पवना प्रांतात असणारा तिकोना हा किल्ला पुण्यापासून सुमारे ५१.४ किलोमीटर आहे. तिकोना हा किल्ला पवना नदीच्या धरणाजवळ असून तो समुद्रसपाटी पासून सुमारे ३५०० फुट उंच आहे. तिकोनी हा किल्ला त्रिकोणी आकाराचा असल्यामुळे याला तिकोना किल्ला असे म्हणतात. या तिकोनी किल्ल्यालाच वितंड गड असेही म्हणतात. या तिकोना किल्ल्याच्या शेजारी बोरघाट आहे. हा बोरघाट चढून गेल्यानंतर कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी अशा लेण्या आहेत. या लेण्या बौध्द आणि हिनयान पध्दतीची असल्यामुळे हे सर्व किल्ले ८०० ते १००० या काळामध्ये बांधलेले असावे. लेण्यांच्या सुरक्षितेसाठी तिकोना हा किल्ला बांधलेला आहे.
How to reach Tikona Fort | तिकोना किल्ल्यावर कसे जायचे?
तिकोना किल्ल्याच्या पायथ्या गावाचे नाव तिकोनापेठ असून ते पुण्यापासून सुमारे ५२.५ किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून तुम्ही टॅक्सीने, रेल्वेने किंवा खाजगी वाहनाने तिकोना किल्ल्यावरती जावू शकता. तिकोना किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन लोणावळा असून ते पुण्यापासून सुमारे ६९ किलोमीटर अंतरावर आहे. या लोणावळ्यापासून तुम्ही टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने तिकोना किल्ल्यावरती जावू शकता.
अनेक ट्रेकर्स तुंग आणि तिकोना असाही ट्रेक करतात. या ट्रेक ने तिकोना किल्ल्यावर येण्यासाठी तुंगवाडी तून केवरे या गावी यावे लागते. केवरे या गावातून ब्राम्हणोली या गावी यावे लागते. ब्राम्हणोली या गावामधून तुम्ही तिकोनापेठ या गावी येता. या ट्रेक साठी तीन ते चार तास लागतात.
तिकोना या किल्ल्यावरती ट्रेकसाठी तिकोनापेठ या गावामधून वाट जाते. यासाठी लोणावळ्याच्या दोन स्टेशन पुढे कामशेत स्टेशनवर उतरावे. कामशेत ते काळे कॉलनी बस पकडून काळे कॉलनी मद्धे उतरवावे. तुम्हाला कामशेत ते काळे कॉलनी अशी बस सेवा किंवा खाजगी वाहन उपलब्ध आहे. तिकोना पेठेतून एका तासाच्या आत तुम्हाला तिकोना या किल्ल्यावरती जाता येते. अनेक ट्रेकर्स लोहगड, विसापूर ,बेडसे लेणे आणि तिकेना असा ट्रेकही करतात.
Places to see on Tikona Fort | तिकोना किल्ल्यावरील पाहण्यासारखे ठिकाणे
तिकोना किल्ल्यावरती त्रिंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिर, एक तलाव, २ तळी आणि धन्य कोठाराचे पडीक अवशेष आढळतात. तिकोना किल्ल्याच्या बालेकिल्ल्याच्या खालील भागात श्री तुळजाई देवीचे मंदिर आहे. तिकोना किल्ल्यावरती काही लेण्या सुद्धा आहेत. लेण्यासमोरच एक तळे आहे.
राहाण्याची सोय
पावसाळा सोडून इतर सर्व ऋतुत १० ते १५ जणांना गुहे मध्ये राहता येते.
जेवणाची सोय
गडावर जेवणाची सोय नाही, आपणं स्वत: करावी.
पाण्याची सोय
गडावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकं आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ
पायथ्यापासुन पाऊण ते एक तास लागतो.





