केळशी बीच हा रत्नागिरी जिल्ह्यात असून तो रत्नागिरी पासून सुमारे १८० किलोमीटर अंतरावर आहे. केळशी समुद्रकिनारा हा शांत स्वछ आणि निसर्ग रम्य समुद्र आहे. या बीचचे मुख्य वेशिष्ट्य म्हणजे समुद्र किनाऱ्यावर असलेली पांढरी वाळू आणि नारळाची झाडे आहेत. या बीचच्या शेजारीच कनक आदित्य मंदिर आहे. हे मंदिर सूर्य देवाला समर्पित आहे. या केळशी बीचवर मोठ्या प्रमाणात वॉटर स्पोर्ट्स नसले तरी या ठिकाणी शांततेत वेळ घालवणे, फोटोग्राफी आणि समुद्र किनाऱ्यावर बसून सूर्यास्त पाहणे हेच मुख्य आकर्षण आहे. या बीचवर राहण्यासाठी काही होमस्टे आणि रेसॉर्टस उपलब्ध आहेत. तसेच या ठिकाणी तुम्हाला कोकणी जेवणाचा आस्वाद सुद्धा घेता येतो. मासे, सोलकढी आणि भात हे पदार्थ या ठिकाणी लोकप्रिय आहेत.
How to get to Kelshi Beach? | केळशी बीचवर कसे जायचे?
केळशी बीच हा पुण्यापासून सुमारे १९८ किलोमीटर आणि मुंबई पासून सुमारे २१८ किलोमीटर अंतरावर आहे.
बसने
केळशी बीचवर जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाची बस उपलब्ध आहे. परंतु हि बस चिपळूण पर्यंतच आहे. चिपळून पासून तुम्हाला टॅक्सी किंवा प्रायवेट गाडीने जावे लागते. चिपळूण पासून केळशी बीच हा सुमारे ९३.८ किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वेने
केळशी बीच पासून जवळचे रेल्वे स्टेशन चिपळूण या ठिकाणी आहे. केळशी बीच पासून चिपळूणच्या रेल्वे स्टेशनचे अंतर सुमारे ९२.४ किलोमीटर अंतरावर आहे. या रेल्वे स्टेशन पासून आपण टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने केळशी बीचवर जावू शकतो.
केळशी बीचवर जाण्यासाठी सर्वात्तम महिना
जून ते सेप्टेंबर (पावसाळा)
या महिन्यांमध्ये केळशी बीचचा आजूबाजूचा निसर्ग हिरवागार आसतो. परंतु समुद्र खवळलेला असतो.
ऑक्टोबर ते मार्च (हिवाळा)
या महिन्यांमध्ये केळशी बीचचे हवामान थंड असते. परंतु समुद्र शांत असतो.
एप्रिल ते मे (उन्हाळा)
या महिन्यांमध्ये केळशी बीचच्या आजूबाजूचे वातावरण कोरडे असते.
Tourist Attractions at Kelshi Beach | केळशी बीच वरील प्रेक्षणीय स्थळे
महालक्ष्मीचे मंदिर
हे महालक्ष्मीचे मंदिर स्थानिक लोकांसाठी खूप पवित्र आहे. या मंदिरामध्ये शांत आणि प्रसन्न वातावरण पहायला मिळते.
केळशीची वाळू
केळशी वाळूचे डोंगर या ठिकाणाचे मुख्य आकर्षण आहे. तसेच या ठिकाणी चालणे आणि फोटोग्राफी करने हा मजेशीर अनुभव आहे.
समुद्र किनारा
केळशी बीचचा समुद्रकिनारा स्वछ आणि कमी गर्दीचा आहे. या ठिकाणाचे वातावरण शांत आहे.
निसर्ग आणि गावाचा अनुभव
या केळशी गावामध्ये नारळ सुपारी आणि काजूची झाडे आहेत. तसेच या गावातील घरांची रचना कोकणी पारंपारीक आहे.
FAQ
केळशी बीचला भेट देण्यासाठी सर्वात चांगली वेळ कोणती आहे?
केळशी बीचला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च (हिवाळा) हे महिने सर्वात्तम आहेत.
केळशी बीचवर तुम्ही कोणते उपक्रम करू शकता?
शांततेत वेळ घालवणे, फोटोग्राफी आणि समुद्र किनाऱ्यावर बसून सूर्यास्त पाहणे हे उपक्रम आपण केळशी बीच वर करू शकतो.
केळशी बीचवर पार्किंग उपलब्ध आहे का?
होय, केळशी बीचवर पार्किंगची सोय उपलब्ध आहे.
केळशी बीच पासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कोणते आहे?
केळशी बीच पासून सर्वात जवळचए रेल्वे स्टेशन चिपळूण या ठिकाणी आहे.
