शिरोडा बीचची माहिती मराठीत | Information In Shiroda Beach

कोकणच्या निसर्गरम्य किनारपट्टीवरील एक लपलेले रत्न म्हणजे शिरोडा समुद्रकिनारा. जर तुम्हाला गोव्याच्या गर्दीपासून दूर, शांत आणि निवांत ठिकाणी सुट्टी घालवायची असेल, तर शिरोडा हा तुमच्यासाठी उत्तम मार्ग आहे. 

शिरोडा समुद्रकिनारा

 कोकणच्या कुशीतील एक शांत नंदनवन

महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर वसलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा समुद्रकिनारा हा पर्यटकांसाठी एक स्वप्नवत ठिकाण आहे. पांढरीशुभ्र वाळू, निळेशार पाणी आणि किनाऱ्यालगत असलेली माडाची व सुरूची झाडे यांमुळे या किनाऱ्याला ‘पॅराडाईज बीच’ असेही संबोधले जाते. 

शिरोडा बीचचे मुख्य आकर्षण

शिरोडा हा अतिशय स्वच्छ आणि कमी गर्दीचा किनारा आहे. येथील समुद्राचे पाणी इतके पारदर्शक आहे की, काही ठिकाणी तुम्हाला पायाखालील वाळू आणि छोटे मासे स्पष्ट दिसू शकतात. हा शिरोडा बीच सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी किंवा सेल्फी साठी खूप प्रसिद्ध आहे. 

ऐतिहासिक महत्त्व

 मिठाचा सत्याग्रह

शिरोडा या गावाला केवळ नैसर्गिकच नाही, तर ऐतिहासिक महत्त्वही आहे. १९३० च्या स्वातंत्र्यलढ्या मध्ये महात्मा गांधीं यांनी  पुकारलेल्या मिठाच्या सत्याग्रहाचे केंद्र शिरोडा हे होते. त्यामुळे या भूमीला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. 

पाहण्यासारखी इतर पर्यटन स्थळे

शिरोडा बीचच्या परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.

रेडी गणपती मंदिर

 शिरोड्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेले हे मंदिर द्विभुज गणपतीच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे.  

यशवंतगड

 समुद्राच्या काठावर असलेला हा ऐतिहासिक किल्ला पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. 

आरवली वेतोबा मंदिर

 कोकणातील लोकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर त्याच्या भव्य मूर्तीसाठी ओळखले जाते. 

मिठागरे

 शिरोडा गावात आजही मोठ्या प्रमाणावर मीठ तयार केले जाते. येथील मिठागरे पाहणे हा एक वेगळा अनुभव असतो. 

पर्यकांसाठी उपक्रम आणि वॉटर स्पोर्ट्स

जरी शिरोडा शांततेसाठी प्रसिद्ध असला, तरी येथे साहसवेड्या पर्यकांसाठी अनेक सोयी उपलब्ध आहेत:

वॉटर स्पोर्ट्स

पॅरासेलिंग, जेट स्की, बनाना राईड आणि कयाकिंगचा आनंद तुम्ही येथे घेऊ शकता. .

रापण पाहणे

 सकाळी लवकर समुद्रकिनाऱ्यावर गेल्यास तुम्हाला मच्छिमारांची पारंपारिक पद्धत (रापण) पाहता येते. तुम्ही तिथूनच ताजे मासे देखील खरेदी करू शकता. 

खान-पान आणि निवास व्यवस्था

शिरोड्यामध्ये अस्सल मालवणी जेवणाची मेजवानी मिळते. येथे अनेक होमस्टे आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत, जिथे तुम्ही घरगुती वातावरणाचा आनंद घेऊ शकता. सुलोषणा रिसॉर्ट किंवा स्थानिक होमस्टेमध्ये राहून तुम्ही कोकणी संस्कृती जवळून अनुभवू शकता. 

कसे पोहोचाल?

रेल्वेने

 जवळचे रेल्वे स्टेशन सावंतवाडी रोड (३०-३५ किमी) आहे.

रस्त्याने 

 मुंबई-गोवा हायवेवरून तुम्ही सावंतवाडीमार्गे शिरोड्याला पोहोचू शकता. 

शिरोडा कशासाठी प्रसिद्ध आहे?

शिरोडा या गावाला केवळ नैसर्गिकच नाही, तर ऐतिहासिक महत्त्वही आहे. १९३० च्या स्वातंत्र्यलढ्या मध्ये  महात्मा गांधीं यांनी  पुकारलेल्या मिठाच्या सत्याग्रहाचे केंद्र शिरोडा हे होते. 

शिरोडा बीच नक्की कुठे आहे?

महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर वसलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा समुद्रकिनारा आहे.

शिरोडा बीच भेट देण्यासारखे आहे का?

महाराष्ट्र-गोवा सीमेवर सावंतवाडीजवळ वसलेले, शिरोडा हे एक शांत, कमी प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे.

Scroll to Top