गोवा मध्ये २ दिवसांची परफेक्ट ट्रिप प्लॅन करायची आहे का? या मराठी गाइड मध्ये तुम्हाला उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा मधील प्रमुख पर्यटन स्थळांचा सविस्तर प्रवासाचा कार्यक्रम मिळेल. कळंगुट बीच, बागा बीच आणि अंजुना बीच यांसारख्या प्रसिद्ध बीचेसपासून ते अगुआडा किल्ला आणि श्री अनंत देवस्थान यांसारख्या ऐतिहासिक स्थळांपर्यंत सर्व माहिती येथे मिळेल.
या प्रवासाचा कार्यक्रमा मध्ये तुम्हाला ट्रॅव्हल ऑप्शन्स (पुणे ते गोवा), राहण्याचे पर्याय, बजेट प्लॅन, तसेच वॉटर स्पोर्ट्स आणि नाईटलाइफ अनुभवण्याचे टिप्स दिले आहेत. कमी वेळेत जास्तीत जास्त ठिकाणे कशी पाहायची, कोणत्या दिवसाला काय प्लॅन करायचा आणि खर्च कसा कमी ठेवायचा याबद्दलही मार्गदर्शन केले आहे.
जर तुम्ही २ दिवसांत गोव्याचा पूर्ण अनुभव घ्यायचा विचार करत असाल, तर हा प्रवासाचा कार्यक्रम तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
गोवाला कसे जायचे?
रेल्वेने
गोव्यातील सर्वात मुख्य आणि जवळचे रेल्वे स्टेशन मडगाव आणि वास्को-द-गामा आहेत. या स्टेशन पासून आपण गोव्यामधल्या पर्यटन स्थळापर्यंत जावू शकतो.
बसने
पुण्यामधील स्वारगेट या ठिकाणाहून माहराष्ट्र शासनाची गोवा जाण्यासाठी बस उपलब्ध आहे.
तुम्हाला माहराष्ट्र शासनाची साधी, सेमी-लक्झरी आणि शिवशाही (AC) या तिन्ही बस ने तुम्ही गोव्याला जावू शकता. यासाठी बसचे तिकीट अंदाजे ६०० ते १२०० रुपये आहे. तसेच या बस साठी सुमारे १० ते १४ तास लागतात.
सर्वात्तम महिना
तुम्ही गोव्याला ऑक्टोबर ते मार्च हे महिने सर्वात्तम आहेत.
पहिला दिवस उत्तर गोवा
सकाळ
कळंगुट बीच
कळंगुट समुद्रकिनारा हा क्वीन ऑफ बीचेस (Queen of Beaches) या नावाने ओळखला जातो. कळंगुट समुद्रकिनारा हा गोवा मधील सर्वात प्रसिद्ध आणि गजबजलेला समुद्र किनारा आहे. या कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरती परदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.
गुट समुद्रकिनारा हा लांबलचक समुद्रकिनारा आणि सुवर्ण रंगाची वाळू यांसाठी प्रसिद्ध आहे. या कळंगुट समुद्रकिनाऱ्या वरती सूर्योदय पाहण्याचा आनंद खूप मोठा आहे. तसेच या समुद्र किनाऱ्यावरती चालणे योगा करणे आणि फोटोग्राफीसाठी हे ठिकाण बेस्ट आहे.
या कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरती आपण विविध वॉटर स्पोर्ट्सचा आनंद सुद्धा घेऊ शकतो. जसे की, जेट स्की, बनाना राईड, पॅरासेलिंग आणि बंपर राईड यांसारख्या वॉटर स्पोर्ट्स चा आपण आनंद सुद्धा घेऊ शकतो.
बागा बीच
बागा बीच हा गोवा मधील सर्वात लोकप्रिय आणि गजबजलेला समुद्रकिनारा आहे. कळंगुट समुद्रकिनाऱ्याच्या जवळच हा बागा बीच आहे. बागा बीच हा नाईटलाइफ, वॉटर स्पोर्ट्स आणि मनोरंजनासाठी प्रसिद्ध आहे.
बागा बीच मध्ये सुद्धा आपण वॉटर स्पोर्ट्स चा आनंद घेऊ शकतो. जेट स्की, पॅरासेलिंग, बनाना राईड, स्पीड बोटिंग इत्यादी वॉटर स्पोर्ट्सचा आनंद आपण बागा बीच वरती घेऊ शकतो.
या बागा बीच वरती आपण वेगाने लाटांवर धावण्याचा सुद्धा आपण अनुभव घेऊ शकतो. तसेच बागा बीच वरती सुरक्षिततेसाठी प्रशिक्षित लाइफगार्ड्सही असतात.
या बीचची आणखी एक खासियत म्हणजे त्याची प्रसिद्ध नाईटलाइफ. बागा बीच परिसरातील टिटोची गल्ली हे ठिकाण पार्टी आणि म्युझिकसाठी ओळखले जाते. येथे अनेक क्लब्स, बार्स आणि कॅफे आहेत, जिथे रात्री उशिरापर्यंत संगीत, डान्स आणि मनोरंजन चालते.
बागा बीच वर अनेक बीच शॅक्स आणि रेस्टॉरंट्स आहेत, जिथे तुम्हाला विविध प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ मिळतात. गोवन सीफूड, थंड पेय आणि लाईव्ह म्युझिकचा आनंद घेत समुद्रकिनाऱ्यावर बसणे हा एक वेगळाच अनुभव असतो. तसेच, येथे शॉपिंगसाठीही अनेक लहान दुकाने आहेत, जिथून तुम्ही स्मरणिका खरेदी करू शकता.
दुपारी
अगुआडा किल्ला
अगुआडा हा किल्ला १६१२ मध्ये पोर्तुगीजांनी बांधला होता. याच काळामध्ये मराठी आणि डच यांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला होता.
फोर्ट अगुआडा हा किल्ला गोवा मधील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला आहे. अगुआडा या शब्दाचा अर्थ पोर्तुगीज भाषेत पाणी असा होतो. या किल्ल्यामद्धे मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्याची टाकी बांधण्यात आली होती. त्या काळी हि टाकी जहाजांना पिण्याचे पाणी पुरवत असे.
या अगुआडा किल्ल्याचे अजून एक वेशिष्ट्य आहे ते म्हणजे या ठिकाणी आशियातील सर्वात जुन्या दीपगृहांपैकी एक दीपगृह आहे. या दीपगृहाचा उपयोग समुद्रात प्रवास करणाऱ्या जहाजांना दिशा दाखवण्यासाठी होत असे.
हा दीपगृह १८६४ साली बांधण्यात आला होता. या अगुआडा किल्ल्या वरुन सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी येथील दृश्य अधिकच सुंदर दिसते. त्यामुळे फोटोग्राफीसाठी हे ठिकाण खूप लोकप्रिय आहे. या किल्ल्याचा काही भाग आता कारागृह म्हणूनही वापरला जातो, त्यामुळे पर्यटकांना काही मर्यादित भागातच फिरता येते.
कँडोलिम बीच
कँडोलिम बीच हा उत्तर गोव्यामध्ये असून तो कळंगुट बीच आणि बागा बीच यांच्या तुलनेत थोडा शांत आणि कमी गर्दीचा मानला जातो. त्यामुळे शांत वातावरणात वेळ घालवू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
कँडोलिम बीच चे वेशिष्ट्य म्हणजे स्वच्छ, लांब पसरलेला वाळूचा किनारा आणि निळेशार समुद्र. येथे पर्यटकांना समुद्रकिनारी फिरणे तसेच विविध वॉटर स्पोर्ट्स जसे की जेट-स्की, पॅरासेलिंग यांचा आनंद घेता येतो.
बीचच्या आसपास अनेक शॅक्स म्हणजे छोटे रेस्टॉरंट्स आहेत, जिथे गोवन खाद्यपदार्थ आणि ताजे सीफूड चाखायला मिळते.
या बीचजवळच प्रसिद्ध अगुआडा किल्ला आहे, जो पोर्तुगीज काळातील ऐतिहासिक वास्तू आहे. पर्यटक येथे जाऊन सुंदर समुद्र दृश्यांचा आनंद घेऊ शकतात. कँडोलिम बीच सूर्यास्तासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
सायंकाळ
अंजुना बीच
अंजुना बीच हा उत्तर गोवा मध्ये वसलेला असून तो नेसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. अंजुना बीच हा तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या अंजुना बीचचे वेशिष्ट्य म्हणजे खडकाळ किनारा आणि निळाशार समुद्र. इतर बीचच्या तुलनेत अंजुना बीच थोडा वेगळा वाटतो, कारण येथे वाळूसोबत मोठे दगडही आढळतात. त्यामुळे येथे फोटोग्राफीसाठी सुंदर लोकेशन्स मिळतात.
अंजुना बीच वर दर आठवड्याला होणारा जुना बाजार खूप प्रसिद्ध आहे. येथे कपडे, दागिने, हस्तकला वस्तू खरेदी करता येतात. परदेशी पर्यटकांमुळे या बाजाराला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झालेले आहे.
या अंजुना बीच वरुन येथील सूर्यास्त खूप सुंदर दिसतो, म्हणजे आकाशातील रंगछटा आणि समुद्राचा नजारा पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात. तसेच या अंजुना बीचच्या आसपास अनेक कॅफे, बीच शॅक्स आणि रेस्टॉरंट्स आहेत, जिथे स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि लाईव्ह म्युझिकचा आनंद घेता येतो.
वागाटोर बीच
वागाटोर बीच हा उत्तर गोवा मध्ये असून तो शांत समुद्र किनारा म्हणून ओळखला जातो. या बीच नेसर्गिक सोंदर्यामुळे आणि खडकाळ किनाऱ्यामुळे पर्यटकांमध्ये तो खूप लोकप्रिय आहे. वागाटोरच्या एका बाजूला हिरवीगार टेकड्या आणि दुसऱ्या बाजूला निळाशार अरबी समुद्र आहे. त्यामुळे येथील सूर्यास्ताच्या वेळी दृश्य अधिकच सुंदर दिसते आणि यांमुळेच वागाटोर बीच हा फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण आहे.
या बीचच्या जवळच प्रसिद्ध चापोरा किल्ला आहे, जिथून संपूर्ण वागाटोर आणि समुद्राचे दृश्य दिसते. हा किल्ला दिल चाहता हे या चित्रपटामुळेही प्रसिद्ध झाला आहे. वागाटोर बीच वर पर्यटकांना फार मोठी गर्दी नसल्यामुळे येथे शांत वातावरण अनुभवता येते. तसेच येथे काही बीच शॅक्स आणि कॅफे आहेत, जिथे गोवन खाद्यपदार्थ आणि ताजे सीफूड मिळते. संध्याकाळी हलक्या संगीतासोबत जेवणाचा आनंद घेणे हा एक खास अनुभव आहे.
रात्री
टिटोज लेन
टिटोज लेन हे गोवा मधील सर्वात प्रसिद्ध नाईटलाइफ डेस्टिनेशनपैकी एक आहे. उत्तर गोव्यातील बागा बीच जवळ असलेली हि लेन रात्रीच्या वेळी लाईट्स, म्युझिक आणि उत्साही वातावरणामुळे पूर्णपणे जिवंत होते. तरुण पर्यटक, मित्रमंडळी आणि पार्टी लव्हर्ससाठी हे ठिकाण खास आकर्षण ठरते.
टिटोज लेन मध्ये अनेक लोकप्रिय क्लब्स, बार्स आणि लाउंजेस आहेत. यामध्ये टिटोज क्लब आणि मॅम्बोज हे सर्वात प्रसिद्ध क्लब मानले जातात. येथे DJ म्युझिक, लाईव्ह परफॉर्मन्स, डान्स फ्लोअर आणि विविध थीम पार्टीज आयोजित केल्या जातात, ज्यामुळे पर्यटकांना एक वेगळाच अनुभव मिळतो.
या लेनमध्ये फक्त नाईटलाइफच नाही, तर विविध प्रकारचे खाद्यपदार्थही मिळतात. येथे गोवन, भारतीय आणि कॉन्टिनेंटल फूड सहज उपलब्ध आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या जागी तुम्ही खाणे, पिणे आणि म्युझिकचा आनंद एकत्र घेऊ शकता.
सुरक्षेच्या दृष्टीने टिटोज लेन मध्ये पोलिस आणि सिक्युरिटीची व्यवस्था असते, त्यामुळे पर्यटक सुरक्षितपणे मजा करू शकतात. मात्र, क्लबमध्ये एंट्री फी आणि ड्रेस कोड असू शकतो, त्यामुळे आधी माहिती घेणे योग्य ठरते.
दूसरा दिवस
सकाळ
कोलवा बीच
कोलवा बीच हा लांब आणि विस्तीर्ण किनारपट्टी पर्यटकांना फिरण्यासाठी आणि सूर्यस्नान करण्यासाठी खूप आवडते. सकाळी येथे चालणे, योगा करणे किंवा शांततेत समुद्राचा आवाज ऐकणे हा एक सुखद अनुभव असतो. सूर्यास्ताच्या वेळी आकाशातील रंगछटा आणि समुद्राचे दृश्य अत्यंत मनमोहक दिसते, त्यामुळे फोटोग्राफी साठीही हे ठिकाण लोकप्रिय आहे.
या बीचच्या आसपास अनेक बीच शॅक्स आणि रेस्टॉरंट्स आहेत, जिथे गोवन सीफूड, भारतीय आणि कॉन्टिनेंटल पदार्थ मिळतात. तसेच, येथे लहान-मोठ्या दुकानांमध्ये स्थानिक हस्तकला वस्तू खरेदी करता येतात.
कोलवा बीच वर वॉटर स्पोर्ट्सही उपलब्ध आहेत, जसे की बोटिंग आणि काही साहसी खेळ, पण इतर गजबजलेल्या बीचच्या तुलनेत येथे शांतता जास्त आहे.
बेनौलिम बीच
बेनौलिम बीच हा गोवा मधील दक्षिण गोव्यात वसलेला एक अतिशय शांत आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. हा बीच विशेषतः शांत वातावरण, स्वच्छ पांढरी वाळू आणि निसर्गसौंदर्यासाठी ओळखला जातो. गर्दीपासून दूर असल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना एकदम रिलॅक्स आणि शांत अनुभव मिळतो.
बेनौलिम बीच हा कुटुंबांसाठी आणि शांत सुट्टीसाठी उत्तम मानला जातो. सकाळच्या वेळी येथे चालणे, योगा करणे किंवा समुद्रकिनाऱ्यावर बसून लाटांचा आवाज ऐकणे हा अनुभव अत्यंत सुखद असतो. सूर्यास्ताच्या वेळी आकाशातील सोनेरी आणि केशरी रंगछटा समुद्रावर पडतात आणि दृश्य अतिशय मनमोहक दिसते.
या बीचच्या आसपास काही छोटे बीच शॅक्स आणि रेस्टॉरंट्स आहेत, जिथे गोवन सीफूड, भारतीय पदार्थ आणि थंड पेय मिळतात. तसेच, स्थानिक मासेमारी संस्कृती इथे पाहायला मिळते, कारण सकाळी मच्छिमार समुद्रातून मासे घेऊन येताना दिसतात.
बेनौलिम बीच वर वॉटर स्पोर्ट्स फार जास्त नाहीत, त्यामुळे इथे मुख्य आकर्षण म्हणजे शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य. फोटोग्राफी आणि आरामदायी वेळ घालवण्यासाठी हे एक परफेक्ट ठिकाण आहे.
दुपारी
श्री गोमंतेश्वर मंदिर
श्री गोमंतेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असलेले एक सुंदर आणि शांत मंदिर आहे. हे मंदिर जुन्या गोव्यामध्ये ब्रह्मपुरी परिसरात स्थित असून, गर्दीपासून थोडे दूर असल्यामुळे येथे शांत वातावरण अनुभवायला मिळते.
या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे असलेले भव्य शिवलिंग. मंदिराची रचना साधी पण आकर्षक आहे, आणि परिसरात हरित झाडे व शांतता असल्यामुळे येथे येणाऱ्या भक्तांना आध्यात्मिक शांती मिळते. स्थानिक लोकांमध्ये या मंदिराला विशेष श्रद्धा आहे आणि महाशिवरात्रीच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी होते.
श्री अनंत देवस्थान
श्री अनंत देवस्थान हे गोवा मधील सावईवेरे या गावात वसलेले एक प्रसिद्ध आणि पवित्र मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूच्या अनंत या रूपाला समर्पित असून, गोव्यातील प्राचीन देवस्थानांपैकी एक मानले जाते.
या मंदिराची वास्तुकला पारंपरिक गोमंतकीय शैलीत बांधलेली असून, त्यामध्ये सुंदर दीपस्तंभ, मंडप आणि शांत परिसर पाहायला मिळतो. मंदिराभोवती हिरवाई आणि निसर्गसौंदर्य असल्यामुळे येथे एक प्रसन्न आणि शांत वातावरण अनुभवायला मिळते. शहराच्या गोंगाटापासून दूर असल्यामुळे भक्त आणि पर्यटक येथे मनःशांतीसाठी येतात.
श्री अनंत देवस्थानचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथे साजरे होणारे धार्मिक उत्सव. विशेषतः अनंत चतुर्दशी आणि इतर उत्सवांच्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी होते. या वेळी मंदिरात पारंपरिक पूजा, भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामुळे वातावरण अत्यंत भक्तिमय बनते.
सायंकाळ
मिरामार बीच
मिरामार बीच हा गोवा मधील एक सुंदर आणि लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. हा बीच पणजी शहराजवळ असल्यामुळे पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. शहराच्या गजबजाटापासून थोड्या अंतरावर असलेला हा किनारा शांत आणि रम्य वातावरण देतो.
मिरामार बीचची खासियत म्हणजे त्याची लांब किनारपट्टी, मऊ सुवर्ण वाळू आणि स्वच्छ समुद्र. सकाळच्या वेळी येथे चालणे, धावणे किंवा योगा करणे अनेकांना आवडते. समुद्राच्या लाटांचा मंद आवाज आणि थंड वारा मनाला प्रसन्न करतो. त्यामुळे हे ठिकाण रिलॅक्स होण्यासाठी उत्तम आहे.
या बीचवरून मांडवी नदी समुद्रात मिळताना दिसते, जे एक आकर्षक दृश्य आहे. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्त पाहण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर लोक येतात. आकाशातील रंगछटा आणि समुद्राचे दृश्य खूपच मनमोहक दिसते, त्यामुळे फोटोग्राफीसाठी हे ठिकाण लोकप्रिय आहे.
मिरामार बीच परिसरात काही कॅफे, रेस्टॉरंट्स आणि लहान दुकाने आहेत, जिथे तुम्ही खाण्यापिण्याचा आणि शॉपिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच, जवळच डोना पॉला असल्यामुळे दोन्ही ठिकाणे एकाच दिवशी पाहता येतात.
डोना पॉला
डोना पॉला हे गोवा मधील एक अतिशय सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण पणजी जवळ वसलेले असून, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले एक प्रसिद्ध व्ह्यूपॉइंट (viewpoint) म्हणून ओळखले जाते.
डोना पॉला हे आपल्या अप्रतिम समुद्रदृश्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे उभे राहून तुम्हाला विशाल समुद्र, लाटांचा आवाज आणि दूरवर पसरलेले निळे पाणी पाहायला मिळते. विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी येथील दृश्य अत्यंत मनमोहक दिसते, त्यामुळे अनेक पर्यटक संध्याकाळच्या वेळी येथे येतात.
या ठिकाणामागे एक रोमँटिक कथा देखील प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की डोना पाउला नावाच्या एका पोर्तुगीज महिलेशी संबंधित प्रेमकथा येथे घडली होती, ज्यामुळे या ठिकाणाला हे नाव मिळाले. त्यामुळे हे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते.
डोना पॉला परिसरात काही वॉटर स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीजही उपलब्ध आहेत, जसे की कयाकिंग आणि बोट राईड. तसेच, येथे लहान दुकाने आणि स्टॉल्स आहेत, जिथून तुम्ही स्मरणिका खरेदी करू शकता.
ट्रॅव्हल टिप्स
तुम्हाला गोव्यामध्ये फिरायला बाइक किंवा स्कूटर भाड्याने मिळू शकते. या बाइक च्या भाड्याची अंदाजे किंमत एक दिवसाची ३०० ते ५०० रुपये असू शकते.
आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन, सनग्लासेस स्वतः जवळ ठेवा.
तुम्ही भाड्याने गाडी घेताना त्या गाडीचा आधी सर्व बाजूंनी फोटो काढून घ्या.
गोवा फिरण्यासाठी दोन दिवसाचा अंदाजे खर्च एक माणसासाठी
प्रवासाचा खर्च १५०० ते ३००० रुपये असू शकतो.
राहण्यासाठी १००० ते ३००० रुपये असू शकतो.
जेवणाचा खर्च ८०० ते १५०० रुपये असू शकतो.
अॅक्टिविटी साठी १००० ते २००० रुपये असू शकतो.
