Murud Janjira Fort

मुरुड जंजीरा किल्ला | Murud Janjira Fort information in Marathi

अभेद्य किंवा अजिंक्य असणारा जंजीरा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे. रायगड पासून हा किल्ला सुमारे ८५ किलोमीटर आहे. या जंजीरा किल्ल्याचे खरे नाव जजीरे मेहरूब असे आहे. जंजीरा या शब्दाचा अर्थ पाण्यानी वेढलेले बेट आणि मेहरूब म्हणजे चंद्रकोर. जंजीरा हा किल्ला जलदुर्ग प्रकारात मोडत असून तो अरबी समुद्रात आहे. जंजीरा हा किल्ला कोणत्याही बेटावर बांधलेला नाही, तर तो एका खडकावर बांधलेला आहे. या जंजीरा किल्ल्यावर सिद्धीचे राज्य होते. जंजीरा किल्ल्याच्या किनाऱ्यालाच लागून मुरुड हे गाव आहे. मुरुड पासून चार किलोमीटर अंतरावर राजापुरी हे गाव आहे. या राजापुरी किल्ल्याच्या पश्चिमेला एक खडकावर जंजीरा हा किल्ला आहे. या जंजीरा किल्ल्यावर सुमारे ५७२ तोफा आहेत. जंजीरा या किल्ल्यावरील कलालबांगडी हि तोफ खूप प्रसिद्ध होती. या तोफे मुळेच जंजीरा हा किल्ला अजिंक्य राहीला.

Who did build Murud Janjira Fort | मुरुड जंजीरा किल्ला कोणी बांधला?

जंजीरा हा शब्द अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरून आलेला आहे. अरबी भाषेमधील जझीरा म्हणजे बेट. या जंजीराच्या बेटावर पूर्वी मेढकोट होता. त्यावेळी या जंजीरा किल्ल्याच्या किनाऱ्यावर कोळी लोकांची वस्ती होती. या कोळया लोकांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमी त्रास होत होता. तेव्हा या लुटारू लोकांचा नाश करण्यासाठी या बेटावर मेढकोट उभा केला होता.

मेढकोट म्हणजे लाकडाचे मोठे ओंडके एक शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. कोळी लोक या तटबंदी मध्ये सुरक्षित राहत होते. या कोळया लोकांचा प्रमुख राम पाटील हे होते. त्यावेळी जंजीरा किल्ल्याचा आजूबाजूच्या परीसरावर निजामशाहीची सत्ता होती. जंजीरा किल्ल्यावरती निजामशहाचा ठाणेदार होता. या ठाणेदाराला कोळयांचा प्रमुख राम पाटील जुमानत नसे. त्यामुळे ठाणेदाराने राम पाटलाचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केलेली होती. पिरमखानाने राम पाटलाशी चांगली दोस्ती केली.

एके दिवशी पिरमखानाने एक मोठा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमामध्ये कोळयांचा प्रमुख राम पाटील आणि कोळी बांधव यांना आंमत्रित केले होते. पिरमखानाने त्या कार्यक्रमामध्ये दारूंचे बॅलर आणले होते. परंतु काही बॅलर मध्ये पिरमखानाचे सैन्य होते. ही दारू राम पाटील यांना आणि त्यांच्या साथीदारांना पाजली. यानंतर राम पाटील आणि त्यांचे साथीदार बेशुद्ध अवस्थेत असताना त्यांना ठार मारले आणि या जंजीरा किल्ल्यावरती पिरमखानाने आपले वर्चस्व कायम ठेवले. 

How to reach Murud Janjira Fort | मुरुड जंजीरा किल्ल्यावर कसे जायचे?

जंजीरा हा किल्ला जलदुर्ग प्रकारात मोडतो. जंजीरा किल्ला पाहण्यासाठी पुणे किंवा मुंबई हून अलिबाग गाठावे. त्यानंतर अलिबागवरून रेवदंडामार्गे मुरुड गाठता येते. मुरुड गावामधून दंडा राजापुरी गाठावे. मुरुड पासून सुमरे एका किलोमीटरच्या अंतरावर दंडा राजापुरी आहे. दंडा राजापुरी गावामधून जंजीरा किल्ल्यावर जाण्यासाठी बोट सेवा उपलब्ध आहे. 

जंजीरा किल्ल्यावरती कोकण मधून येण्यासाठी महाड – गोरेगाव – म्हसळे -बोर्लिपचंतन – दिघी गाठावे. यानंतर दिघीहून जंजीरा किल्ला पाहण्यासाठी बोट सेवा उपलब्ध आहे. 

जंजीरा किल्ल्यावर जाण्यासाठी अजून एक मार्ग आहे. पाली- रोहा – नागोठणे – साळाव – नांदगाव – मार्गे अलिबाग मार्गे न जाता पाली – रोहा – नागोठणे – साळाव – नांदगाव मार्गे मुरुडला जाता येते.

Things to see on Murud Janjira Fort | मुरुड जंजीरा किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे 

सुरूल खानाचा वाडा

घोड्याच्या पागेमधून बाहेर पडल्यानंतर समोरच सुरूल खानाचा वाडा आहे. हा सुरूल खानचा वाडा तीन मजली असून तो पडलेल्या अवस्थेत आहे. 

तलाव

सुरूल खानच्या वाड्याच्या उत्तरेस षटकोनी आकाराचा गोड्या पाण्याचा तलाव आहे. हा तलाव २० मीटर व्यासाचा आहे. या तलावाच्या चारही कोपऱ्यामद्धे चार होडी आहेत. 

सदर

बालेकिल्ल्याच्या मागच्या बाजूला इमारत आहे. या इमारतीलाच सदर म्हणतात. 

बाल्लेकिल्ला

जंजीरा किल्ल्यावरील पायऱ्यांनी थोडे वर गेल्यावर बाल्ले किल्ला लागतो. या बाल्ले किल्ल्यावरच एक झेंडा उभा केलेला आहे. 

जंजीरा किल्ल्यावरील पश्चिम दरवाजा

जंजीरा किल्ल्यावरती गडाच्या पश्चिम तटातुन बाहेर पाडण्यासाठी एक छोटासा दरवाजा आहे. यालाच दर्या दरवाजा म्हणतात. संकटाच्या काळी या दरवाज्यातून बाहेर पडता येत असे. या पश्चिम दरवाज्याच्या वरच्या बाजूला केदखाना आहे.  या जंजीरा किल्ल्याला एकूण २२ बुरूजे आहेत. 

पीरपंचायतन

जंजीरा किल्ल्याच्या प्रवेश दारातून आत गेल्यावर डाव्या बाजूला एक दरवाजा आहे, तर उजव्या बाजूला खोली सारखे एक बांधकाम आहे यालाच पिरपंचायतन असे म्हणतात. 

घोड्याची पागा

पीरपंचायतन मधून आत गेल्यावर घोड्याची पागा आहे.  

Janjira Fort Architecture | जंजीरा किल्ल्याची वास्तुरचना

जंजीरा किल्ल्याची वास्तुरचना अत्यंत मजबूत आणि रणनीतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. हा किल्ला उंच डोंगरावर बांधलेला असून त्याभोवती खोल दऱ्या आहेत, ज्यामुळे शत्रूंचा प्रवेश कठीण होत असे. किल्ल्याच्या भिंती दगडी असून अत्यंत जाड व मजबूत आहेत. प्रवेशद्वार लोखंडी दरवाज्यांनी सुरक्षित करण्यात आलेले आहे. किल्ल्याच्या आत पाण्याची टाकी, शस्त्रागार, निवासस्थान व पहारेकऱ्यांसाठी बांधलेल्या जागा दिसतात. बुरुजांवरून आसपासचा परिसर स्पष्ट दिसतो, ज्यामुळे नजर ठेवणे सोपे होते. किल्ल्याची रचना संरक्षण, निरीक्षण आणि दीर्घकालीन वास्तव्य यांसाठी योग्य प्रकारे आखलेली आहे. ही रचना त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याचे उत्तम उदाहरण मानली जाते.

Best time to visit Murud Janjira Fort | भेट देण्यासाठी सर्वात्तम काळ

जंजीरा किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वात उत्तम काळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा आहे. या काळात हवामान थंड, स्वच्छ आणि सुखद असते, ज्यामुळे चढाई आणि किल्ल्याची सफर आरामदायक होते. पावसाळ्यानंतर परिसर हिरवागार होतो, यामुळे निसर्गसौंदर्य अधिक खुलते. उन्हाळ्यात मात्र उष्णतेमुळे प्रवास टाळावा.

Quick tips about Murud Janjira Fort | मुरुड जंजिरा किल्ला थोडक्यात

राहण्याची सोय

मुरुड गावात राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय

मुरुड गावात जेवणाची सोय होते.

पाण्याची सोय

गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ

दंडा राजापूरी गावापासून बोटीने अर्धा तास लागतो.

Scroll to Top