राजमाची किल्ला | Rajmachi Fort Information in Marathi

महाराष्ट्राला सह्याद्री पर्वतरांगेचे वरदान लाभले आहे. या पर्वतरांगेत असंख्य किल्ले, डोंगर, घाटवाटा आणि दुर्गम प्रदेश विखुरलेले आहेत. या सर्वांमध्ये राजमाची किल्ला हा एक अत्यंत सुंदर, ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्न किल्ला म्हणून ओळखला जातो. लोणावळा आणि कर्जत यांच्या मधोमध वसलेला हा किल्ला केवळ एक ऐतिहासिक वास्तू नसून, ट्रेकर्स, इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव देणारे ठिकाण आहे. या राजमाची किल्ल्याची समुद्रसपाटी पासूनची उंची सुमारे २७१० फुट म्हणजे ८२६ मीटर एवढी आहे. राजमाची किल्ला सातवाहनांनी बांधला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६५७ मध्ये राजमाची हा किल्ला जिंकला होता. राजमाची हा किल्ला पुण्यापासून सुमारे ८६.८ किलोमीटर अंतरावर आहे. श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन या राजमाची किल्ल्याचे बालेकिल्ले आहेत. 

राजमाची किल्ल्यावर कसे पोहचायचे?

रेल्वे ने 

मुंबई पासून आपल्याला राजमाचीला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.

१. उद्यान एक्सप्रेस हि  रेल्वे दादर स्थानकावरून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी लोणावळा रेल्वे स्थानकावर जाते. ९ वाजून ३० मिनिटांनी हि  रेल्वे लोणावळ्याच्या स्थानकावर पोहचते. लोणावळ्याच्या रेल्वे स्थानकावरून आपण रिक्षाने तुंगार्ली धरणापर्यंत जाऊ शकता. तुंगार्ली धरणापासून आपल्याला उधेवाडी पर्यंत जावे लागते. तुंगार्ली धरण ते उधेवाडी हे अंतर सुमारे १६ किमी एवढे आहे. उधेवाडी हे राजमाची किल्ल्याच्या पायथ्या गावाचे नाव आहे. 

२. मुंबई पासून लोकल ट्रेनने पुण्याकडे निघाल्यास कर्जतला उतरायचे. कर्जतच्या राम पुलावरून रिक्षाने कोंढाणा गावापर्यंत जाऊ शकतो. या कोंढाणा गावापासून आपण ट्रेकिंगने राजमाची किल्ल्यावर जाऊ शकतो.

बसने 

खाजगी वाहनाने राजमाची किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.

१. मुंबई पासून आपण कोंढाणा गावापर्यंत आपण गाडीने जाऊ शकतो. या कोंढाणा गावापासून आपण ट्रेकिंगने राजमाची किल्ल्यावर जाऊ शकतो.

२. मुंबई/ पुणे – लोणावळा – उधेवाडी या मार्गाने आपण राजमाचीच्या पायथ्या पर्यंत जाऊ शकतो. पुण्यापासून राजमाची सुमारे ८६.८  किमी अंतरावर आहे.

विमानाने 

या राजमाची किल्ल्यापासून सर्वात जवळचे विमानतळ पुणे या ठिकाणी आहे. हे विमानतळ राजमाची किल्ल्यापासून सुमारे ८५ किलोमीटर अंतरावर आहे. या विमानतळापासून आपण टॅक्सी ने किंवा प्रायवेट गाडीने जावू शकतो. 

राजमाची किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा 

लोणावळा मार्गे – हा मार्ग तुलनेने सोपा आणि लोकप्रिय आहे. लोणावळ्याहून राजमाची माचीपर्यंत कच्चा रस्ता आहे, ज्यावरून चालत किंवा काही ठिकाणी जीपने जाता येते.

कोंढाणा (कर्जत) मार्गे – हा मार्ग अधिक साहसी आणि कठीण आहे. या मार्गावरून ट्रेक करताना दाट जंगल, चढ-उतार आणि अरुंद वाटा अनुभवायला मिळतात.

राजमाची किल्ल्यावरील पाहण्यासारखे ठिकाणे 

१. तुंगार्ली तलाव

हे धरण राजमाचीच्या संपूर्ण प्रदेशाला सिंचन करण्यासाठी बांधलेले आहे. नंतर हे ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि मैदानी पिकनिकसाठी  पर्यटन स्थळ बनले. हे धरण १९३० साली बांधण्यात आले आहे.

२. वळवण तलाव

हा तलाव राजमाचीपासून सुमारे १० किमीच्या अंतरावर आहे. हे एक महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळ आहे. हे धरण वळवण या गावी असल्यामुळे याला वळवण हे नाव देण्यात आले आहे. 

३. कुणे धबधबा

कुणे धबधबा म्हणजे लोणावळ्यातील २०० मीटर खाली कोसळणाऱ्या पाण्याचा प्रवाह, एकदा तर नक्की भेट देण्यासारखे हे प्रेक्षणीय स्थळ आहे. कुणे धबधबा हा खंडाळा घाटातून उगम पावणारा महाराष्ट्रातील एक उंच धबधबा आहे.

४. पवना लेक

मुंबई पुणे महामार्गावरील कामशेत पासून सुमारे १० किमी अंतरावर असणारे पवना लेक महाराष्ट्रातील एक लोकप्रिय कॅम्पिंग साईट आहे. शांतता आणि मनमोहक नैसर्गिक सौंदर्यामुळे तुमचा कॅम्पिंगचा अनुभव खऱ्या अर्थाने फायद्याचा ठरतो.

५. पॅराग्लायडिंग  कामशेत

कामशेत मध्ये तुम्ही पॅराग्लायडिंग या साहसी खेळाचा आनंद घेऊ शकता.

राजमाची किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ

राजमाचीला जाण्यासाठी जून ते सप्टेंबर हे महिने सर्वोत्तम आहेत. कारण हे मान्सून मधले महिने असून यात सगळीकडे हिरवेगार गवत उगवलेले असते.

राजमाची किल्ल्याविषयी प्रश्न

राजमाची किल्ल्यावर कसे जायचे?

राजमाची किल्ल्यावर जाण्यासाठी मुंबई किंवा पुणे या दोन्ही ठिकाणाहून तुम्ही लोणावळापाशी कुणे गावातून उधेवाडीकडे निघावे. लोणावळा पासून राजमाची किल्ला सुमारे १८ किमी अंतरावर आहे.

राजमाची चढायला किती वेळ लागतो?

राजमाची किल्ल्या चढण्यासाठी पायथ्यापासून साधारण २ ते ३ तास लागतात.

राजमाची किल्ला कोणी बांधला?

हा किल्ला सातवाहनांनी बांधला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ साली हा किल्ला ताब्यात घेऊन या किल्ल्याचा जीर्णोद्धार केला.

राजमाची किल्ल्याबद्दल काय माहिती आहे?

महाराष्ट्राला सह्याद्री पर्वतरांगेचे वरदान लाभले आहे. या पर्वतरांगेत असंख्य किल्ले, डोंगर, घाटवाटा आणि दुर्गम प्रदेश विखुरलेले आहेत. या सर्वांमध्ये राजमाची किल्ला हा एक अत्यंत सुंदर, ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्न किल्ला म्हणून ओळखला जातो. लोणावळा आणि कर्जत यांच्या मधोमध वसलेला हा किल्ला केवळ एक ऐतिहासिक वास्तू नसून, ट्रेकर्स, इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव देणारे ठिकाण आहे. या राजमाची किल्ल्याची समुद्रसपाटी पासूनची उंची सुमारे २७१० फुट म्हणजे ८२६ मीटर एवढी आहे. राजमाची किल्ला सातवाहनांनी बांधला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६५७ मध्ये राजमाची हा किल्ला जिंकला होता. राजमाची हा किल्ला पुण्यापासून सुमारे ८६.८ किलोमीटर अंतरावर आहे. श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन या राजमाची किल्ल्याचे बालेकिल्ले आहेत. 

राजमाची किल्ल्याचा इतिहास काय आहे?

हा किल्ला सातवाहनांनी बांधला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ साली हा किल्ला ताब्यात घेऊन या किल्ल्याचा जीर्णोद्धार केला.

राजमाची पॉइंटवरून आपल्याला काय दिसते?

या राजमाची पॉइंट वरुन राजमाची किल्ला आजूबाजूचे धबधबे दऱ्या इत्यादी दृष्टे निदरणास येतात. तसेच चित्रपट निर्मात्यांसाठी देखील हे एक प्रसिद्ध वास्तु आहे.

Scroll to Top