लोणावळा हे महाराष्ट्रा मधील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. लोणावळा हे हिल स्टेशन पुण्यापासून सुमारे ६९.७ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे १०१ किलोमीटर अंतरावर आहे. लोणावळा हे ठिकाण पुणे आणि मुंबई यांच्या दरम्यान वसलेले आहे. लोणावळा मध्ये आपल्याला हिरवेगार डोंगर, धबधबे आणि थंड हवामान यांसारख्या गोष्टी अनुभवता येतील. लोणावळा या ठिकाणी भुशी धरण, कार्ला लेणी आणि टायगर पॉइंट हि पाहण्यासारखे ठिकाणे आहेत.
How to get to Lonavala? | लोणावळ्याला कसे जायचे?
लोकल ट्रेन
पुण्यामधून लोकल ट्रेनने लोणावळ्याला जाण्यासाठी सकाळी साडेपाच ते साडेसहा च्या दारमुयन लोकल ट्रेन आहे. त्यानानंतर दर एक दोन तासाला लोकल ट्रेन उपलब्ध आहे. पुण्यामधून लोणावळ्याला जाण्यासाठी शेवटची लोकल ट्रेन आठ ते नऊच्या दरम्यान आहे.
पुण्यामधून लोणावळा जाण्यासाठी लोकल ट्रेनचा मार्ग खाली दिला आहे.
पुणे स्टेशन – मळवली – लोणावळा
पुणे ते लोणावळा कॅब
आपल्याला पुण्यामधून लोणावळ्याला जाण्यासाठी कॅब सुद्धा मिळते.
The best month to visit Lonavala | लोणावळ्याला जाण्यासाठी सर्वात्तम महिना
पावसाळा (जून – सप्टेंबर)
पावसाळ्यामध्ये लोणावळा पूर्णपणे हिरवागार असतो. लोणावळ्यामधील धबधबे आणि नद्या भरून वाहतात. भुशी धरणावर पाण्याचा जबरदस्त प्रवाह दिसतो.
हिवाळा (ऑक्टोबर – फेब्रुवारी)
लोणावळ्यामद्धे या महिन्यांत हवामान थंड असते. तसेच हे महिने ट्रेकिंग साठी बेस्ट आहेत.
उन्हाळा (मार्च – मे)
लोणावळ्यामद्धे या महिन्यांत तापमान जास्त असते. तसेच निसर्ग सुद्धा कोरडा असतो. या महिन्यांमध्ये लोणावळ्याला जाण्यासाठी टाळावे.
Places to Visit | पाहण्यासारखे ठिकाणे
टायगर पॉइंट
टायगर पॉइंट हा लोणावळ्यामद्धे उंच कड्यावर वसलेले ठिकाण आहे. या टायगर पॉइंट वरुन आपल्याला खोल दऱ्या, हिरवीगार टेकड्या पाहता येतात. तसेच ढगांमध्ये हरवलेले निसर्गदृश्य सुद्धा अनुभवता येते. या टायगर पॉइंट वरून आपण धुक्याने झकलेले डोंगर सुद्धा पाहू शकतो.
टायगर पॉइंट हे फोटोग्राफीसाठी देखील खूप लोकप्रिय आहे. अनेक पर्यटक येथे सेल्फी आणि निसर्गाचे फोटो काढण्यासाठी येतात. येथे स्थानिक स्टॉल्सवर गरम चहा, भजी आणि मक्याचा आस्वाद घेता येतो, ज्यामुळे प्रवासाचा आनंद आणखी वाढतो.
हे ठिकाण कुटुंब, मित्र किंवा कपल्ससाठी एक दिवसाच्या सहलीसाठी उत्तम आहे. मात्र, कड्याजवळ जाताना काळजी घेणे आवश्यक आहे कारण ते खूप खोल आणि धोकादायक असू शकते.
भुशी धरण
लोणावळया मधील भुशी धरण हे सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. इंद्रायणी नदीवर भुशी धरण बांधलेले आहे. पावसाळ्यामध्ये हे धरण भरून वाहते.
पावसाळ्यामध्ये भुशी धरणाला अनेक पर्यटक भेट देत असतात. पर्यटक धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यात बसणे, खेळणे आणि निसर्गाचा आनंद घेणे इत्यादी खेळ खेळत असतात. या भुशी धरणाच्या आजूबाजूला हिरवीगार दरी आहेत तसेच या ठिकाणाचे हवामान थंड आहे. त्यामुळे पर्यटकांना या ठिकाणी जास्त वेळ घालू वाटतो.
भुशी धरण हे मित्रांसोबत, कुटुंबासोबत किंवा ट्रेकिंगच्या ग्रुप सोबत एका दिवसाची सहल करण्यासाठी उत्तम पर्यटन स्थळ आहे. तसेच या ठिकाणी आपण फोटो किंवा सेल्फी सुद्धा काढू शकतो.
दुपारचे जेवणा मध्ये स्थानिक पदार्थांचा आस्वाद
या लोणावळ्यामद्धे जोगोजागी खायचे स्टॉल लावलेले आहेत. तसेच लोणावळा या ठिकाणी फॅमिली रेस्टॉरंट सुद्धा आहेत, जय ठिकाणी आपण कुटुंबासोबत जेवू शकतो.
कार्ला गुहा
लोणावळ्याच्या जवळील कार्ला गुहा या अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. कार्ला गुहा सुमारे दुसऱ्या शतकामध्ये बांधल्या आहेत. या कार्ला गुहा बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. या कार्ला गुहा पर्यंत जण्यासाठी थोडा चढाव करावा लागतो, परंतु वर पोहोचल्यानंतर दिसणारा निसर्ग आणि परिसर खूपच सुंदर आहे. पर्यटक आणि फोटोग्राफी आवडणाऱ्यांसाठी हे ठिकाण एकदम योग्य आहे.
या कार्ला गुहांमधील चैत्यगृह महणजे प्रार्थना हॉल हे एक सुंदर वास्तु आसून पर्यटक याच पार्थना हॉल कडे आकर्षित होतात. या गुहांमध्ये आपल्याला सुंदर कोरीव काम, स्तंभ आणि शिल्पकला पाहायला मिळते.
तुम्ही दुपारनंतर लोणावळ्याच्या रस्तावरची खरेदी
लोणावळ्याच्या रस्त्यांवरून फेरफटका मारा. या शहराचे अनोखे आकर्षण येथील स्थानिक बाजारपेठांमध्ये दिसून येते, जिथे तुम्ही चिक्की, स्ट्रॉबेरी, स्थानिक मसाले, फज, कोल्हापुरी पादत्राणे, सेंद्रिय मध, सुगंधी तेल आणि हस्तकला वस्तू खरेदी करू शकता
संध्याकाळ सनसेट पॉइंट
लोणावळ्यातील संध्याकाळ अनुभवण्यासाठी सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे सनसेट पॉइंट, ज्यामध्ये विशेषतः टायगर पॉइंट याचा समावेश होतो. टायगर पॉइंट हे ठिकाण उंच डोंगरांवर वसलेले आहे. येथून सूर्यास्ताचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते.
संध्याकाळी सूर्य हळूहळू डोंगरांच्या मागे मावळताना आकाशात केशरी, गुलाबी आणि जांभळ्या रंगांची उधळण होते, हे दृश्य पाहून मन आनंदी होते. पावसाळ्यात या ठिकाणी धुके असते. ज्यामुळे संपूर्ण परिसर अधिकच आकर्षक वाटतो. थंड वारा, शांत वातावरण आणि निसर्गाचे सौंदर्य यामुळे पर्यटक येथे बराच वेळ घालवतात.
या ठिकाणी स्थानिक विक्रेत्यांकडून गरम चहा, भजी, मक्याचा आस्वाद घेत सूर्यास्त पाहण्याचा अनुभव खूप खास असतो. कुटुंब, मित्र किंवा जोडप्यांसाठी हि एक उत्तम जागा आहे. मात्र, कड्याजवळ उभे राहताना काळजी घेणे आवश्यक आहे, कारण दऱ्या खूप खोल आहेत.
