मोरगिरी किल्ला | Morgiri Fort information in Marathi

आजूबाजूच्या परिसरातील किल्ल्यांची टेहळणी करता यावी म्हणून मोरगिरी किल्ला पुणे जिल्ह्यामधील लोणावळा या परिसरामध्ये बांधला होता. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये बांधला होता. मोरगिरीचा किल्ला पुण्यापासून सुमारे ६८ किलोमीटर तर मुंबई पासून सुमारे १०६ किलोमीटर आहे. मोरगिरी किल्ल्याची समुद्रसपाटी पासूनची उंची सुमारे ३०१० फुट एवढी आहे. या किल्ल्याचा आकार त्रिकोणी असून चढाई साठी कठीण आहे. किल्ल्याच्या चढाई साठी तीन तास लागतात.जांभूळणे गाव हे मिरगिरी किल्ल्याच्या पायथ्या गावाचे नाव आहे. या गावामधूनच मोरगिरी किल्ल्याच्या ट्रेक सुरू होतो. या मोरगिरीच्या किल्लावरून पवना धरण, तुंग, तिकोना, कोरीगड इत्यादी किल्ले दृष्टीस पडतात.    

Paths Leading to Morgiri Fort | मोरगिरी किल्ल्यावर जाणाऱ्या पायवाटा 

पुणे किंवा मुंबई हून 

सर्वात प्रथम आपण पुण्यापासून किंवा मुंबई पासून लोणावळा या शहरापर्यंत पोहचा. या लोणावळ्या शहरापासून भुशी डॅम आणि आयएनएस शिवाजी मार्गे जाणाऱ्या रस्त्याने १६ किलोमीटर अंतरावर असलेला ॲम्बी व्हॅलीला जाणारा फाटा गाठा. या फाट्यावरून दोन रस्ते आहेत, एक ॲम्बी व्हॅलीकडे आणि दुसरा तुंग किल्ल्याकडे जातो. लोणावळा शहरामधून भांबुर्डे एसटी बसने फाट्यावर उतरा आणि तुंग किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जा. या रस्त्याच्या फाट्यापासून दीड किलोमीटर अंतरावर जांभूळणे गाव आहे. या जांभूळणे गावाला खाजगी वाहनाने सुद्धा जाता येते. 

जांभूळणे गावामधून 

या जांभूळ गावामधूनच एक पायवाट मोरगिरीच्या किल्ल्याकडे जाते. याच पायवाटेने या मोरगिरी किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो. 

When should you visit Morgiri Fort? | मोरगिरी किल्ल्यावर कधी जावे?

जून ते सेप्टेंबर 

या महिन्यांमध्ये मोरगिरी किल्ल्यावरती पाऊस असतो. त्यामुळे मोरगिरी किल्ल्याचा आजूबाजूचा परिसरात हिरवाई असते. परंतु या महिन्यांमध्ये पाऊस असल्यामुळे या किल्ल्यावरील पायवाटा या निसरड्या झालेल्या असतात. 

ऑक्टोबर ते फेब्रुवारी

या महिन्यांमध्ये थंडी असल्यामुळे मोरगिरी किल्ल्याचा ट्रेक करणे अत्यंत आरामदायक असते, आणि त्यामुळेच ट्रेकिंग अधिक सोयीस्कर होते.

मार्च ते मे 

या महिन्यांमध्ये मोरगिरी किल्ल्यावरती उन्हाळा असतो. त्यामुळे किल्ल्याच्या आजूबाजूचे वातावरण उष्ण असते. 

How to get to Morgiri Fort? | मोरगिरीच्या किल्ल्यावर कसे जायचे?

रेल्वे ने 

मोरगिरी किल्ल्यावरती जाण्यासाठी सर्वात रेल्वे स्टेशन लोणावळा या ठिकाणी असून मोरगिरी किल्ल्यापासून सुमारे १९ किलोमीटर अंतरावर आहे. 

खाजगी वाहन 

मोरगिरी किल्ला वरती आपण खाजगी वाहनाने सुद्धा जाऊ शकतो. पुण्यापासून मोरगिरी किल्ला हा सुमारे ६८ किलोमीटर तर मुंबई पासून सुमारे १०६ किलोमीटर अंतरावर आहे. 

राहाण्याची सोय 

किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही .

जेवणाची सोय 

किल्ल्यावर जेवणाची सोय नाही

पाण्याची सोय 

किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .

जाण्यासाठी लागणारा वेळ 

पायथ्यापासून ३ तास लागतात.

Scroll to Top