Kalsubai Peak Marathi Travel

कळसुबाई शिखराची माहिती | Kalsubai Peak information in Marathi

कळसुबाई शिखर हे महाराष्ट्र राज्यामधील सर्वात उंच शिखर आहे. या कळसुबाई शिखराची समुद्र सपाटी पासून  उंची सुमारे १६४६ मीटर एवढी आहे. कळसुबाईचे शिखर अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या कळसुबाई शिखराच्या पायथ्या गावाचे नाव बारी आहे. या बारी गावामधून कळसुबाई शिखराची उंची सुमारे ९०० मीटर एवढी आहे. तर समुद्र सपाटी पासून कळसुबाई शिखराची उंची सुमारे १६४६ मीटर एवढी आहे. याच कळसुबाई शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. या कळसुबाईचा ट्रेक हा कठीण ते मध्यम पातळीचा समजला जातो. या कळसुबाई शिखरावर आदिवासी आणि महादेव कोळी जमातीचे लोक राहतात. या कळसुबाई शिखराच्या शेजारी भंडारदरा धरण आहे. 

How to reach Kalsubai Peak | कळसुबाई शिखरावर कसे जायचे?

कळसुबाईचे शिखर अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर आहे. पुण्यापासून कळसुबाईचे शिखर हे सुमारे १७२ किलोमीटर तर मुंबई पासून सुमारे १६६ किलोमीटर अंतरावर आहे. पुणे आणि मुंबई पासून आपण कळसुबाईच्या शिखरावरती टॅक्सीने किंवा खजागी वाहनाने जावू शकतो. कळसुबाई शिखराच्या जवळचे रेल्वे स्टेशन कसारा आणि इगतपुरी या ठिकाणी आहे. कसारा रेल्वे स्टेशन कळसुबाई पासून सुमारे ५० किलोमीटर तर इगतपुरी रेल्वे स्टेशन कळसुबाई शिखरापासून सुमारे ३२ किलोमीटर अंतरावर आहे. या रेल्वे स्टेशन पासून आपण टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने जावू शकतो. 

विमानाने सुद्धा कळसुबाई शिखरावरती जाता येते. कळसुबाई शिखरापासून जवळचे विमानतळ नाशिक या ठिकाणी  आहे. कळसुबाई पासून नाशिकचे विमानतळ हे सुमारे ८० किलोमीटर अंतरावर आहे. या विमानतळापासून आपण कळसुबाई शिखरावरती टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने जावू शकतो. 

कळसुबाई शिखराच्या पायथ्या गावाचे नाव बारी असे आहे. याच बारी गावामधून कळसुबाई शिखराच्या ट्रेक सुरू होतो. बारी हे गाव मुंबई पासून सुमारे १७३ किलोमीटर, तर पुण्यापासून सुद्धा बारी हे गाव सुमारे १७३ किलोमीटर अंतरावर आहे.

Things to see on Kalsubai Peak | कळसुबाई शिखरावरती पाहण्यासारखे ठिकाण 

कळसुबाईच्या शिखरावरती चढत असताना एक मंदिर लागते. हे मंदिर कळसुबाई शिखराचा ट्रेक करण्यासाठी आलेल्या लोकांसाठी बांधलेले आहे. तसेच कळसुबाई च्या शिखरावरती अजून एक मंदिर आहे. या मंदिरामध्ये फक्त तीनच माणसे बसू शकतात. या कळसुबाईच्या शिखरावरती उत्तरेला रामसेज, अचला, अहिवंत, सप्तश्रुंग, मार्कंडा, धोडप, रवळया जवळया, कोळधेर अशी डोंगररांग आहे. तर पूर्वेकडे औंढा, विश्रामगड, अलंग, मदन, कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड इत्यादी  किल्ले आहेत.

राहण्याची सोय

येथे शिखरावर रहाण्याची सोय नाही. या कळसुबाई शिखराच्या खाली शेडमध्ये किंवा बारी गावा मध्ये राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय

बारी गावा मध्ये जेवणाची सोय होऊ शकते. शिखरावर चढताना खायचे सामान कमीत कमी न्यावे कारण कळसुबाईचा ट्रेक करत असताना रस्त्याच्या वाटे मद्धे  जागोजागी नाश्ता, चहा, पाणी आणि जेवण देखील मिळत आहे. 

पाण्याची सोय

कळसुबाईच्या शिखरावरच्या शेवट टप्प्यावर एक विहीर आहे. यापेक्षा बारी गावामधूनच पाण्याची बाटली भरून घ्यावी. 

जाण्यासाठी लागणारा वेळ

बारी गावामधून ३ ते ४ तास लागतात.

Kalsubai Peak Architecture | वास्तुरचना 

कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून याची उंची सुमारे १,६४६ मीटर आहे. हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात, सह्याद्रीच्या डोंगररांगेत स्थित आहे. या शिखराची वास्तुरचना मुख्यतः नैसर्गिक असून ती खडकाळ आणि उंचसखल स्वरूपाची आहे. संपूर्ण परिसर ट्रॅप खडकांनी बनलेला असून हे खडक प्राचीन ज्वालामुखी क्रियेमुळे निर्माण झालेले आहेत. यामुळे संपूर्ण पर्वत अत्यंत मजबूत व टिकाऊ आहे.

शिखराकडे जाणाऱ्या मार्गात अनेक नैसर्गिक आणि कृत्रिम अडथळे येतात. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी शासकीय पातळीवर लोखंडी शिड्या, साखळदंड व काही ठिकाणी दगडी पायऱ्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे शिखर गिर्यारोहकांसाठी सुरक्षित व सुलभ बनले आहे. बारी गावातून सुरू होणारा मुख्य मार्ग हा सर्वाधिक प्रसिद्ध आहे. चढाई करताना निसर्गसौंदर्य, गवताळ पठारे, दरी आणि डोंगर यांच्या संगमामुळे एक आगळाच अनुभव येतो.

कळसुबाई शिखराच्या सर्वोच्च टोकावर कळसुबाई देवीचे एक छोटेसे मंदिर आहे. या मंदिराची रचना अतिशय साधी असून दगडी भिंती आणि टिनाचे छत यांचा समावेश आहे. मंदिर परिसर खडकांवर उभारण्यात आलेला असून त्याच्या भोवती थोडीशी सपाट जागा आहे. ही देवी आदिवासी आणि स्थानिक लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. नवरात्रोत्सवात येथे भाविकांची मोठी गर्दी उसळते, यामुळे त्या काळात मंदिराभोवती अधिक संरक्षक व्यवस्था केली जाते.

कळसुबाई शिखराची वास्तुरचना संपूर्णतः पर्वतीय असून मानवाने त्यात केलेल्या थोड्याफार सुधारणा केवळ सुविधा व सुरक्षिततेसाठी आहेत. या शिखराचा नैसर्गिक भव्यतेसोबत धार्मिक आणि सामाजिक महत्त्वही अधिक आहे. त्यामुळे कळसुबाई शिखर हे एक पर्वतरांगांतील आश्चर्यकारक उदाहरण असून त्याची वास्तुरचना ही निसर्ग आणि श्रद्धेचा सुंदर संगम आहे.

Best time to visit Kalsubai Peak | कळसुबाई शिखरावरती कधी जावे?

महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी पावसाळा (जून ते सप्टेंबर) किंवा हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी) हे उत्तम काळ आहेत. पावसाळ्यात निसर्गाची हिरवळ अनुभवता येते, तर हिवाळ्यात हवामान आल्हाददायक असते. रविवार टाळा, कारण गर्दी जास्त असू शकते.


Scroll to Top