Mahabaleshwar Trip Cost From Pune

महाबळेश्वर हे महाराष्ट्रामधील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. पुण्यपासून महाबळेश्वर सुमारे १३९ किलोमीटर अंतरावर आहे.पुणे ते महाबळेश्वर हा प्रवास निसर्गरम्य डोंगररस्त्यांमधून होणारा एक सुंदर अनुभव आहे. विकेंड ट्रिप, कपल ट्रिप किंवा फॅमिली ट्रिपसाठी महाबळेश्वर एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. महाबळेश्वर मध्ये विल्सन पॉइंट, आर्थरचे आसन, एलिफंट हेड पॉइंट. वेण्णा लेक, लिंगमाला धबधबा, मॅप्रो गार्डन इत्यादी पर्यटन स्थळे पाहण्यासारखे आहेत. 

How to get from Pune to Mahabaleshwar? | पुण्यामधून महाबळेश्वरला कसे जायचे?

बसने 

महाराष्ट्र शासनाच्या बस ने पुण्यामधून महाबळेश्वरला जाता येते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या बसचे तिकीट दर हा अंदाजे खर्च ३०० ते ८०० रुपये आहे. 

कार/बाइक 

आपण पुण्यामधून सुद्धा कारने किंवा बाइकने सुद्धा जावू शकतो. पुण्यामधून कारने महाबळेश्वरला जाण्यासाठी खाली मार्ग दिल आहे. 

पुणे → खेड शिवपूर → खंडाळा → पांचगणी → महाबळेश्वर 

रेल्वेने 

पुण्यपासून थेट महाबळेश्वरला रेल्वे नाही. महाबळेश्वर पासून जवळचे रेल्वे स्टेशन सातारा या ठिकाणी आहे. महाबळेश्वर ते सातारा रेल्वे स्टेशन हे सुमारे ६० किलोमीटर अंतरावर आहे.  सातारा रेल्वे स्टेशन पासून आपल्याला बसने किंवा प्रायवेट गाडीने जाता येते. 

पुणे स्टेशनमधून दुपारच्या एक वाजता कोयना एक्सप्रेस रेल्वे आहे. याचा कोड ११०२९ आहे. या रेल्वेने तुम्ही दुपारच्या ३ वाजून ५७ मिनिटांनी सातारा मध्ये पोहचता. सातारा मधून तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या बसने किंवा प्रायवेट गाडीने महाबळेश्वरला जावू शकता. 

महाबळेश्वरला जाण्यासाठी सर्वात्तम महिना

जून ते सप्टेंबर

या महिन्यांमध्ये महाबळेश्वर मध्ये हिरवागार निसर्ग, धुके आणि धबधबे वाहताना दिसतात. या महिन्यांमध्ये लिंगमाला धबधबा खूप सुंदर दिसतो.

नोव्हेंबर ते फेब्रुवारी

या महिन्यांमध्ये महाबळेश्वरमध्ये भरपूर थंडी असते.

Cost of the Mahabaleshwar Trip | महाबळेश्वर ट्रीपचा खर्च

अंदाजे खर्च (२ जणांसाठी) 

गोष्टीअंदाजे खर्च (रुपयांमद्धे)
पेट्रोल (स्वतःची गाडी) ८०० ते १०००
बस (एसटी / खाजगी) ३०० ते ६०० प्रती व्यक्ती
हॉटेल (एक रात्र) १५०० ते ५०००
जेवण (दोन वेळा) ५०० ते १०००
पर्यटन ठिकाणे २०० ते ५००
एकूण अंदाजे ३५०० ते ८०००

Places to Visit in Mahabaleshwar | महाबळेश्वर मधील पाहण्यासारखे ठिकाण

वेण्णा लेक 

वेण्णा लेक हा महाबळेश्वर मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. वेण्णा लेक हा एक कृत्रिम तलाव असून तो महाबळेश्वर पासून सुमारे ३.४ किलोमीटर अंतरावर आहे. वेण्णा लेक हा सुमारे १९४२ मध्ये राजे आप्पासाहेब यांनी बांधला होता. तसेच हा वेण्णा लेक सुमारे २८ एकरामध्ये पसरलेला आहे. वेण्णा लेक हा फोटो काढण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. तसेच वेण्णा लेकच्या ठिकाणी डोंगर, पाणी आणि  हिरवळ यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. 

वेण्णा लेक मधील आकर्षणे 

बोटिंग 

वेण्णा लेकचे मुख्य आकर्षण म्हणजे बोटिंग. या वेण्णा लेक मध्ये पॅडल बोट आणि रो बोट या दोन्ही बोट उपलब्ध आहेत. अर्ध्या तासाठी बोटिंगचे चार्जेस अंदाजे ४०० रुपये तर एका तासासाठी अंदाजे ८०० रुपये आहेत. 

घोडेस्वारी 

वेण्णा लेकच्या काठावर घोडेस्वारी उपलब्ध आहे. तुम्हाला वेण्णा लेकच्या ठिकाणी घोडेस्वारीचा कुटुंबा सोबत आनंद घेत येतो. घोडेस्वारीचे चार्जेस अंदाजे २०० रुपये आहेत. 

खाद्यपदार्थ 

महाबळेश्वर मधील वेण्णा लेकच्या परिसरा मधील खाद्यपदार्थ पर्यटकांसाठी एक खास आकर्षण आहे. या ठिकाणी तुम्हाला गरमागरम भुट्टा, वडा-पाव, पावभाजी, भेळपुरी आणि चाट यांसारखे स्ट्रीट फूड सहज मिळते. थंड हवामानात गरम मॅगी आणि कॉर्न सूप सुद्धा मिळते. तसेच, महाबळेश्वर प्रसिद्ध असलेली स्ट्रॉबेरी, क्रीमसोबत सर्व्ह केली जाते, जी पर्यटकांची खास पसंती आहे. तलावाजवळील स्टॉल्सवर चहा, कॉफी आणि थंड पेयही उपलब्ध असतात.

कसे जायचे 

आपल्याकडे बाइक किंवा कार असेल तर महाबळेश्वर मधून वेण्णा लेक वर कसे जायचे याचा मार्ग खाली दिला आहे. 

पोलादपूर – वाई – सुरुड रस्ता

मॅप्रो गार्डन

मॅप्रो गार्डन हे स्ट्रॉबेरी आणि त्यापासून बनवलेल्या विविध पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच हे महाबळेश्वर मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. मॅप्रो गार्डन मध्ये तुम्हाला ताज्या स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी विथ क्रीम, जॅम, ज्यूस, क्रश, चॉकलेट्स आणि इतर अनेक फूड प्रॉडक्ट्स चाखायला मिळतात. 

येथे एक मोठे फूड कोर्ट आहे, जिथे पिझ्झा, सँडविच,आईस्क्रीम आणि विविध स्नॅक्स उपलब्ध असतात. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. या गार्डनचे वातावरण खूपच स्वच्छ, हिरवेगार आणि प्रसन्न आहे. 

मुलांसाठी खेळण्याची जागा आणि बसण्यासाठी आरामदायी व्यवस्था देखील आहे. पर्यटक येथे फोटोग्राफीचा आनंद घेतात. मॅप्रो गार्डन मध्ये दरवर्षी स्ट्रॉबेरी फेस्टिवल आयोजित केला जातो, ज्यामध्ये विविध स्ट्रॉबेरी पदार्थ, लाइव्ह म्युझिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. त्यामुळे या काळात येथे विशेष गर्दी असते.

कसे जायचे 

वेण्णा लेक पासून मॅप्रो गार्डन हे सुमारे ९ किलोमीटर अंतरावर आहे. वेण्णा लेक पासून मॅप्रो गार्डन वर कसे जायचे याचा मार्ग खाली दिला आहे. 

वेण्णा लेक → मला कॉलनी → मॅप्रो गार्डन

सनसेट पॉइंट किंवा बॉम्बे पॉइंट 

सनसेट पॉइंट  हा महाबळेश्वर मधील सर्वात प्रसिद्ध सूर्यास्त पाहण्याचा ठिकाण आहे. याला बॉम्बे पॉइंट असेही म्हणतात, कारण जुन्या काळी येथून मुंबईच्या दिशेने रस्ता जात होता. 

संध्याकाळच्या वेळी आकाशात लाल, केशरी आणि सोनेरी रंगांची उधळण होते आणि सूर्य हळूहळू डोंगरांच्या मागे मावळताना दिसतो. या दृश्यामुळे येथे रोज मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होते. 

सनसेट पॉइंट परिसर खूप मोकळा आणि प्रशस्त आहे, त्यामुळे कुटुंबासोबत बसून आरामात सूर्यास्ताचा आनंद घेता येतो. येथे घोडेस्वारी आणि लहान मुलांसाठी काही मनोरंजनाचे पर्यायही उपलब्ध आहेत. 

तसेच, जवळच छोटे स्टॉल्स आहेत जिथे चहा, कॉर्न (भुट्टा) आणि स्नॅक्स मिळतात. फोटोग्राफीसाठी हे ठिकाण खूपच लोकप्रिय आहे, कारण सूर्यास्ताच्या वेळी मिळणारे दृश्य खूप सुंदर असते. विशेषतः हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात येथे हवामान स्वच्छ असल्यामुळे दृश्य अधिक स्पष्ट दिसते.

कसे जायचे 

मॅप्रो गार्डन पासून सनसेट पॉइंट हा सुमारे १३.७ किलोमीटर अंतरावर आहे. मॅप्रो गार्डन पासून सनसेट पॉइंट वर कसे जायचे याचा मार्ग खाली दिला आहे. 

मॅप्रो गार्डन → मेटगुटाड → वेण्णा लेक → सनसेट पॉइंट 

विल्सन पॉइंट 

विल्सन पॉइंट हा महाबळेश्वर मधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. विल्सन पॉइंट हा महाबळेश्वर पासून सुमारे ३.७ किलोमीटर अंतरावर आहे. विल्सन पॉइंट हा समुद्र सपाटी पासून सुमारे १४३९ मीटर उंचीवर आहे. विल्सन पॉइंट हा एक व्ह्यूपॉइंट्स आहे. ज्याच्या चारही बाजूला डोंगररांगा, हिरवागार निसर्ग आणि धुके यांचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. 

कसे जायचे 

सनसेट पॉइंट पासून विल्सन पॉइंट हा सुमारे ५.३ किलोमीटर अंतरवबर आहे.  

सनसेट पॉइंट → मैन मार्केट महाबळेश्वर → विल्सन पॉइंट 

आर्थर्स सीट 

महाबळेश्वर मधील आर्थर्स सीट हे अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.  या आर्थर्स सीट लाच क्वीन ऑफ ऑल पॉईंट्स या नावाने सुद्धा ओळखले जाते. या आर्थर्स सीट पॉइंट वरुन सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील अप्रतिम  निसर्ग सोंदर्य दिसते. तसेच या आर्थर्स सीटपॉइंट वरून सावित्री नदीची खोल दरी सुद्धा दिसते. 

एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नावावरून आर्थर्स सीटला नाव देण्यात आलेले आहे. हा अधिकारी आपल्या कुटुंबाच्या आठवणीमद्धे इथे बसून वेळ घालवत असे. यामुळे या ठिकाणाला याचे  नव देण्यात आलेले आहे. 

फोटोग्राफी आवडणाऱ्यांसाठी आर्थर सीट म्हणजे एक स्वर्गच आहे. सकाळच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी इथले फोटो खूप सुंदर येतात. 

कसे जायचे

विल्सन पॉइंट वरून आर्थर्स सीट हे सुमारे १८.६ किलोमीटर अंतरावर आहे. 

विल्सन पॉइंट → रंजनवाडी → मार्जोरी पॉईंट → आर्थर्स सीट

लिंगमाला धबधबा

लिंगमाला धबधबा हा महाबाकेश्वर मधील एक अतिशय सुंदर आणि लोकप्रिय धबधबा आहे. हा धबधबा महाबळेश्वर–पुणे रस्त्यावर वसलेला असून,पावसाळ्यात येथे पाण्याचा प्रचंड प्रवाह पाहायला मिळतो.

लिंगमाला धबधबाची उंची सुमारे ५०० फूट एवढी आहे,त्यामुळे उंचावरून कोसळणारे पाणी आणि त्यातून तयार होणारा धुरकट धुके पर्यटकांना आकर्षित करतात.या ठिकाणी दोन वेगवेगळे व्ह्यूपॉइंट्स आहेत एक मोठा धबधबा दूरून पाहण्यासाठी आणि दुसरा लहान धबधब्याजवळ जाण्यासाठी,जिथे पर्यटक पाण्यात खेळू शकतात.

येथील हिरवागार निसर्ग, थंड हवा आणि शांत वातावरण मनाला प्रसन्न करतात. विशेषतः जुलै ते सप्टेंबर या काळात हा धबधबा सर्वात सुंदर दिसतो. मात्र, पावसाळ्यात सुरक्षा लक्षात घेऊन काळजी घेणे आवश्यक आहे, कारण पायवाटा ओल्या आणि घसरड्या असतात. लिंगमाला धबधबा हे फोटोग्राफीसाठीही खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. 

कसे जायचे

आर्थर्स सीट पासून लिंगमाला धबधबा हा सुमारे १४.२ किलोमीटर अंतरावर आहे.

आर्थर्स सीट → लिंगमाला धबधबा

दोन दिवसाचा प्लान 

दिवस १: पुणे → महाबळेश्वर → वेण्णा तलाव → मॅप्रो गार्डन → सनसेट पॉइंट

दिवस २: विल्सन पॉइंट (सूर्योदय) → आर्थर्स सीट → लिंगमाला धबधबा → परत पुणे

FAQ

महाबळेश्वरसाठी दोन दिवस पुरेसे आहेत का?

होय नक्कीच, दोन दिवस महाबळेशावर फिरण्यासाठी पुरेसे आहेत. यामध्ये तुम्ही वेण्णा लेक, सनसेट पॉइंट, मॅप्रो गार्डन, लिंगमाला धबधबा इत्यादी ठिकाणी भेट देऊ शकता.

महाबळेश्वरला भेट देणे योग्य आहे का?

होय महाबळेश्वर ला भेट देणे योग्य आहे. कारण हे थंड हवेचे ठिकाण आहे.

महाबळेश्वरची ५ प्रमुख ठिकाणे कोणती आहेत?

वेण्णा लेक, सनसेट पॉइंट, मॅप्रो गार्डन, लिंगमाला धबधबा, विल्सन पॉइंट हे महाबळेश्वर मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.

महाबळेश्वर कोणत्या खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध आहे?

महाबळेश्वर स्ट्रॉबेरी आणि स्ट्रॉबेरी क्रीम साठी तसेच कॉर्न भुट्टा यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

महाबळेश्वर महाग आहे का?

महाबळेश्वर मध्ये दोन दिवसाच्या ट्रीप साठी अंदाजे ३५०० ते ८००० हजार रुपये खर्च येतो.

Scroll to Top