सिंधुदुर्ग किल्ला | Sindhudurg Fort information in Marathi

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किल्ला हा कुरटे या बेटावर पसरला असून तो सुमारे ४८ एकर क्षेत्रफळा मध्ये बांधलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी समुद्रामधील आरमाराचे महत्व ओळखवून २५ नोव्हेंबर १६६४ रोजी हा किल्ला बांधला होता. या सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी ही सुमारे तीन किलोमीटर आहे. या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती ५२ बुरुज आणि ४५ दगडी जिने आहेत. तसेच या किल्ल्यांवर शिवाजी महाराज यांच्या काळामधील गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, दहीविहीर आणि साखर विहीर अशी होती. सिंधुदुर्ग किल्ल्यावर शंकरांच्या रूपातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर आहे. हे मंदिर १६६५ साली छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले आहे. तसेच या किल्लाला २१ जून २०१० मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे, तसेच जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन सुद्धा मिळालेले आहे. सिंधुदुर्ग हा किल्ला पुण्यापासून सुमारे ३६० किलोमीटर तर मुंबई पासून सुमारे ४६० किलोमीटर अंतरावर आहे तर गोव्यापासून सुमारे १२८ किलोमीटर आहे. 

सिंधुदुर्ग दुर्गावर कसे जायचे?

विमानाने 

सिंधुदुर्ग किल्ल्यापासून सर्वात जवळचे विमानतळ गोव्याचे दाबोळी विमानतळ आहे. या दाबोळीच्या विमानतळापासून सिंधुदुर्गाचा किल्ला सुमारे ११४ किलोमीटर आहे. या विमानतळापासून आपणास टॅक्सीने किंवा प्रायवेट गाडीने मालवण या गावापर्यंत पर्यंत जाता येते. सिंधुदुर्ग शहरापासून मालवण हे गाव सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे. या मालवण गावामधून आपण बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जावू शकतो. मालवण या गावामधून आपल्याला बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जावे लागते. बोटीचे पर व्यक्ती १०० रुपये तर हाफ तिकीट ५० रुपये आहे. 

रेल्वे ने 

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ सावंतवाडी स्टेशन, कुडाळ स्टेशन आणि कणकवली स्टेशन जवळचे असून ते अनुक्रमे सुमारे ३६, १५ आणि २२ किलोमीटर अंतरावर आहे. आपण रेल्वे ने सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली या रेल्वे स्टेशन पर्यंतच जावू शकतो. या स्टेशन पासून आपण टॅक्सी ने किंवा प्रायवेट गाडीने सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जावू शकतो. या सिंधुदुर्ग शहरामधून आपण बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जावू शकतो. 

टॅक्सी किंवा प्रायवेट गाडी 

आपण आपल्या शहरामधून टॅक्सी ने प्रायवेट गाडीने किंवा महाराष्ट्र शासनाच्या बस ने सिंधुदुर्ग शहरा पर्यंत येऊ शकतो. या सिंधुदुर्ग शहरामधून आपण बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जावू शकतो. 

सिंधुदुर्ग हा किल्ला मालवण या गावी आहे तर या गावामधून आपल्याला बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जावे लागते. बोटीचे पर व्यक्ती १०० रुपये तर हाफ तिकीट ५० रुपये आहे. 

सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाण्यासाठी सर्वात्तम महिना 

या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पावसाळ्यामध्ये मध्ये भरपूर पाऊस असतो त्यामुळे पावसाळ्या मध्ये  या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाता येत नाही. हिवाळ्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये आपण सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊ शकतो. 

सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पाहण्यासारखे ठिकाणे 

प्रवेशद्वार 

सिंधुदुर्ग या किल्याला गोमुखी आकाराचे प्रवेश द्वार आहे. या गोमुखी आकारामुळे तोफ खानांचा मारा अडवला जातो. तसेच हत्ती किंवा उंट घेऊन दरवाज्यावर आघात करता येत नाही. त्यामुळे मुख्य दरवाजा अभेद्य राहतो. प्रवेश द्वारचा दरवाजा हा सागाच्या लाकडापासून बनवला आहे.  

हनुमानाची मूर्ती 

मुख्य दरवाजाच्या पुढील बाजूस हनुमानाची छोटी मूर्ती आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर 

छत्रपती राजाराम महाराज यांच्या राजकीय काळामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवाजी महाराज यांकहगे मंदिर बांधलेले आहे.    

महादेवाचे मंदिर आणि भुयार 

या सिंधुदुर्गावर महादेवाचे मंदिर आहे आणि या मंदिरातच एक भुयार सुद्धा आहे. जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्यावर परकीय आक्रमण होते त्यावेळेस या भुयार मधून दारू गोळा आणि खायचे अन्न पदार्थ आणले जात असे. 

छत्रपती शिवाजी महारज यांचे पायाचे आणि हाताचे ठसे 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उजव्या हाताचा आणि  डाव्या पायाचा ठसा सुद्धा सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आहे. या सिंधुदुर्ग किल्ल्याचे काम हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेख खाली झाले होते.  

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पाण्याची सोय 

या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती तीन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. दूध, दही आणि साखर असे या विहरींची नावे आहेत. या विहरीमधील पानी पिण्यायोग्य आहेत. किल्ल्याच्या बाहेर खारट पाणीआणि किल्ल्याच्या आत गोड पाणी हा एक चमत्कारच आहे.


Scroll to Top