एलोरा लेणी | Information Ellora Caves

महाराष्ट्र हे ऐतिहासिक वारसाने समृद्ध राज्य आहे. येथे अनेक किल्ले, मंदिरे आणि प्राचीन लेणी आढळतात. या ऐतिहासिक स्थळांमध्ये जगप्रसिद्ध आणि अत्यंत महत्त्वाचे स्थान म्हणजे एलोरा लेणी (वेरूळ लेणी). औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ गावाजवळ असलेल्या या लेणी भारतीय प्राचीन शिल्पकला, वास्तुकला आणि धार्मिक सहिष्णुतेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत.

एलोरा लेणी मध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माशी संबंधित लेणी एकाच ठिकाणी आढळतात. त्यामुळे हे ठिकाण भारताच्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक मानले जाते. १९८३ मध्ये ला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

एलोरा लेणी कुठे आहेत?

एलोरा लेणी हि महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर  शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर वेरूळ गावाजवळ आहेत.

हे ठिकाण डोंगरात कोरलेल्या भव्य लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना प्राचीन भारतीय वास्तुकलेचा अद्भुत अनुभव मिळतो.

एलोरा लेणीवर कसे जायचे ?

एलोरा लेणी (वेरूळ लेणी) महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहे. येथे जाण्यासाठी सर्वप्रथम (छत्रपती संभाजीनगर) शहरात पोहोचावे लागते. छत्रपती संभाजी नगर पासून सुमारे ३० किमी अंतरावर आहेत.

१. रस्त्याने (बस किंवा कार)

छत्रपती संभाजी नगर शहरातून एलोरा लेणीसाठी महाराष्ट्र शासनाची बस, टॅक्सी किंवा खासगी वाहन सहज उपलब्ध असतात. छत्रपती संभाजी नगर ते एलोरा लेणी मधील अंतर सुमारे २८.५ किलोमीटर आहे.

२. रेल्वेने

एलोरा लेणी पासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी आहे. या छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्टेशन पासून आपण बस किंवा टॅक्सीने एलोरा लेणी पर्यंत जाता येते.

एलोरा लेणीला भेट कधी द्यावी?

हिवाळा (ऑक्टोबर – मार्च)
हि एलोरा लेणी पाहण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. हवामान सुखद असल्यामुळे पर्यटकांना संपूर्ण परिसर आरामात फिरता येतो.

पावसाळा (जून – सप्टेंबर)
पावसाळ्यात परिसर हिरवागार आणि सुंदर दिसतो. मात्र पावसामुळे कधी-कधी फिरताना अडचण येऊ शकते.

उन्हाळा (एप्रिल – मे)
या काळात तापमान खूप जास्त असते, त्यामुळे दुपारी लेणी पाहणे थोडे कठीण होऊ शकते.

एलोरा लेणीचा इतिहास

एलोरा लेणी सुमारे इ.स. ६वे ते १०वे शतक या काळात तयार करण्यात आल्या. त्या काळात विविध राजवटींनी या लेण्यांची निर्मिती केली.विशेषतः राष्ट्रकूट राजवंश राजवटीच्या काळात येथे अनेक भव्य लेणी आणि मंदिरे बांधली गेली. या काळात शिल्पकलेला आणि धार्मिक वास्तूंना मोठे महत्त्व होते.

एलोरा लेणी मध्ये एकूण ३४ लेणी आहेत. त्यापैकी १२ बौद्ध लेणी, १७ हिंदू लेणी आणि ५ जैन लेणी आहेत. हि लेणी वेगवेगळ्या काळात तयार झाली असली तरी त्यामध्ये एकाच ठिकाणी तीन धर्मांची कला आणि संस्कृती पाहायला मिळते.

एलोरा लेणीची वास्तुकला

एलोरा लेणींची वास्तुकला अत्यंत भव्य आणि अद्भुत आहे. या लेणी डोंगरातील कठीण दगडात कोरून तयार करण्यात आल्या आहेत. कलाकारांनी दगडात कोरीव काम करून मंदिरे, सभामंडप, स्तंभ आणि शिल्पे तयार केली.

या लेण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दगडी कोरीव काम, शिल्पकला आणि धार्मिक कथांचे चित्रण दिसते. हजारो वर्षांपूर्वी आधुनिक साधने नसतानाही इतकी भव्य वास्तू तयार करणे हे त्या काळातील कलाकारांच्या कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे.

कैलास मंदिर – एलोरा लेणीचे मुख्य आकर्षण

एलोरा लेणी मधील सर्वात प्रसिद्ध आणि भव्य रचना म्हणजेकैलास मंदिर (लेणी क्रमांक १६).हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. हे संपूर्ण मंदिर एकाच मोठ्या दगडात कोरून तयार करण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठे मोनोलिथिक (एकाच दगडातील) मंदिर म्हणून याची ओळख आहे.

कैलास मंदिराची काही वैशिष्ट्ये

एकाच दगडात कोरलेले मंदिर

कैलास मंदिराची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे मंदिर एकाच मोठ्या दगडात कोरून तयार केले आहे. त्यामुळे याला जगातील सर्वात मोठे मोनोलिथिक मंदिर मानले जाते.

भव्य आणि विशाल रचना

हे मंदिर अत्यंत मोठे आणि भव्य आहे. मंदिराची उंची, लांबी आणि रुंदी पाहून पर्यटक आश्चर्यचकित होतात.

सुंदर कोरीव शिल्पकला

मंदिराच्या भिंतींवर आणि स्तंभांवर रामायण आणि महाभारत या महाकाव्यांमधील प्रसंगांचे सुंदर शिल्पकाम केलेले आहे.

भगवान शिवाला समर्पित मंदिर

हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. मंदिरात शिव, पार्वती आणि इतर देवतांची सुंदर शिल्पे पाहायला मिळतात.

राष्ट्रकूट काळातील निर्मिती

इतिहासकारांच्या मते हे मंदिर राष्ट्रकुट यांच्या राजवटीच्या काळात बांधण्यात आले.

जगप्रसिद्ध ऐतिहासिक वारसा

एललोर लेणी ला यूनेस्को ने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे कैलास मंदिरालाही आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे महत्त्व आहे.

बौद्ध लेणी

एलोरा लेणी मधील पहिल्या १२ लेणी बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. या लेण्यांमध्ये बौद्ध भिक्षूंसाठी निवासस्थान आणि प्रार्थना कक्ष तयार केले होते.

या लेण्यांमध्ये बुद्धांच्या मूर्ती, स्तूप आणि सुंदर कोरीव काम पाहायला मिळते. बौद्ध धर्माच्या शांत आणि आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव येथे मिळतो.

हिंदू लेणी

एलोरा लेणी मधील १३ ते २९ क्रमांकाची लेणी हिंदू धर्माशी संबंधित आहेत. या लेण्यांमध्ये शिव, विष्णू आणि इतर देवतांची भव्य शिल्पे कोरलेली आहेत.

विशेषतः कैलास मंदिर हि या लेण्यांमधील सर्वात भव्य रचना आहे.

जैन लेणी

एलोरा लेणी मधील शेवटची ५ लेणी जैन धर्माशी संबंधित आहेत. या लेण्यांमध्ये जैन तीर्थंकरांच्या मूर्ती आणि अत्यंत सुंदर कोरीव काम दिसते.

या लेण्यांची रचना अत्यंत नाजूक आणि कलात्मक आहे.

Scroll to Top