अजिंठा लेणी मधील बुद्ध मूर्ती, जातक कथांची भित्तीचित्रे आणि वास्तु कला हि जागतिक दर्जाची आहेत. अजिंठा लेणी छत्रपती संभाजी नगर या शहरापासून सुमारे १०३ किलोमीटर, पुण्यापासून सुमारे ४०८ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे ४३५ किलोमीटर अंतरावर आहे.
१८१९ मध्ये ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ यांनी या लेणींचा शोध लावला. शिकारी साठी फिरत असताना जॉन स्मिथ याला अजिंठा लेणी दिसली, आणि जॉन स्मिथ याने तेथील लेणीच्या एका गुहेवर आपले नाव कोरलेले आहे. या नावाचे निशाण आजही त्या ठिकाणी आहे. अजिंठा लेणीच्या आजुबजूला अनेक पर्यटन स्थळे आहेत, जसे की देवगिरी किल्ला बिबी का मकबरा असे अनेक ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत.
वाघोरा नदीच्या काठी वसलेली अजिंठा लेणी यामध्ये २९-३० बौद्ध लेणी आहेत. अजिंठा लेणी इसवी सन पूर्व २ रे ते इ.स. ४८० दरम्यान कोरलेली असून ती युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
अजिंठा लेणी कुठे आहे? | Where is Ajanta Caves Located?
अजिंठा लेणी हि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील सोयगाव तालुक्यामधील लेनापूर गावजवळ आहे. अजिंठा लेण्या यांचा आकार घोडाच्या नाल्यासारख्या आहे आणि त्या डोंगरामद्धे कोरलेल्या आहेत.
अजिंठा लेणीवर कसे जायचे?
रेल्वे ने
छत्रपती संभजी नगर मधील रेल्वे स्टेशन अजिंठा लेणी पासून जवळचे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशन पासून आपण टॅक्सी किंवा प्रायवेट गाडीने अजिंठा लेणी वर जाऊ शकतो. या रेल्वे स्टेशन पासून अजिंठा लेणी सुमारे १०६ किलोमीटर अंतरावर आहे.
रस्त्याने
स्वतःच्या गाडीने जायचे असेल तर पुणेकरांसाठी,
पुणे – अहमदनगर – छत्रपती संभाजी नगर – अजिंठा लेणी असा मार्ग आहे.
तर मुंबईकरांसाठी
मुंबई → नाशिक → मालेगाव → धुळे → अजिंठा
मुंबई → ठाणे → इगतपुरी → नाशिक → औरंगाबाद → अजिंठा असे अजिंठा लेणीवर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
पर्यटनासाठी उपयुक्त माहिती
स्थान
छत्रपती संभाजीनगर शहरापासून सुमारे १०० ते ११० कि.मी. अंतरावर, फर्दापूर जवळ.
वेळ
सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:०० पर्यंत.
साप्ताहिक सुट्टी
अजिंठा लेणी दर सोमवारी बंद असते.
तिकीट
पर्यटकांसाठी पुरातत्व विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तिकिटाची बुकिंग करू शकता, परंतु तिथे गेल्यावरही तिकीट मिळू शकते.
सुविधा
लेणी परिसरात व्हीलचेअरची सोय, वाहनतळ आणि ऑनसाइट सेवा उपलब्ध आहेत.
अजिंठा लेणीच्या वास्तुकले विषयी माहिती | Ajanta Caves Architecture
अजिंठा लेण्यांमधील चैत्यगृह विशेष उल्लेखनीय आहेत. या प्रार्थनागृहांमध्ये मोठे सभागृह, अर्धगोलाकार छत आणि शेवटी स्तूप अशी रचना दिसते. स्तंभांच्या रांगांमुळे संपूर्ण सभागृहाला भव्यता प्राप्त होते. या स्तंभांवर केलेली नक्षीकाम आणि शिल्पकला त्या काळातील कलाकारांच्या कौशल्याची साक्ष देते. विहार लेण्यांमध्ये भिक्षूंसाठी निवासाच्या खोल्या, मध्यभागी मोठे सभागृह आणि बुद्धमूर्ती असलेले मंदिर यांची रचना दिसून येते.
अजिंठा लेणींच्या वास्तुकलेचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे येथील भित्तिचित्रे. या चित्रांमध्ये बुद्धांच्या जीवनातील प्रसंग, जातक कथा आणि त्या काळातील समाजजीवनाचे चित्रण आढळते. नैसर्गिक रंगांचा वापर करून तयार केलेली हि चित्रे आजही अत्यंत जिवंत आणि आकर्षक वाटतात.
या सर्व कारणांमुळे अजिंठा लेणी हि केवळ धार्मिक स्थळ नसून भारतीय वास्तुकला, शिल्पकला आणि चित्रकलेचा अद्वितीय वारसा मानली जाते. त्यामुळेच यूनेस्को ने अजिंठा लेणींना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. आजही जगभरातील पर्यटक आणि संशोधक या लेण्यांच्या अद्भुत वास्तुकलेचा अभ्यास करण्यासाठी येथे भेट देतात.
अजिंठा लेणीचा इतिहास | Ajanta Caves History
अजिंठा लेणींची निर्मिती दोन मुख्य कालखंडांमध्ये झाली. पहिला कालखंड इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.स. पहिले शतक असा मानला जातो. या काळात बौद्ध धर्माच्या हिनयान पंथाशी संबंधित भिक्षूंनी येथे काही चैत्यगृहे आणि साधे विहार तयार केले. त्या काळात बुद्धाची मूर्ती न दाखवता स्तूपाच्या माध्यमातून पूजाअर्चा केली जात असे.
दुसरा कालखंड इ.स. पाचव्या ते सहाव्या शतकात आला. या काळात वाकाटक राजवंशच्या राजवटीत अजिंठा लेण्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. विशेषतः राजा हरीसेना यांच्या काळात अनेक भव्य विहार, चैत्यगृहे आणि सुंदर शिल्पकला तयार करण्यात आली. या काळात बौद्ध धर्मातील महायान पंथाचा प्रभाव वाढला आणि बुद्धाच्या मूर्ती व भित्तिचित्रांची निर्मिती सुरू झाली.
अजिंठा लेणींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील भित्तिचित्रे. या चित्रांमध्ये बुद्धांच्या जीवनातील प्रसंग, जातक कथा तसेच त्या काळातील समाजजीवन, पोशाख, संगीत आणि नृत्य यांचे सुंदर चित्रण आढळते. नैसर्गिक रंगांचा वापर करून तयार केलेली हि चित्रे आजही अत्यंत आकर्षक दिसतात.
काळाच्या ओघात या लेण्या काही शतकांपर्यंत विस्मृतीत गेल्या. नंतर १८१९ मध्ये ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ शिकारीसाठी जात असताना या लेण्या पुन्हा शोधून काढल्या. त्यानंतर अजिंठा लेणींवर संशोधन सुरू झाले आणि त्यांचे ऐतिहासिक महत्त्व जगासमोर आले.
आज अजिंठा लेणी हे भारताच्या सांस्कृतिक वारसाचे एक अमूल्य प्रतीक मानले जाते. त्यांच्या ऐतिहासिक, कलात्मक आणि धार्मिक महत्त्वामुळे युनेस्कोने १९८३ मध्ये अजिंठा लेणींना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. त्यामुळे जगभरातील पर्यटक आणि संशोधक येथे भेट देऊन या प्राचीन इतिहासाचा अभ्यास करतात.
अजिंठा लेणीचे आजूबाजूचे पर्यटन स्थळे | Nearby Places to Ajanta Caves
एलोरा लेणी
अजिंठा लेणी पासून सुमारे १०० ते ११० च्या किलोमीटर अंतरावर असणारी एलोरा लेणी हि हिंदू, बौद्ध आणि जैन या धर्माच्या शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या ठिकाणी एकूण ३४ लेण्या आहेत. एलोरातील कैलास मंदिर हे संपूर्ण खडकात कोरलेले जगातील सर्वात मोठे मंदिर मानले जाते, यामुळे या मंदिराची वास्तुकला आणि शिल्पकला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येतात.
बिबी का मकबरा
बिबी का मकबरा हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर येथे असलेले एक प्रसिद्ध ऐतिहासिक स्मारक आहे. हे स्मारक मुघलकालीन वास्तुकलेचे सुंदर उदाहरण मानले जाते. याची रचना प्रसिद्ध ताज महाल सारखी असल्यामुळे अनेकजण याला दक्षिणेचा ताजमहल असेही म्हणतात.
बिबी का मकबरा इ.स. १६७८ च्या सुमारास बांधण्यात आला आहे. हे स्मारक मुघल सम्राट औरंगजेब यांचा मुलगा आजम शहा यांनी आपली आई दिलरस बाणू बेगुम यांच्या स्मरणार्थ बांधले. त्यांच्या आईचे दुसरे नाव रबिया-उद-दुर्रानी असे होते, म्हणून काही ठिकाणी या मकबर्याला रबिया-उद-दुर्रानीचा मकबरा असेही म्हणतात.
दौलताबादचा किल्ला
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील असणारा दौलताबाद हा किल्ला यादव साम्राज्याची राजधानी होती. दौलताबाद किल्ल्याचे दुसरे नाव देवगिरी असे आहे. पुण्यापासून दौलताबाद हा किल्ला सुमारे २३५ किलोमीटर अंतरावर आहे, तर छत्रपती संभाजी नगर पासून दौलताबाद हा किल्ला १६.५ किलोमीटर अंतरावर आहे. दौलताबाद हा किल्ला २०० मीटर उंच दगडाच्या टेकडीवर वसलेला आहे. या दौलताबाद किल्ल्याला मराठा, यादव आणि मुस्लिम अशा तीन साम्राजाच्या राजधानी होत्या. दौलताबाद या किल्ल्याला त्याच्या भव्य तटबंदी, बुरूजे ,राजवाडे आणि मंदिरांसाठी ओळखले जाते.
घृष्णेश्वर मंदिर
हे भगवान शिवाला समर्पित असलेले अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वेरूळ (एलोरा) गावाजवळ आहे. हे मंदिर हिंदू धर्मातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग मानले जाते. त्यामुळे देशभरातील भाविकांसाठी या मंदिराला अत्यंत मोठे धार्मिक महत्त्व आहे.
घृष्णेश्वर मंदिराचा इतिहास प्राचीन काळापर्यंत पोहोचतो. असे मानले जाते की या मंदिराची मूळ रचना प्राचीन काळात झाली होती. नंतर विविध आक्रमणांमुळे मंदिराचे नुकसान झाले. पुढे मराठा साम्राज्याच्या काळात अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याचे सौंदर्य आणि धार्मिक महत्त्व पुन्हा जपले. अहिल्याबाई होळकर यांनी भारतातील अनेक प्राचीन मंदिरांचे जीर्णोद्धार केले होते, त्यामध्ये घृष्णेश्वर मंदिराचाही समावेश आहे.
लोणार सरोवर
लोणार सरोवर हे जगातील अत्यंत दुर्मिळ उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर आहे. हे सरोवर सुमारे ५०,००० वर्षांपूर्वी उल्का पडल्यामुळे तयार झाले असे मानले जाते. सरोवराभोवती अनेक प्राचीन मंदिरे आणि सुंदर नैसर्गिक परिसर आहेत.
FAQs on Ajanta Caves
लेणी चा शोध कसा लागला?
जॉन स्मिथ नावाचा ब्रिटिश शिकारी करत होता, आणि हि शिकारी करत असताना हि अजिंठा लेणी त्याच्या निदर्शनास आली.
अजिंठा लेणी मध्ये किती लेणी आहेत ?
अजिंठा लेणी मध्ये २९ ते ३० लेण्या आहेत.
लेणीचा आकार कसं आहे?
लेणीचा आकार घोड्याच्या नाला सारखा आहे.
अजिंठा लेणी पाहण्यासाठी वेळ के आहे?
अजिंठा लेणी पाहण्यासाठी सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:०० पर्यंतची वेळ आहे.