Daulatabad Fort | दौलताबाद किल्ल्याची माहिती

औरंगाबाद म्हणजे आत्ताचे छत्रपती संभाजी महाराज नगर  या शहरापासून अवघ्या अंदाजे १५ ते १६ किलोमीटर अंतरावर दोलताबाद हा किल्ला आहे. तसेच हा दौलताबाद किल्ला देवगिरी या नावाने सुद्धा ओळखला जातो. दौलताबाद हा किल्ला पुण्यापासून सुमारे ३०४ किलोमीटर तर मुंबईपासून सुमारे ३२९ किलोमीटर अंतरावर आहे. दौलताबाद हा किल्ला १२ शतकामध्ये यादवांनी बांधला होता. त्याकाळी यादवांचा मुख्य रामदेवराय यांनी बांधला होता. या राजाने दिल्लीची राजधानीच दौलताबादला हलवायचा निर्णय घेतला आणि देवगिरीचं नाव बदलून दौलताबाद असे ठेवले. 

How to get to Daulatabad Fort? | दौलताबाद किल्ल्यावर कसे जायचे?

रेल्वे ने 

दौलताबाद किल्ल्यापासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी आहे. या रेल्वे स्टेशन पासून  दौलताबाद हा किल्ला सुमारे १६.६ किलोमीटर अंतरावरआहे. तसेच या रेल्वे स्टेशन पासून तुम्ही टॅक्सी किंवा प्रायवेट गाडीने जावू शकता. 

विमानाने 

दौलताबाद किल्ल्यापासून सर्वात जवळचे विमानतळ छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी आहे. या विमानतळापासून पासून दौलताबाद हा किल्ला सुमारे २३ किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या विमानतळा पासून दौलताबाद या किल्ल्यावरती तुम्ही टॅक्सी किंवा प्रायवेट गाडीने जावू शकता. 

बस ने 

औरंगाबाद सेंट्रल बस स्टँड (CIDCO / CBS) येथून दौलताबाद किल्ल्यावरती जाण्यासाठी वारंवार बसेस मिळतात. या बस ने तुम्ही ४० ते ५० मिनिटा मध्ये दौलताबाद किल्ल्यावरती जावू शकता. 

ऑटो किंवा टॅक्सीने  

औरंगाबाद शहरातून थेट ऑटो किंवा टॅक्सी मिळते. या टॅक्सी ने तुम्ही ३०० ते ६०० रुपयांमद्धे दौलताबाद किल्ल्यावरती जावू शकता. 

Places to Visit at Daulatabad Fort | दौलताबाद या किल्ल्यावरील पाहण्यासारखे ठिकाणे 

भारत माता मंदिर

किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं हे छोटंसं पण सुंदर मंदिर आहे. इथे आल्यावर चढाई सुरू करण्याआधी मन शांत होतं. पर्यटक इथे थोडा वेळ विसावा घेतात.

हत्ती हौद

हा मोठा दगडी हौद आहे. पूर्वी किल्ल्यातील हत्तींसाठी याचा वापर केला जायचा. यावरून त्या काळातील प्राण्यांची व्यवस्था किती नीट होती, हे समजते.

तटबंदी आणि खंदक

किल्ल्याभोवती खोल खंदक आणि मजबूत तटबंदी आहे. हा खंदक कधी पाण्याने, तर कधी मगरांनी भरलेला असायचा, अशी आख्यायिका आहे. शत्रूला आत येणं फारच कठीण होतं.

अंधाराचा मार्ग (भुलभुलैय्या)

हा दौलताबाद किल्ल्याचा सर्वात प्रसिद्ध भाग. पूर्ण अंधार अरुंद आणि वळणावळणाची वाट वरून हल्ला करण्याची सोय आजही इथे टॉर्चशिवाय जाणं अशक्य आहे.

हा मार्ग पाहिल्यावर किल्ला का अजिंक्य होता, हे लक्षात येते. 

अरुंद पायऱ्या

किल्ल्यातील पायऱ्या फारच अरुंद आहेत. एकावेळी एकच माणूस वर–खाली जाऊ शकतो.

शत्रूला अडवण्यासाठी ही खास रचना केली होती.

चिनी महाल

हा महाल किल्ल्याच्या मधल्या भागात आहे. काही इतिहासकारांच्या मते येथे राजदरबार किंवा निवासस्थान होते.

आज फक्त अवशेष असले तरी त्याची भव्यता जाणवते.

बारादरी

ही खुली वास्तू आहे. इथे बसून राजे सल्लामसलत करत असावेत, असा इतिहास करांचासमज आहे. 

इथून आजूबाजूचा परिसर छान दिसतो.

पाण्याच्या टाक्या

इतक्या उंच किल्ल्यावर पाणी कसं साठवलं जात असेल, हा प्रश्न सगळ्यांना पडतो. किल्ल्यावर अजूनही पाण्याच्या टाक्या दिसतात. त्या काळातील जलव्यवस्थापनाचं हे उत्तम उदाहरण आहे.

मशिदी आणि दर्गा

किल्ल्यावर काही जुन्या मशिदी आणि दर्गा आहेत. त्या काळात वेगवेगळ्या संस्कृती एकत्र नांदत होत्या, हे यावरून दिसते.

चांद मिनार

किल्ल्याच्या बाहेर असलेला हा उंच मनोरा दूरवरून दिसतो. उंची सुमारे ६० मीटर विजयाच्या स्मरणार्थ बांधलेला आजही मजबूतीने उभा हा मनोरा पाहिल्याशिवाय दौलताबाद किल्ल्याची भेट अपूर्ण वाटते.

दौलताबाद किल्ल्याचे शिखर

सगळ्यात वर पोहोचल्यावर दिसणारा नजारा अविस्मरणीय असतो. छत्रपती संभाजीनगर शहर लांबच लांब शेतजमीन सूर्योदय आणि सूर्यास्त फोटोग्राफीसाठी ही जागा खूपच सुंदर आहे. 

The best time to visit Daulatabad Fort | दौलताबाद किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात्तम वेळ 

सकाळी ७ ते ११ – चढाईसाठी उत्तम

ऑक्टोबर ते फेब्रुवारी – हवामान छान उन्हाळ्यात दुपारी जाणं टाळा 

 काही महत्त्वाच्या टिप्स

पाणी आणि टोपी नक्की घ्या. 

चढाईसाठी स्पोर्ट्स शूज घाला. 

अंधाराच्या मार्गासाठी टॉर्च उपयोगी पडतो. 

लहान मुलं आणि ज्येष्ठांसाठी सावधगिरी. 

FAQs

दौलताबाद हे नाव कोणी ठेवले?

१३२७ मध्ये मुहम्मद-बिन-तुघलकने येथे आपली राजधानी स्थापन केली, तेव्हा या प्रदेशाला दौलताबाद किंवा ‘संपत्तीचे निवासस्थान’ हे नाव देण्यात आले.

दौलताबाद किल्ल्याचे नवीन नाव काय आहे?

दौलताबाद किल्ल्याचे नवीन नाव देवगिरि आहे.

दौलताबाद किल्ला कोणी पाडला?

१६३३ मधील दौलताबादचा वेढा हा मुघल साम्राज्य आणि अहमदनगर सल्तनत यांच्यातील एक संघर्ष होता, ज्यामध्ये दौलताबाद या तटबंदीयुक्त शहराला मुघल सैन्याने अनेक महिने वेढा घालून ते यशस्वीरित्या ताब्यात घेतले.

दौलताबाद किल्ल्यात किती पायऱ्या आहेत?

दौलताबाद किल्ल्याला अंदाजे ६०० ते ७५० पायऱ्या आहेत.

Scroll to Top