सह्याद्री पर्वतरांगेच्या मावळ प्रांतामद्धे वसलेल्या रायगड हा किल्ला पुण्यापासून सुमारे १३४ किलोमीटर आहे. रायगड हा किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये येत असून तो रायगड शहरापासून सुमारे ५.६ किलोमीटर वर आहे. या रायगड किल्ल्यावरती पाचाडचा जिजाबाईंचा वाडा खुबलढा बुरूज नाना दरवाजा, महादरवाजा, चोर दिंडी, हत्ती तलाव, गंगा सागर तलाव, पळखो दरवाजा मेणा दरवाजा, राजसभा नगारखाना, बाजार पेठा इत्यादी ठिकाणे पाहण्यासारखे आहेत. रायगड हा किल्ला समुद्र सपाटी पासून सुमारे ८२० मीटर उंचीवर आहे. रायगड या किल्ल्याचे जुने नाव रायरी असे होते. युरोपचे लोक या किल्ल्याला जिब्राल्टर असे म्हणत. रायगड किल्ल्याचे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मावळा हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखेखाली झाले आहे. १६७४ मध्ये राज्याभिषेक झाल्यानंतर रायगड हा किल्ला महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून निवडला. इंग्रजांनी रायगड हा किल्ला १८१८ साली जिंकला.
रायगड किल्ल्यावर कसे पोहचायचे?
रायगड किल्ल्याच्या पायथ्या गावाचे नाव पाचाड आहे. पुण्यापासून टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने आपण रायगड या किल्ल्याच्या पायथ्या गावला जावू शकतो. आपण पुण्यापासून खाजगी वाहनाने किंवा टॅक्सीने रायगड या किल्ल्यावर जावू शकतो. रायगड हा पुण्यापासून सुमारे १३४ किलोमीटर आहे. रायगड किल्लावर जाण्यासाठी पाचाड या गावला यावे लागते. पाचाड या गावाला आल्यानंतर तुम्ही ट्रेकने रायगड या किल्ल्यावरती जावू शकता. माणगाव किंवा वीर दासगाव हे रेल्वे स्टेशन रायगड किल्ल्यापासून जवळचे आहेत. पुणे स्टेशन वरुन तुम्हाला माणगाव किंवा वीर दासगाव या रेल्वे स्टेशन वर यावे लागेल. माणगाव किंवा वीर दासगाव स्टेशनला आल्यानंतर तुम्ही टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने रायगड किल्ल्यावरती जावू शकता. रायगड या किल्ल्यावरती रोपवे ची सुविधा उपलब्ध आहे. या रोपवे ने तुम्ही रायगड किल्ल्यावरती जावू शकता.
रायगडावरील पाहण्यासारखे ठिकाणे
पाचाडचा राजमाता जिजाबाई यांचा वाडा
राजमाता जिजाबई यांना रायगडावरील गर वर शोसत नसे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिजा बाईंना पाचाडला वाडा बांधून दिल होता. तसेच जिजाबाईंची काळजी घेण्यासाठी त्यांच्या बरोबर पुतळा महाराणी सुद्धा राहत होत्या. या वाड्यामधील जिजाबाईंचे दगडाचे आसन बघण्यासारखे आहे.
खुब लढा बुरूज
आपण रायगड ट्रेक करत असताना आपल्याला खुबलढा बुरूज दिसतो. या खुबलढा बुरुजाच्या शेजारी एक दरवाजा होता त्यास चित्त दरवाजा असे म्हणतात. परंतु हा दरवाजा आता उध्वस्त झ़ाला आहे.
चोर दिंडी
हि चोरदिंडी महादरवाज्याच्या ऊयाजाव्या बाजूस आहे. बुरुजाचा आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.
हत्ती तलाव
हत्ती तलाव हा महदारवाज्याच्या थोडा पुढे आहे. रायगड किल्ल्यावरील हत्तींना पानी पिण्यासाठी या तलावांचा उपयोग हॉट असे.
गंगा सागर तलाव
महाराजांच्या राज्यभिषेकावेळी सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली, त्यामुळे या तळावास गंगा सागर तलाव असे म्हणतात.
स्तंभ
गंगासागराच्या दक्षिण दोन उंच मनोरे दिसतात तास स्तंभ असे म्हणतात. जगदीश्वराचा शिलालेखामध्ये या स्तंभाचा उल्लेख आढळतो.
राजभवन
रायगड किल्ल्यावरती राजभवन सुद्धा होते. या राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे. रत्नशाळा राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे. या तळघरामद्धे एक खोली आहे. या खोली मध्येच महाराज यांनी स्वराज्याचे गुप्तचराचे प्रमुख बहिर्जी नाईक भेटत होते.
नगारखाना
सिंहसनाच्या समोर प्रवेशद्वार दिसते त्या नगारखाना असे म्हणतात. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे.
बाजारपेठ
नगरखाणाच्या डाव्या बाजूस एक मोकळी जागा आहे त्यास बाजारपेठ असे म्हणतात. याच बाजार पेठा ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला आहे. या पेठेच्या दोन्ही रांगेमद्धे महाराजांच्या काळामध्ये २२ दुकाने होती. या दोन रांगांमधून जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा रस्ता होता.
महाराजांची समाधी
किल्ल्यावरील मंदिराच्या पुर्वेबाजूस थोड्या अंतरावर जो आष्टीकोनी चोथारा आहे, तीच महाराजांची समाधी आहे. ३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृतू झाला. महाराजांच्या पूर्वे बाजूला भवानी टोक तर उजवीकडे दारूचे कोठार आणि बारा टाकी दिसतात.
कुशावर्त तलाव
रायगड किल्ल्यावरती कुशवर्त तलाव आहे आणि या तलावाजवळ महादेवाचे एक छोटेसे मंदिर आहे. या मंदीरा समोर फुटलेल्या अवस्थेत नंदी आहे.
टकमक टोक
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये हे टकमक टोक खूप प्रसिद्ध होते. शिक्षा झालेल्या केदयांना या टकमक टोकावरून फेकून दिले जात असे.
हिरकणी टोक
या रायगडावरील हिरकणीच्या टोकाच्या नावाला एक कहाणी आहे. महाराजांच्या काळामध्ये सूर्यास्त झाल्याबरोबर लगेच गडाचे दरवाजे बंद केले जात होते. एके दिवशी हिरकणी नावाची एक गवळण दूध विकून गडावर यायला निघाली होती परंतु हिरकणीला गडावर जाण्यासाठी उशीर झाला आणि गडाचे दरवाजे बंद झाले. त्यावेळेस तिच्या घरी लहान मूल होते त्याच्या काळजीसाठी तिने किल्ल्यावरील एक बुरुजाणे चढवून गडावर प्रवेश केला होता. महाराजांना हि गोष्ट समजताच महाराजांनी तिचा गोरव केला आणि त्या बुरुजाचे नाव हिरकणी असे ठेवले.
वाघ्या कुत्र्याची समाधी
शिवाजी महाराजांंचा अत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाचा कुत्र्याने त्या आगीत उडी घेतली.
रायगडावरील दरवाजे
महादरवाजा
या महादरवाज्याच्या बाहेर दोन्ही बाजूस सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. किल्ल्याचा आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे, असे समजले जाते. या महादरवाज्याला दोन भव्य बुरूज आहेत. या दरवाज्यावर शत्रूवर आक्रमण करण्यासाठी जंग्या बांधलेल्या आहेत. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकऱ्यांचा देवड्या दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याचा खोल्या दिसतात.
नाना दरवाजा
नाना दरवाजा लहान असल्यामुळे यास नाना दरवाजा म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकच्या वेळेस इंग्रजांचा एक वकील या नाना दरवाज्यामधून आला होता. या दरवाज्याच्या आतल्या बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन खोल्या आहेत.
महादरवाजा
या महादरवाज्याच्या बाहेर दोन्ही बाजूस सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. किल्ल्याचा आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे, असे समजले जाते. या महादरवाज्याला दोन भव्य बुरूज आहेत. या दरवाज्यावर शत्रूवर आक्रमण करण्यासाठी जंग्या बांधलेल्या आहेत. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकऱ्यांचा देवड्या दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याचा खोल्या दिसतात.
नाना दरवाजा
नाना दरवाजा लहान असल्यामुळे यास नाना दरवाजा म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकच्या वेळेस इंग्रजांचा एक वकील या नाना दरवाज्यामधून आला होता. या दरवाज्याच्या आतल्या बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन खोल्या आहेत.
रायगडावरील मंदिरे आणि गडावर सोयी
शिरकाई मंदिर
या राजगडावरील मुख्य देवता असलेली शिरकाई देवीचे मंदिर महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस आहे. हे शिरकाई देवीचे मूळ मंदिर नाही हा मात्र मूर्ती प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. या राजगडावरी राजवड्या शेजारी मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे.ब्रिटिश काळा मध्ये तेथे शिरकाईचा घरटा हा नामफलक होता.
जगदीश्वराचे मंदिर
राजगडच्या बाजार पेठच्या पूर्वे बाजूस ब्राह्मण वस्ती आहे. या ब्राह्मण वस्ती समोरच हे मंदिर आहे. या मंदिरा समोरच सुंदर अशी नंदीची मूर्ती आहे. या मंदिरात प्रवेश केल्यानंतर सभा मंडप लागते. मंडपाच्या मधोमध भव्य कासव आहे. य मंदिराच्या गाभाऱ्याचा भिंतीवर हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराचा प्रवेशद्वाराचा पायऱ्यांचा खाली एक लहानसा शिलालेख दिसतो.
गडावरील राहायची सोय
गडावर राहण्यासाठी उत्तम सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे. एक मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा ७ ते ८ खोल्या आहेत. राहण्याची सोय विनाशुल्क आहे.
गडावरील खाण्याची सोय
गडावर खाण्याची सोय आहे पण स्वतःच्या सोयीप्रमाणे खाद्यपदार्थ घेऊन जावे.गडावर खाण्याची व विविध वस्तूंची दुकाने आहेत.
गडावरील पाण्याची सोय
गडावर गंगासागर तलाव इत्यादी अनेक पाण्याचे तलाव आहेत. त्यांत मुबलक गडावर जाण्याच्या वाटा
गडावर जाण्यासाठी आता एकूण दोन मार्ग आहेत. येथे पाण्याची खूप चांगली सोय आहे. शुद्ध पाणी आणि फिल्टर केलेले पाणी आपणास मिळते.
रायगडाला भेट का द्यावी?
रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानीचा किल्ला असून त्याला अपार ऐतिहासिक महत्त्व आहे. सुमारे २,७०० फूट उंचीवर वसलेला हा किल्ला निसर्गरम्य डोंगररांगा व हिरव्यागार दऱ्यांनी वेढलेला आहे. रायगडावरून दिसणारे विहंगम दृश्य, टकमक टोक, हिरकणी बुरुज आणि राजदरबार ही ठिकाणे पर्यटकांना इतिहासात नेऊन ठेवतात. इथे भेट देताना शिवरायांच्या शौर्याची व स्वराज्य स्थापनेची जाणीव होते. शिवसमाधी येथे उपस्थित राहून प्रत्येकाला अभिमानाची भावना होते. साहस, इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी रायगडाला नक्की भेट द्यावी.