महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यामध्ये ठोसेघर हा धबधबा असून तो सातारा पासून सुमारे १४० किलोमीतर आणि ठोसेघर गावापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे. हा एक निसर्ग रम्य धबधबा असून तो अनेक टप्प्यांमध्ये वाहतो. या ठोसेघर धबधबा मधील जो सर्वात उंच धबधबा आहे तो २०० मीटर उंचीवरुन वाहतो.
तो भारतामधील सर्वात उंच धबधब्यांपेकी एक मनाला जातो. पावसाळ्यात, जुलै ते नोव्हेंबर दरम्यान, हा परिसर हिरव्यागार जंगलांनी नटलेला असतो आणि धबधब्याचा प्रवाह पूर्ण ताकदीने वाहत असतो.
त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गासारखे भासते. येथे एक नीट बांधलेला व्यू पॉइंट आहे, जिथून धबधब्याचे अद्भुत दृश्य सुरक्षितपणे पाहता येते. सातार्याहून येथे सहज पोहोचता येते.
निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवायचा असल्यास येथे पिकनिक स्पॉट्सही उपलब्ध आहेत. ठोसेघर धबधबा हा निसर्गप्रेमी आणि शांतता शोधणाऱ्या पर्यटकांसाठी एक परिपूर्ण पर्यटनस्थळ आहे, जिथे महाराष्ट्राच्या निसर्गसंपन्नतेचा आनंद घेता येतो.
Where is Thoseghar Waterfall? | ठोसेघर धबधबा कुठे आहे?
महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यामध्ये ठोसेघर हा धबधबा असून तो सातारा शहरा पासून सुमारे १४० किलोमीटर आणि ठोसेघर गावापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे.
कसे जायचे?
रेल्वे स्टेशन
ठोसेघर धबधब्याच्या जवळचे रेल्वे स्टेशन हे सातारा या ठिकाणी असून ते ठोसेघर धबधब्यापासून सुमारे ३१.३ किलोमीटर अंतरावर आहे.
रस्त्याने
पुण्यामधून ठोसेघर धबधब्यावर कसे जायचे, याचा मार्ग खाली दिला आहे.
पुणे → खेद शिवापूर → नसरापुर → शिरवळ → धनगर वाडी → खंडाळा → ठोसेघर धबधबा
मुंबई मधून ठोसेघर धबधब्यावर कसे जायचे, याचा मार्ग खाली दिला आहे.
मुंबई → विचुंबे → खालापूर → खोपोली → लोणावळा → तळेगाव दाभाडे → शिरवळ → सातारा → ठोसेघर धबधबा
ठोसेघर धबधबा भेट देण्यासाठी सर्वात्तम काळ
जुले ते नोव्हेंबेर
या महिन्यांमध्ये या ठोसेघर धबधब्याच्या ठिकाणी पाऊस असतो. यामुळेच या महिन्यांमध्ये हा धबधबा पाहण्यासाठी सर्वात्तम आहे.
डिसेंबर ते फेब्रुवारी
या महिन्यांमध्ये ठोसेघर धबधबाच्या ठिकाणी भरपूर थंडी असते.
मार्च ते जून
या महिन्यांमध्ये ठोसेघर धबधबाच्या ठिकाणी भरपूर ऊन असते त्यामुळे या महिन्यांमध्ये जाऊ नये.
Tourist attractions near Thoseghar Waterfall | ठोसेघर धबधब्याच्या जवळील पर्यटन स्थळे
कास पठार
कास पठार हे सातारा जिल्ह्यामध्ये असून ते सातारा पासून सुमारे २३.७ किलोमीटर अंतरावर आहे. कास पठार लाच पूलांचे पठार या नावाने सुद्धा ओळखले जाते. या कास पठारला फोटोग्राफर आणि पर्यटक मोठ्या संखेने भेट देतात. कास पठार हे जेवविविधतेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वत रांगेमद्धे वसलेले कास पठार हे सुमारे १२०० मीटर उंचीवर वसलेले आहे.
तसेच हे पावसाळ्यामध्ये रंगीबेरंगी फुलांनी भरून जाते. कास पठाराला २०१२ मध्ये युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. येथे निसर्गप्रेमी, फोटोग्राफर आणि पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात.
पठारावरील विविध फुलांच्या प्रजाती, लहान तळी आणि हिरवागार परिसर पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी येथे काही नियम लागू करण्यात आले आहेत. निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी कास पठार हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते.
सज्जन गड
सज्जनगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3,300 फूट उंचीवर वसलेला हा गड समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे विशेष प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना हा गड राहण्यासाठी दिला होता. त्यामुळे सज्जनगडाला मराठी इतिहासात आणि अध्यात्मिक परंपरेत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
गडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी असून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. गडावरील मंदिर, समाधीस्थान आणि शांत वातावरण पर्यटकांना अध्यात्मिक अनुभव देते. सज्जनगडावरून सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि आसपासचा निसर्गरम्य परिसर पाहता येतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथील सौंदर्य अधिक खुलून दिसते.
अजिंक्यतारा किल्ला
अजिंक्यतारा किल्ला हा सातारा शहरातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला असून मराठा साम्राज्याच्या इतिहासात त्याला विशेष महत्त्व आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3,300 फूट उंचीवर वसलेला हा किल्ला सातारा शहराच्या मध्यभागी डोंगरमाथ्यावर वसलेला आहे. अजिंक्यतारा म्हणजे अजिंक्य तारा किंवा कधीही जिंकता न येणारा तारा, असे या नावाचा अर्थ मानला जातो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७३ मध्ये हा किल्ला आदिलशाही कडून जिंकला होता.पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात सातारा हि मराठा साम्राज्याची राजधानी बनली आणि अजिंक्यतारा किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक अवशेष, बुरुज, प्रवेशद्वारे आणि पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात.
किल्ल्याच्या माथ्यावरून संपूर्ण सातारा शहर, कास पठार, सज्जनगड आणि आसपासच्या सह्याद्री पर्वतरांगांचे सुंदर दृश्य पाहता येते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी येथील निसर्गसौंदर्य अधिक खुलून दिसते. त्यामुळे इतिहासप्रेमी, ट्रेकर्स आणि फोटोग्राफर मोठ्या संख्येने येथे भेट देतात.
पावसाळा आणि हिवाळा हे अजिंक्यतारा किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम ऋतू मानले जातात. इतिहास, साहस आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर अजिंक्यतारा किल्ला हे साताऱ्यातील एक अवश्य भेट द्यावे असे पर्यटनस्थळ आहे.
कण्हेर धरण
कण्हेर धरण हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आणि निसर्गरम्य धरण आहे. कण्हेर नदीवर बांधण्यात आलेले हे धरण सातारा शहरापासून काही अंतरावर सह्याद्रीच्या सुंदर पर्वतरांगांच्या सान्निध्यात वसलेले आहे. परिसरातील हिरवाई, शांत वातावरण आणि जलाशयाचे सुंदर दृश्य यामुळे हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते.
कण्हेर धरणाचे मुख्य उद्दिष्ट सिंचन आणि पाणीपुरवठा असले तरी ते आज एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणूनही ओळखले जाते. पावसाळ्यात धरण पूर्ण भरल्यानंतर त्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. धरणाच्या जलाशयात साठलेले निळेशार पाणी आणि त्याभोवतीची हिरवीगार डोंगररांग मनाला प्रसन्न करणारा अनुभव देते. अनेक पर्यटक येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, फोटोग्राफी आणि कुटुंबासह सहलीसाठी भेट देतात.
हिवाळ्यातही कण्हेर धरणाचा परिसर अतिशय रमणीय दिसतो. सकाळच्या वेळी जलाशयावर पसरलेले धुके आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. पक्षीनिरीक्षणाची आवड असणाऱ्यांसाठीही हे ठिकाण उत्तम मानले जाते.
FAQ
ठोसेघर धबधबा कुठे आहे?
महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यामध्ये ठोसेघर हा धबधबा असून तो सातारा पासून सुमारे १४० किलोमीटर आणि ठोसेघर गावापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे.
ठोसेघर धबधब्यावर काय पहायचे?
या ठोसेघर धबधब्याच्या ठिकाणी दोन झरे आहेत. छोटा आणि मोठा झरा.
ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी प्रवेश शुल्क आहे का?
हो सुमारे पन्नास रुपये शुल्क आहे.
