स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता. शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीचे मंदिर आहे. या मंदिरावरूनच छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव शिवाजी असे ठेवले होते. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यामधील जुन्नर या तालुक्यामद्धे आहे. शिवनेरी किल्ला पुण्यापासून सुमारे ८४.१ किलोमीटर तर जुन्नर पासून सुमारे ३.३ किलोमीटर अंतरावर आहे. भारत सरकारने शिवनेरी किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. शिवाई देवीचे मंदिर, शिवकुंज, अंबरखाना, कडेलोट कडा पाण्याच्या टाकया इत्यादी वास्तु शिवनेरी किल्ल्यावरती पाहण्यासारख्या आहेत. शिवनेरी किल्ल्याला चारही बाजूने उंच आणि कठीण चढाव असल्यामुळे हा किल्ला सहजासहजी जिंकता येत नव्हता.
How to reach Shivneri Fort | शिवनेरी या किल्ल्यावरती कसे जायचे?
जुन्नर हे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्या गावाचे नाव आहे. पुण्यामधून किंवा मुंबई मधून आपण टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने शिवनेरी किल्ल्यावरती जावू शकतो. तसेच रेल्वेने सुद्धा आपण शिवनेरी किल्ल्यावरती जावू शकतो. शिवनेरी या किल्ल्यापासून पुण्याचे रेल्वे स्टेशन जवळचे असून ते सुमारे ८८.९ किलोमीटर अंतरावर आहे. या पुणे रेल्वे स्टेशन पासून तुम्ही टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने किल्यावरती जावू शकता. तसेच विमानाने सुद्धा तुम्ही शिवनेरी किल्ल्यावरती जावू शकता.
साखळीच्या वाटेने शिवनेरी वर जाताना जुन्नर शहरातील नवीन बस स्टँडच्या समोरच्या रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पोहचले असता त्या ठिकाणी चार रस्ते एकत्र आलेले दिसतात. डाव्या बाजूच्या रस्त्याने सुमारे एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर आहे. याच मंदिराच्या समोरून एक पायवाट जाते या पायवाटेने गेल्यास आपण थेट शिवनेरी किल्ल्याच्या एक कातळ भिंती जवळ पोहचतो. या कातळ भिंतीला बसवलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या साह्याने किल्ल्यावर पोहचता येते. हि साखळीची वाट कठीण आहे. या साखळीच्या वाटेने चालत गेल्यास एक तास लागतो.
जुन्नर या शहरामधून पुढे गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून जाणाऱ्या डाव्या बाजूच्या रस्त्याने पुढे गेल्यास डांबरी रोड आपल्याला शिवनेरी किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ घेऊन जातो. याच पायऱ्यांनी किल्ल्यावर जाताना महादरवाजा, पीर दरवाजा, परवानगीचा दरवाजा, हत्ती दरवाजा, शिपाई दरवाजा, फाटक दरवाजा आणि कुलाबकर दरवाजा असे अनुक्रमे सात दरवाजे आहेत. या रस्त्याने किल्ल्यावर पोहचण्यासाठी दोन तास लागतात.
Things to see on Shivneri Fort | शिवनेरी किल्ल्यावरील पाहण्यासारखे ठिकाण
शिवकुंज
शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आहे, याच स्मारकास शिवकुंज म्हणतात. या स्मारकाची पायाभरणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केले आहे, तसेच या स्मारकाचे उद्घाटन सुद्धा यशवंतराव चव्हाण साहेब यांनीच केले होते. बाळपणातील शिवाजी महाराज आपली छोटी तलवार फिरवत आपली आई जिजामाता यांना आपल्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नांचे वर्णन करीत आहे.
शिवाई देवीचे मंदिर
सात दरवाज्याच्या रस्त्याने किल्ल्यावर जाताना पाचवा शिपाई दरवाजा ओलांडला की मुख्य रस्त्यावरून डावीकडे वळल्यानंतर आपण शिवाई देवीच्या मंदिरात पोहोचतो. या शिवाई देवीच्या मंदिरात शिवाईची मूर्ती असून मंदीरा मागील खडकात ६-७ गुहा आहेत. परंतु या गुहेमद्धे रात्री राहू शकत नाही.
अंबरखाना
या शिवनेरीच्या शेवट दरवाज्यामधून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आताच्या परिस्थितीमध्ये हा अंबरखाना पडलेल्या अवस्थेत आहे. यापूर्वी याच अंबर खान्यात अन्न साठवले जात होते.
कडेलोट कडा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात गुन्हे गारांना या कडेलोट कडेवरून खाली ढकळून दिले जात होते. अशी महाराज यांच्या काळात शिक्षा होती.
पाण्याच्या टाक्या
शिवनेरी या किल्ल्यावरती जात असताना वाटेत पाण्याच्या टाक्या नजरेस पडतात.
Why to go to Shivneri Fort | पर्यटकांसाठी खास अनुभव
शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ असून पर्यटकांसाठी तो एक अविस्मरणीय आणि प्रेरणादायी अनुभव ठरतो. जुन्नर तालुक्यातील या किल्ल्याला भेट देणे म्हणजे मराठी इतिहास, संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखे आहे.
किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावरच हिरवीगार निसर्गरम्य टेकड्या आणि डोंगरमाथ्यावर वसलेला किल्ला दिसू लागतो. वर जाण्यासाठी सुमारे ७ दरवाजे पार करावे लागतात, आणि प्रत्येक दरवाज्याची रचना, दगडी बांधकाम व शिल्पकला पाहून त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याची झलक दिसते. चढाईदरम्यान थंड वारा, पक्ष्यांचे आवाज आणि सभोवतालचा निसर्ग पर्यटकांना एक शांत, आनंददायी वातावरण देतो.
किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर सर्वात प्रथम दिसते ते म्हणजे शिवाई देवीचे मंदिर आणि शिवाजी महाराजांचे जन्मगृह. हे स्थळ पाहताना प्रत्येकाला अभिमानाची भावना निर्माण होते. जन्मगृहातील साधे परंतु मजबूत दगडी बांधकाम आणि त्याच्या भोवतीचे परिसराचे सौंदर्य मनाला भिडते. गंगा-जमुना टाके, बुरुज, आणि तटबंदी पाहताना पर्यटकांना त्या काळातील युद्धनीती आणि संरक्षणरचना समजते.
शिवनेरीवरून आजूबाजूचा निसर्ग, खास करून जुन्नर शहर आणि सह्याद्री पर्वतरांगांचे दृश्य अप्रतिम दिसते. पावसाळ्यात येथे धुके, झरे आणि हिरवळ यामुळे किल्ला जणू निसर्गरम्य स्वर्गच वाटतो.
पर्यटकांसाठी येथे पायवाटेवर बसण्याची, विश्रांती घेण्याची आणि फोटोसेक्शन साठी अनेक सुंदर ठिकाणे उपलब्ध आहेत. इतिहासप्रेमी, विद्यार्थ्यांपासून ते निसर्गप्रेमी पर्यटकांपर्यंत सर्वांसाठी शिवनेरी हा प्रेरणा, अभिमान आणि आनंदाचा संगम आहे. शिवनेरी किल्ल्याचा अनुभव म्हणजे मराठी अस्मिता आणि परंपरेचा सजीव साक्षात्कार होय.
Best time to visit Shivneri Fort | शिवनेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वात्तम काळ
ऑक्टोबर ते फेब्रुवारी (हिवाळा)
या महिन्यांमध्ये तापमान कमी असते आणि हवामान थंड असते यामुळेच ट्रेकिंगचा अनुभक अधिक आनंददायी होतो.
ऑक्टोबर आणि मार्च
या महिन्यांमध्ये हवामान थंड असते यामुळेच ट्रेकिंगच अनुभव अधिक आनंद दायी होतो.





