मराठी ट्रॅव्हलआपला प्रवास, आपल्या भाषेत

छत्रपती संभाजीनगर विभाग: फिरायची ठिकाणं आणि किल्ले

डोंगर कोरून केलेली लेणी, देवगिरीसारखे किल्ले आणि मराठवाड्याची मंदिरं.

13 ठिकाणं

क्रम

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

दौलताबाद किल्ला यादवांची राजधानी देवगिरी. अंधारी वाट आणि चांद मिनारसाठी प्रसिद्ध. छत्रपती संभाजीनगर जिल्हा
वेरूळ लेणी एकाच डोंगरात बौद्ध, हिंदू आणि जैन लेणी, आणि एकाच खडकातून कोरलेलं कैलास मंदिर. खुलताबाद तालुका, छत्रपती संभाजीनगर जिल्हा
अजिंठा लेणी दोन हजार वर्षांपूर्वीची रंगीत भित्तिचित्रं आजही टिकून असलेली बौद्ध लेणी. सोयगाव तालुका, छत्रपती संभाजीनगर जिल्हा
घटोत्कच लेणी अजिंठा कोरणाऱ्याच काळातली, पण गर्दीपासून दूर असलेली बौद्ध लेणी. जंजाळा, सिल्लोड तालुका, छत्रपती संभाजीनगर जिल्हा
पितळखोरा लेणी अजिंठ्याच्याही आधीची लेणी, शांत दरीत, धबधब्याच्या शेजारी. कन्नड तालुका, छत्रपती संभाजीनगर जिल्हा
बीबी का मकबरा ताजमहालसारखा दिसणारा, आईच्या आठवणीत मुलाने बांधलेला दख्खनचा ताज. छत्रपती संभाजीनगर शहर

बीड जिल्हा

सौताडा धबधबा मराठवाड्याच्या माळरानात अचानक खोल दरी आणि त्यात कोसळणारा धबधबा. पाटोदा तालुका, बीड

धाराशिव जिल्हा

श्री तुळजाभवानी मंदिर शिवरायांची कुलदेवी. महाराष्ट्रातल्या लाखो घरांचं कुलदैवत, साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ. तुळजापूर तालुका, धाराशिव जिल्हा

हिंगोली जिल्हा

औंढा नागनाथ मंदिर जमिनीखालच्या गाभाऱ्यातलं ज्योतिर्लिंग; नामदेवांसाठी मंदिराचं तोंड फिरलं अशी कथा. औंढा, हिंगोली जिल्हा

एकापेक्षा जास्त जिल्हे

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

छत्रपती संभाजीनगरमध्ये फिरायला कोणती ठिकाणं आहेत?

छत्रपती संभाजीनगरमधली सगळ्यात जास्त वाचली जाणारी ठिकाणं: दौलताबाद किल्ला, वेरूळ लेणी, अजिंठा लेणी. या पानावर 13 ठिकाणं जिल्ह्यानुसार दिली आहेत.

तुमचं आवडतं ठिकाण इथे नाही?

नाव आणि काही फोटो WhatsApp वर पाठवा. आम्ही माहिती चेक करून नवीन पान बनवू, तुमच्या नावासकट.

WhatsApp वर सुचवा

App म्हणून Save करा

  1. खाली (किंवा वर) Share बटणावर टॅप करा.
  2. यादीत खाली स्क्रोल करून Add to Home Screen निवडा.
  3. वर उजवीकडे Add दाबा. होम स्क्रीनवर मराठी ट्रॅव्हलचा आयकॉन येईल.