एलिफंटा लेणी | Elephanta Caves Information In Marathi

महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक लेणी, किल्ले आणि प्राचीन वास्तू आहेत. त्यापैकी जगप्रसिद्ध आणि अत्यंत महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणजे एलिफंटा लेणी मुंबईच्या समुद्रात असलेल्या घारापुरी बेटावर वसलेली हि लेणी भारतीय शिल्पकलेचा आणि धार्मिक परंपरेचा उत्कृष्ट नमुना आहेत. 

भगवान शिवाला समर्पित असलेल्या या लेण्यांमधील भव्य दगडी मूर्ती, सुंदर वास्तुकला आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे हे ठिकाण जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते.

१९८७ मध्ये युनेस्कोने एलिफंटा गुहा म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या लेण्यांना जागतिक स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

एलिफंटा लेणी कुठे आहे?

एलिफंटा लेणी या महाराष्ट्रातील मुंबई शहराजवळील घारापुरी बेटावर स्थित आहेत. हे बेट अरबी समुद्रात असून मुंबईच्या किनाऱ्यापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर आहे.

या बेटावर पोहोचण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून बोट सेवा उपलब्ध आहे. बोटीतून समुद्र प्रवास करत एलिफंटा बेटावर जाण्याचा अनुभव पर्यटकांसाठी खूप रोमांचक असतो.

एलिफंटाला कसे जायचे?

एलिफंटा लेणीला जाण्यासाठी खालील मार्ग वापरता येतो. 

१. मुंबईपर्यंत प्रवास

प्रथम मुंबई येथे रेल्वे, बस किंवा विमानाने पोहोचावे.

२. बोट प्रवास

मुंबईमध्ये आल्यानंतर गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा बेटासाठी बोट सेवा उपलब्ध असते.

बोट प्रवासाचा कालावधी

 सुमारे १ तास

प्रवासादरम्यान समुद्राचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. बेटावर पोहोचल्यानंतर लेण्यांपर्यंत जाण्यासाठी थोडे अंतर पायी चालावे लागते.

भेट देण्याचा सर्वोत्तम काळ

एलिफंटा लेणीला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा काळ सर्वात योग्य आहे. या काळात हवामान थंड आणि आनंददायी असते.

पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे बोट सेवा कधी-कधी बंद असते, त्यामुळे पावसाळ्यात भेट देणे टाळावे.

एलिफंटा फेस्टिवल 

दरवर्षी येथे एलिफंटा फेस्टिवल साजरा केला जातो. या उत्सवामध्ये भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. ऐतिहासिक लेण्यांच्या पार्श्वभूमीवर होणारा हा कार्यक्रम पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षक असतो.

एलिफंटा लेणीला भेट देताना टिप्स

सकाळी लवकर भेट दिल्यास गर्दी कमी असते.

उन्हाळ्यात पाणी आणि टोपी सोबत ठेवावी.

लेण्यांमधील शिल्पांना हात लावू नये.

कॅमेरा किंवा मोबाईलची बॅटरी चार्ज ठेवावी.

आरामदायक बूट घालावेत कारण थोडे चालावे लागते.

एलिफंटा लेणीचा इतिहास

सुमारे ५व्या ते ८व्या शतकादरम्यान तयार करण्यात आली असे मानले जाते. या लेण्यांची निर्मिती नेमकी कोणत्या राजवटीत झाली याबाबत मतभेद असले तरी इतिहासकारांच्या मते कलचुरी किंवा चालुक्य राजवटीच्या काळात या लेणी बांधल्या गेल्या असाव्यात.

प्राचीन काळात या बेटाला घारापुरी असे नाव होते. नंतर १६व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे एक मोठी दगडी हत्तीची मूर्ती पाहिली. त्या मूर्तीमुळे त्यांनी या बेटाला एलिफंटा बेट असे नाव दिले.

आज ती मूर्ती डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय येथे ठेवण्यात आली आहे.

एलिफंटा लेणीची वास्तुकला

एलिफंटा बेटावर एकूण ७ लेणी आहेत. यापैकी पाच लेणी हिंदू धर्माशी संबंधित आहेत, तर दोन लेणी बौद्ध परंपरेशी संबंधित मानली जातात.

सर्वात मोठी आणि प्रसिद्ध लेणी म्हणजे गुहा क्रमांक एक, हि लेणी मोठ्या दगडात कोरून तयार करण्यात आली आहे. लेणीमध्ये मोठे सभामंडप, मजबूत दगडी स्तंभ आणि भव्य शिल्पकला पाहायला मिळते.

या लेण्यांची खासियत म्हणजे दगडात कोरलेली भगवान शिवाची विविध रूपे दर्शवणारी शिल्पे. हजारो वर्षांपूर्वी अत्यंत साधनसामग्री असूनही कलाकारांनी तयार केलेली हि कलाकृती आजही आश्चर्यचकित करतात.

एलिफंटा लेणी मधील प्रमुख शिल्पे

१  त्रिमूर्ती शिव

एलिफंटा लेण्यांमधील सर्वात प्रसिद्ध शिल्प म्हणजे त्रिमूर्ती शिव. सुमारे २० फूट उंचीची हि भव्य मूर्ती भगवान शिवाचे तीन रूप दर्शवते.

सृष्टी (निर्मिती)

पालन

संहार

हि  मूर्ती एलिफंटाची ओळख मानली जाते.

2. अर्धनारीश्वर

या शिल्पामध्ये भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे संयुक्त रूप दर्शवले आहे. स्त्री आणि पुरुष शक्तीचे संतुलन या मूर्तीमधून दाखवले गेले आहे.

3. नटराज

नटराज रूपात भगवान शिव नृत्य करताना दाखवले आहेत. हे नृत्य विश्वाच्या सृजन आणि विनाशाचे प्रतीक मानले जाते.

4. गंगाधर

या शिल्पामध्ये भगवान शिव आपल्या जटांमधून गंगा नदी पृथ्वीवर आणताना दाखवले आहेत. हि भारतीय पुराणातील अत्यंत प्रसिद्ध कथा आहे.

5. कैलासमूर्ती

या शिल्पात रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला आणि शिवाने त्याला थांबवले असे दृश्य दर्शवले आहे.

FAQ

एलिफंटा गुहांचे वैशिष्ट्य काय आहे?

एलिफंटा गुहा (Elephanta Caves) या भारतातील प्राचीन शिल्पकलेचा अत्यंत उत्कृष्ट नमुना मानल्या जातात. या गुहा त्यांच्या भव्य शिल्पकला, धार्मिक महत्त्व आणि ऐतिहासिक वारसा यासाठी प्रसिद्ध आहेत.


एलिफंटा गुहांसाठी प्रवेश शुल्क किती आहे?

भारतीय पर्यटकांसाठी एलिफंटा लेण्यांचे प्रवेश तिकीट ४० रुपये आहे . सार्क आणि बिमस्टेक देशांतील पर्यटकांसाठीही एलिफंटा लेण्यांच्या तिकिटाची किंमत सारखीच आहे. मात्र, परदेशी नागरिकांना एलिफंटा लेण्यांच्या प्रवेशासाठी ६०० रुपये तिकीट शुल्क भरावे लागेल.

एलिफंटा गुहा कोणी बांधली?

एलिफंटा गुहा कलचुरी किंवा चालुक्य राजवटीच्या काळात (इ.स. ५–८ वे शतक) बांधल्या आहेत.

एलिफंटा गुहा पाहण्यासाठी किती वेळ लागतो?

एलिफंटा गुहा पाहण्यासाठी सुमारे तीन ते चार तास लगतात.

एलिफंटा गुहांमध्ये किती पायऱ्या आहेत?

एलिफंटा गुहेमद्धे सुमारे १२० ते १३० पायऱ्या आहेत.

इतके पर्यटक एलिफंटा गुहांना का भेट देतात?

भव्य शिल्पकला, प्राचीन इतिहास, समुद्रातील सुंदर स्थान आणि जागतिक वारसा दर्जा यामुळे एलिफंटा लेण्यांना मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात.

एलिफंटा गुहा पाहण्यासारखी आहे का?

इतिहास, कला आणि पर्यटन आवडणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी Elephanta Caves ला भेट द्यावी. येथे तुम्हाला प्राचीन भारतीय शिल्पकलेचा अप्रतिम अनुभव मिळतो.

Scroll to Top