सह्याद्रीच्या डोंगराळ भागात वसलेला रोहिडा हा किल्ला पुण्यापासून सुमारे ६०.६ किलोमीटर अंतरावर आहे. रोहिडा किल्ल्यालाच विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असेही म्हणतात. रोहिडा हा किल्ला समुद्रसपाटी पासून सुमारे १०८३ मीटर उंच आहे. रोहिडा हा किल्ला भोगोलिक दृष्ट्या सह्याद्रीतील नीरा नदीच्या खोऱ्यात म्हणजेच हिरडस मावळ भागात येतो. या नदीच्या खोऱ्या मध्ये एकूण ४२ गावे आहेत. त्यापेकी ४१ गावे पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यामद्धे आहे. या किल्ल्याच्या आग्नेयेस ‘शिरवले बुरुज’, पश्चिमेस ‘पाटणे बुरुज’ आणि ‘दामगुडे बुरुज’, उत्तरेस ‘वाघजाईचा बुरुज’, पूर्वेस ‘फत्ते बुरुज’ आणि ‘सदरेचा बुरुज’ इत्यादी वास्तु पहाण्यासारख्या आहेत. ट्रेकिंग करण्यासाठी रोहिडा हा किल्ला उत्तम आहे.
रोहिडा या किल्लावर कसे जायचे?
रोहिडा किल्ल्याच्या पायथ्या गावाचे नाव बाजारवाडी आहे. या बाजारवाडी पासून भोर हे शहर सुमारे ७.४ किलोमीटर अंतरावर आहे. रोहिडा या किल्ल्यावर येण्यासाठी तुम्हाला भोर मध्ये यावे लागेल येथून तुम्ही टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने रोहिडा किल्ल्यावर येवू शकता. लोणेरे रेल्वे स्टेशन रोहिडा किल्ल्यापासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. लोणेरे स्टेशन पासून रोहिडा हा किल्ला सुमारे ९७ किलोमीटर अंतरावर आहे. या रेल्वे स्टेशन पासून तुम्ही टॅक्सी ने किंवा खाजगी वाहनाने रोहिडा या किल्ल्यावर येवू शकता.
बाजारवाडी मार्गे
भोर शहराच्या दक्षिण दिशे कडून रोहिडा किल्ल्यावर जाण्यासाठी एक वाट आहे. या वाटेने रोहिडा किल्ला हा सुमारे ७.४ किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्र शासनाच्या बसची बाजारवाडी गावपर्यंत सुविधा उपलब्ध आहे. या वाटेने तुम्ही रोहिडा किल्ल्यावरती एक ते दोन तासात पोहचवू शकता.
अंबवडे मार्गे
भोर ते अंबवडे अशी महाराष्ट्र शासनाची बस रोहिडा किल्ल्यावर जाण्यासाठी उपलब्ध आहे. आपल्याला पुणे ते भोर, पानवळ आणि अंबवडे अशी महाराष्ट शासनाची बस सुद्धा उपलब्ध आहे. या महाराष्ट्र शासनाच्या बस ने तुम्ही अंबवडे गावपर्यंत पोहचवू शकता. अंबवडे या गावातून हि वाट थोडी लांब आणि निसरडी आहे. या अंबवडे मार्गाने रोहिडा किल्ला गाठण्यासाठी तीन ते चार तास लागतात.
रोहिडा किल्ल्यावरील दरवाजे आणि तटबंदी
रोहिडा किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यावर गणेश पट्टी आणि वर मिहराब आहे. १५ ते २० पायऱ्या चढल्यानंतर दूसरा दरवाजा लागतो. या दुसऱ्या दरवाज्याच्या समोरच भुयारी पाण्याचे टाके आहे. तिसरा दरवाजा हा अतिशय भव्य आणि मजबूत दरवाजा आहे. हा तिसरा दरवाजा कोरीव कामाने पूर्ण भरलेला आहे. या तिसऱ्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना हत्तीचे शिर कोरलेले आहे. या तिसऱ्या दरवाज्याच्या डावी बाजूला मराठीत तर उजव्या बाजूला फारशी भाषेमध्ये शिलालेख आहेत.
गडावरील वास्तु
रोहिडा किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर पुढे दोन वास्तु दिसतात, त्यापेकी एक सदर असावी. तर दुसरी किल्लेदारचे घर असावे. या घराच्या डाव्या बाजूने थोडे पुढे चालत गेल्यास भेरवाचे मंदिर लागते. या मंदीरा मध्ये भेरव, भेरवी आणि गणपती अशा तीन मुर्त्या आहेत. या मंदिरासमोर लहान टाके, दीपमाळ आणि चौकोनी थडगी आहेत. या मंदीरा समोरच तलाव आहे. या तलावापासून खाली बुरुजाच्या दिशेने उतरताना बुरुजा जवळ सदरेचे अवशेष दिसतात. या सदरेच्या अवशेषा पासून थोडेसे पुढे चालत गेल्यास एक बुरूज लागतो. आणि त्याच्या जवळच असणाऱ्या तटबंदीत चोर दरवाजा आहे.
बुरूज आणि इतर वास्तु
चोर दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला उद्ध्वस्त वास्तूंचे अवशेष पहावयास मिळतात. या अवशेष पासून थोडेसे पुढे चालत गेल्यानंतर रोहिडा किल्ल्याच्या उत्तरेस फत्ते बुरूज आहे. हा बुरूज पाहल्यानंतर पुढे पाण्याच्या टाक्यांची एक सरल रेषेमद्धे पाण्याचे टाके दिसतात. या पाण्याच्या टाक्यांपुढे चुन्याचा घाणा आहे. या घाण्यापासून प्रवेश द्वारा पर्यंत आल्यास आपली गड फेरी पूर्ण होते. रोहिडा गड फिरण्यासाठी आपल्याला तीन ते चार तास लगतात. या किल्ल्यांच्या बुरुजांना आग्नेयेस ‘शिरवले बुरुज’, पश्चिमेस ‘पाटणे बुरुज’ आणि ‘दामगुडे बुरुज’, उत्तरेस ‘वाघजाईचा बुरुज’, पूर्वेस ‘फत्ते बुरुज’ आणि ‘सदरेचा बुरुज’ असे बुरूजे आहेत.