सर आर्थर मॅलेट यांच्या नावावरून देण्यात आले आहे.असे सांगितले जाते की, सर आर्थर मॅलेट यांची पत्नी आणि मुलाच्या निधनानंतर सर आर्थर मॅलेट येथे बसून सावित्री नदीच्या दिशेने बराच वेळ घालवत असत. त्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.

पंचगंगा मंदिर

पंचगंगा मंदिर हे महाबळेश्वर मधील एक प्राचीन आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिवाला 

समर्पित असून महाबळेश्वर मंदिरा जवळ वसलेले आहे. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे पाच पवित्र नद्या आहेत. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री अशा या नद्यांची नवे आहेत. या पाच नद्यांचा उगम या मंदिरामधून झालेला आहे.त्यामुळे या मंदिराला पंचगंगा मंदिर असे नाव देण्यात आले आहे.

हे मंदिर प्राचीन हेमाडपंथी वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. मंदिरातील दगडी बांधकाम, कोरीवकाम आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. मंदिराच्या गाभाऱ्यातील गोमुखातून सतत पाणी वाहताना पाहायला मिळते, जे पाच नद्यांचे प्रतीक मानले जाते.

दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक या मंदिराला भेट देतात. महाशिवरात्री आणि इतर धार्मिक सणांच्या काळात येथे विशेष गर्दी असते. धार्मिक महत्त्वाबरोबरच हे ठिकाण इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे.

FAQ

लिंगमळा धबधबा कुठे आहे?

महाराष्ट्र राज्यामधील महाबळेश्वर या ठिकाणी असणारा लिंगमळा धबधबा हा महाबळेश्वर बस स्थानकापासून सुमारे ६.१ किलोमीटर अंतरावर आहे.

लिंगमळा धबधब्याजवळ प्रवेश शुल्क आहे का?

होय, लिंगमळा धबधब्याच्या परिसरात प्रवेशासाठी नाममात्र शुल्क आकारले जाऊ शकते.

लिंगमळा धबधब्यावर ट्रेकिंग करता येते का?

होय, धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी छोटा आणि निसर्गरम्य पायी मार्ग आहे, ज्याचा पर्यटक आनंद घेतात.

लिंगमळा धबधब्याजवळ पार्किंगची सुविधा आहे का?

होय, धबधब्याजवळ पर्यटकांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे.

Scroll to Top