नाशिक या शहरामध्ये पंचवटी या परिसरातील काळाराम मंदिर आहे. या काळाराम मंदिरा शेजारीच सीता गुफा आहे. सीता गुफा हि रामायनामधील अनेक घटकांशी जोडलेली आहे. राम आणि सीता यांनी वनवासातील काही काळ या सीता गुफा मध्ये घालावलेला आहे. रावणाने सीतेचे अपहरण करण्यापूर्वी सीता याच परिसरात वास्तव्यास होती.
सीता गुफा हि एक रामयनामधील महत्वाची गुफा आहे. सीता गुफा हि नाशिक मध्ये असून ती पुण्यापासून सुमारे २१७ किलोमीटर तर मुंबई पासून सुमारे १८२ किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक मध्ये जेवढ्या गुफा आहेत त्या सर्व सीता गुफा म्हणून ओळखल्या जातात.
सीता गुहा कुठे आहे?
सीता गुहा नाशिक या ठिकाणी आहे आणि ती नाशिक पासून सुमारे १.५ किलोमीटरच्या अंतरावर आहे.
सीता गुहा वर कसे जायचे?
बस ने
महाराष्ट्र शासनाच्या बसेस ने तुम्ही नाशिक ला जाऊ शकता. पुणेच्या स्वारगेट आणि शिवाजीनगर या ठिकाणी नाशिक जाण्यासाठी बसेस उभ्या असतात. या बसेस तुम्हाला नाशिक शहारापर्यंतच आहेत. नाशिक शहरापासून तुम्ही टॅक्सी, ऑटो किंवा खाजगी वाहनाने सीता गुहा पर्यंत जाऊ शकता.
रस्त्याने
नाशिक ला जाण्यासाठी खाली मार्ग देलेला आहे. हा मार्ग नाशिक जाण्यासाठी उत्तम आहे.
पुणे – चाकण – राजगुरूनगर – संगमनेर – नाशिक – पंचवटी या मार्गाने तुम्ही पंचवटी ला जाऊ शकता.
रेल्वे ने
सीता गुहेपासून जवळचे रेल्वे स्टेशन नाशिक या ठिकाणी आहे. ते पंचवटी पासून सुमारे ११.४ किलोमीटर अंतरावर आहे. या रेल्वे स्टेशन पासून तुम्ही टॅक्सी किंवा ऑटो ने जाऊ शकता.
सीता गुहेची रचना
सीता गुंफा आकाराने लहान आहे आणि आत जाण्यासाठी अरुंद पायऱ्या आहेत. गुंफेच्या आत भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मुर्त्या आहेत. तसेच सीता गुफेमध्ये शिवलिंग सुद्धा आहे. गुंफेत प्रवेश करताना भक्तांना वाकून किंवा खाली बसून जावे लागते, त्यामुळे हि जागा थोडी साहसी अनुभव देणारी वाटते.
धार्मिक आणि पर्यटन महत्त्व
सीता गुहा हि पंचवटीतील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात, विशेषतः राम नवमी आणि इतर धार्मिक सणांच्या वेळी येथे मोठी गर्दी होते.
सीता गुहा जवळच गोदावरी नदी, रामकुंड आणि काळा राम मंदिर यांसारखी प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे नाशिकला येणारे पर्यटक या सर्व ठिकाणांना भेट देतात.
सीता गुहे जवळील पर्यटन स्थळे
तुम्ही गोदावरी नदीच्या पात्रात असेलेल रामकुंडला भेट देऊ शकता. हे रामकुंड गुहे पासून फक्त ५०० मीटरच्या अंतरावर आहे. तसेच या ठिकाणी काळाराम मंदिर सुद्धा आहे ते भगवान रामाला समर्पित असून ते जून एक हिंदू मंदिर आहे. सीता गुहेपासून ५०० मीटरच्या अंतरावर कपालेश्वर मंदिर आहे जे नंदीशिवाय भगवान शिवाच्या मोजक्या मंदिरांपैकी एक आहे.
पर्यटन आणि सुविधा
प्रवेश
येथे प्रवेश करण्यासाठी कोणत्याही आगाऊ बुकिंगची गरज नाही.
पार्किंग
पर्यटकांसाठी विनामूल्य पार्किंगची सोय उपलब्ध आहे.
मर्यादा
हि गुंफा अतिशय अरुंद असल्याने वृद्ध किंवा शारीरिक व्याधी असलेल्या व्यक्तींना आत जाणे कठीण होऊ शकते. तसेच येथे व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध नाही.
वेळ
साधारणपणे सकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत सीता गुंफा दर्शनासाठी खुली असते (तरीही स्थानिक परिस्थितीनुसार वेळ बदलू शकते).
सीता गुहेला भेट कधी द्यावी?
ऑक्टोबर ते मार्च
या महिन्यांमध्ये नाशिक मधील हवा थंड आणि सुखद असते. त्यामुळे नाशिक मध्ये सहज फिरता येते.
जून ते सप्टेंबर
या महिन्यांमध्ये नाशिक मधील परिसर हिरवागार असतो. परंतु पाऊस जास्त असल्यामुळे नाशिक मध्ये सहज फिरता येत नाही.
एप्रिल ते मे
या महिन्यांमध्ये नाशिक मधील हवामान उष्ण असते त्यामुळे या महिन्यांमध्ये नाशिक मध्ये फिरत येत नाही.
FAQ
सीता गुहा कुठे आहे?
सीता गुहा नाशिक पासून जवळ पंचवटी या ठिकाणी आहे.
सीता गुहे पासून जवळचे रेल्वे स्टेशन कुठे आहे
सीता गुहे पासून जवळचे रेल्वे स्टेशन नाशिक या ठिकाणी आहे.