Tarkarli Beach Information in Marathi Language | तारकर्ली बीच

महाराष्ट्रामधील कोकण विभागाची राणी बीच म्हणून ओळख असणारा, तारकर्ली बीच हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण या गावाच्या शेजारीच आहे. तसेच हा बीच पांढरी वाळू, नारळी-पोफळीच्या बागा आणि स्फटिक स्वच्छ पाणी या गोष्टींसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तारकर्ली बीच वरती स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि बोटिंग यांसारख्या वॉटर स्पोर्ट्सचा सुद्धा आपण आनंद घेऊ शकतो.

Sunset at Tarkarli Beach | तारकर्ली किनाऱ्यावरील सूर्यास्त

या तारकर्ली बीच वर फिरायला गेल्यावर तुम्ही सूर्यास्त नक्की पहा आणि ते सुंदर दृश्य मनामध्ये साठवून ठेवा. 

Temples & Religious Places | मंदिरे आणि धार्मिक स्थळे 

तारकर्ली बीचच्या आजूबाजूला भरपूर धार्मिक स्थळे आहेत. यामध्ये श्री गणेश मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर आणि अनेक छोटी धार्मिक स्थळे आहेत. या मंदिरांमध्ये भक्त नियमितपणे पूजा अर्चा करतात, आणि स्थानिक धर्मपरंपरांची साक्ष देणारी वास्तुकला इथे पाहता येते.

Food Joints near Tarkarli Beach | खाद्य संस्कृती 

तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावरील स्थानिक खाद्यसंस्कृती अत्यंत चवदार आणि विविधतेने भरलेली आहे. येथे कोकणी मसाले, ताज्या माशांचे पदार्थ, आणि नारळ आधारित विविध खाद्यपदार्थ खूप लोकप्रिय आहेत. खासकरून, कोकणी कढी, ताजे माशांचे रेजी, आणि भात, वांगी भात, तसेच विविध भाजीपाले येथे प्रमुख आहार म्हणून ओळखले जातात. स्थानिक बाजारांमध्ये सापडणारे ताजे समुद्री खाद्य एक अविस्मरणीय अनुभव देतात, ज्यामुळे पर्यटक इथे येऊन एक अनोखा स्वाद घेऊ शकतात.

How to go Tarkarli Beach | तारकर्ली बीचवरती कसे जायचे?

By Road | रस्त्याने 

मुंबई पासून हे बीच सुमारे ४७४ किलोमीटर अंतरावर तर पुण्यापासून सुमारे ४१९ किलोमीटर अंतरावर आहे तसेच सिंधुदुर्ग पासून सुमारे २९.८ एवढ्या किलोमीटर अंतरावर आहे. 

By Train | रेल्वेने 

तारकर्ली बीच पासून कुडाळ हे रेल्वे स्टेशन जवळचे असून ते सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या कुडाळ पासून आपण टॅक्सी ने किंवा प्रायवेट गाडीने जाऊ शकतो. 

Best Time to Visit Tarkarli Beach | तारकर्ली बीच वरती जाण्यासाठी सर्वात्तम ऋतु 

Monsoon Season | पावसाळा (जून ते सेप्टेंबर)

या महिन्यांमध्ये सतत तारकर्ली बीच वरती पाऊस असतो. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याला या महिन्यांमध्ये जाता येत नाही. 

Winter Season | हिवाळा  (ओक्तोंबर ते मार्च )

या महिन्यांमध्ये तारकर्ली बीच वरील वातावरण थंड आणि पर्यटकांसाठी योग्य आहे. त्यामुळे तुम्ही या महिन्यांमध्ये तारकर्ली बीच वर येऊ शकता. 

Summer Season | कडक उन्हाळा (एप्रिल आणि मे)

या महिन्यांमध्ये कडक ऊन असते. त्यामुळे आपण या महिन्यांमध्ये तारकर्ली बीचवरती वरती जाऊ शकत नाही. 

अधिक वाचा: खांदेरी किल्ल्याची माहिती मराठीत

International Scuba Diving Trailing Center | आंतरराष्ट्रीय स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र

आपल्या महाराष्ट्रामद्धे तारकर्ली बीचवर आंतरराष्ट्रीय स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र आहे. आपल्या महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने जीवरक्षकांना प्रशिक्षण केंद्राची स्थापना केलेली आहे. हे प्रशिक्षित जीवरक्षक किनाऱ्यालगतच्या समुद्रकिनाऱ्यांवर नियुक्त केले जातात. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक जीवरक्षकांना शिकवतात. या उपक्रमासाठी IISDA (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड अ‍ॅक्वाटिक स्पोर्ट्स) ची निवड करण्यात आली आहे.

Tarkarli Beach FAQs | तारकर्ली समुद्रकिनारा

तारकर्ली चांगले की गोवा?

गोवा वाहतूक ही एक मोठी समस्या आहे, गोव्यातील टॅक्सी युनियन पर्यटकांना आणि हॉटेलला कमी अंतरासाठी हास्यास्पद पैसे मोजावे लागतात.

तारकर्ली समुद्रकिनारा कशासाठी ओळखला जातो?

महाराष्ट्रामधील कोकण विभागाची  राणी बीच म्हणून ओळख असणारा , तारकर्ली बीच हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण या गावाच्या शेजारीच आहे. तसेच हा बीच पांढरी वाळू, नारळी-पोफळीच्या बागा आणि स्फटिक स्वच्छ पाणी या गोष्टींसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तारकर्ली बीच वरती स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि बोटिंग यांसारख्या वॉटर स्पोर्ट्सचा सुद्धा आपण आनंद घेऊ शकतो.  

तारकर्लीला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?

पावसाळा (जून ते सेप्टेंबर)
या महिन्यांमध्ये सतत तारकर्ली बीच वरती पाऊस असतो. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याला या महिन्यांमध्ये जाता येत नाही. 
हिवाळा आणि उन्हाळा  (ओक्तोंबर ते मार्च )
या महिन्यांमध्ये तारकर्ली बीच वरील वातावरण थंड आणि पर्यटकांसाठी योग्य आहे. त्यामुळे तुम्ही या महिन्यांमध्ये तारकर्ली बीच वर येऊ शकता. 
कडक उन्हाळा (एप्रिल आणि मे)
या महिन्यांमध्ये कडक ऊन असते. त्यामुळे आपण या महिन्यांमध्ये तारकर्ली बीचवरती वरती जाऊ शकत नाही. 

तारकर्लीमध्ये तुम्हाला किती दिवस राहायचे आहेत?

तारकर्लीच्या २-३ दिवसांच्या सहलीत तुम्हाला निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेता येईल, स्नोर्कलिंग आणि स्कूबा डायव्हिंग सारख्या जलक्रीडा अनुभवता येतील, ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला एक्सप्लोर करता येईल आणि स्थानिक मालवणी पाककृतींचा अनुभव घेता येईल.

Scroll to Top