कोकण भाग हा निसर्गसोंदर्य, समुद्रकिनारे किल्ले, मंदिरे आणि मालवणी खाद्य संस्कृती साठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकण भाग पसरलेला आहे. शांत आणि निवांत वेळ घालवण्यासाठी कोकण ट्रीप हा उत्तम मार्ग आहे. कोकणात फिरताना एका बाजूला हिरवेगार सह्याद्री पर्वत आणि दुसऱ्या बाजूला अथांग अरबी समुद्र दिसतो.
पुण्याहून कोकणात कसे जायचे?
रस्तामार्गाने
पुण्याहून कोकणात जाण्यासाठी स्वतःची कार किंवा बाईक हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. घाटरस्त्यातील निसर्ग अनुभवता येतो.
प्रमुख मार्ग
पुणे – ताम्हिणी घाट – माणगाव – काशीद – अलिबाग
पुणे- सातारा – कराड – कणकवली – मालवण – तारकर्ली
पुणे- चिपळूण – रत्नागिरी – गणपतीपुळे
रेल्वेमार्गाने
कोकण रेल्वेमुळे प्रवास अधिक सोयीस्कर झाला आहे. रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, सिंधुदुर्ग हे प्रमुख रेल्वे स्टेशन आहेत.
बसने
महाराष्ट्र शासनाच्या शिवशाही आणि खासगी बसेस पुण्याहून कोकणातील अनेक शहरांसाठी उपलब्ध असतात.
कोकण ट्रिपसाठी सर्वोत्तम वेळ
पावसाळ्यामध्ये (जून ते सेप्टेंबर)
पावसाळ्यामध्ये आपल्याला कोकण मधील हिरवागार निसर्ग पहायला मिळतो. तसेच पावसाळ्यामध्ये धबधबे आणि ढगांनी भरलेले घाट सुद्धा आपलीला पहायला मिळतात. कोकण मध्ये फिरण्यासाठी पावसाळा हा ऋतु उत्तम मानला जातो.
हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी)
कोकण मध्ये बीच फिरण्यासाठी हिवाळ्या मधील वातावरण उत्तम मानले जाते. त्या बीचवरती आपण वॉटर स्पोर्ट्सचा आंनद घेऊ शकता.
उन्हाळा (मार्च ते मे)
उन्हाळ्यामद्धे आंब्याचा हंगाम असतो. कोकणच्या देवगड मधील हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे.
कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे
काशीद बीच
महाराष्ट्र मधील रायगड जिल्ह्यामध्ये काशीद बीच आहे. हा काशीद बीच पुण्यापासून सुमारे १७० किलोमीटर अंतरावर आहे. शुभ्र वाळू स्वछ निळाशार पाणी आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
तसेच काशी बीच वरती नारळाच्या आणि सुपारीच्या बाद सुद्धा आहेत. या काशीद बीच वरती जेट स्की, बनाना राईड आणि बोटिंगसारखे इत्यादी वॉटर स्पोर्ट्सचा आनंद सुद्धा आपण घेऊ शकतो. संध्याकाळच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर फिरणे सूर्यास्त पाहणे आणि फोटो ग्राफी करणे इत्यादी गोष्टी आपण करू शकतो.
अलिबाग बीच
महाराष्ट्रा मधील रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग बीच असून तो पुण्यापासून सुमारे १४१ किलोमीटर अंतरावर आहे. स्वछ समुद्रकिनारा आणि काळी वाळू इत्यादी गोष्टींसाठी अलिबाग बीच प्रसिद्ध आहे अलिबाग बीच वरील कुलाबा किल्ला सुद्धा प्रसिद्ध आहे. अलिबाग बीच वरून सूर्यास्त अत्यंत सुंदर दिसतो. ओहोटीच्या वेळी कुलाबा किल्ल्यापर्यंत पायी जाण्याचा अनुभव घेता येतो. अलिबागमध्ये नारळपाणी, मालवणी फिश थाळी आणि स्थानिक समुद्री खाद्यपदार्थ खूप प्रसिद्ध आहेत.
गणपतीपुळे
महाराष्ट्रा मधील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणपती पुळे बीच असून तो पुण्यापासून सुमारे २८६ किलोमीटर अंतरावर आहे. हा गणपतीपुळे बीच स्वछ निळाशार समुद्र पांढरी वाळू आणि शांत वातावरण इत्यादी गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे. गणपतीपुळे बीचवर सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी उत्तम पर्यटन स्थळ आहे. सूर्यास्ताचे फोटो गणपतीपुळे बीच वरून अत्यंत सुंदर येतात. या गणपतीपुळे बीचवर आपण वॉटर स्पोर्ट्सचा सुद्धा आनंद घेऊ शकतो. या गणपतीपुळे बीचच्या आजूबाजूला नारळ आणि सुरूच्या झाडांच्या रांगा आहेत. येथील स्थानिक कोकणी आणि मालवणी खाद्यपदार्थ पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
जयगड किल्ला
महाराष्ट्रामधील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जयगड किल्ला वसलेला आहे. हा जयगड किल्ला पुण्यापासून सुमारे २६० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच जयगड हा किल्ला शास्त्री नदी आणि अरबी समुद्र यांच्या संगमावर आहे. आज सुद्धा जयगड किल्ल्याच्या उंच भिंती, बुरुज आणि प्रवेशद्वार भक्कम अवस्थेत पाहायला मिळतात. जयगड किल्ल्याजवळच प्रसिद्ध जयगड लाइट हाऊस आणि गणपतीपुळे मंदिर असल्यामुळे पर्यटक एकाच ट्रिपमध्ये अनेक ठिकाणांना भेट देतात. शांत वातावरण, इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी जयगड किल्ला हे कोकणातील एक उत्तम पर्यटनस्थळ मानले जाते.
देवगड
महाराष्ट्रा मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड पर्यटन स्थळ वसलेले आहे. ते पुण्यापासून सुमारे ३४८ किलोमीटर अंतरावर आहे. देवगड मधील हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहे. देवगडचा बीच हा स्वछ आणि शांत समुद्र किनारा आहे. समुद्र किनाऱ्यावरून सूर्यास्त अत्यंत सुंदर दिसतो. देवगड हा किल्ला समुद्र किल्ल्याजवळच उंच टेकडीवर आहे. या देवगड किल्ल्यावरून समुद्राचे दृश्य अत्यंत सुंदर दिसते.
मालवण
महाराष्ट्रा मधील मालवण हे पर्यटन स्थळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. पुण्यापासून मालवण ही पर्यटन स्थळ सुमारे ३९१ किलोमीटर अंतरावर आहे. मालवण हे पर्यटन स्थळ ऐतिहासिक किल्ल्यांसाठी आणि स्वादिष्ट मालवणी खाद्य संस्कृतीसाठी ओळखले जाते. मालवण हे पर्यटन स्थळ अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. मालवण जवळच सिंधुदुर्ग किल्ला आहे. हा सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला आहे. तसेच मालवणच्या जवळच तारकर्ली बीच आहे. मालवणची फिश थाळी, सोलकढी, कोम्बडी वडे आणि विविध सीफूड पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत. इतिहास, निसर्ग आणि स्वादिष्ट खाद्यसंस्कृतीचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी मालवण हे कोकणातील एक उत्तम पर्यटनस्थळ मानले जाते.
तारकर्ली बीच
महाराष्ट्रा मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तारकर्ली बीच असून हा पुण्यापासून सुमारे २०५ किलोमीटर अंतरावर आहे. तारकर्ली बीच हा वॉटर सपोर्ट साठी प्रसिद्ध आहे. मालवणजवळ वसलेला हा बीच कोकणातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक मानला जातो. निळाशार समुद्र, पांढरी वाळू आणि नारळाच्या झाडांनी वेढलेला किनारा पर्यटकांना शांत आणि सुंदर अनुभव देतो.
सिंधुदुर्ग किल्ला
महाराष्ट्रा मधील सिंधुदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्हया मध्ये असून तो पुण्यापासून सुमारे ३८० किलोमीटर अंतरावर आहे. हा सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला होता. हा सिंधुदुर्ग किल्ला मालवण किनाऱ्याजवळ अरबी समुद्रामद्धे वसलेले आहे.
किल्ल्याचे बांधकाम अतिशय मजबूत असून समुद्राच्या लाटांपासून संरक्षण मिळावे यासाठी मोठमोठ्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. किल्ल्याच्या भिंती, बुरुज आणि प्रवेशद्वार आजही भक्कम अवस्थेत पाहायला मिळतात. विशेष म्हणजे किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा जतन करून ठेवलेला आहे.
सावंतवाडी
महाराष्ट्र मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी हे एक पर्यटन स्थळ असून या ठिकाणाचे सावंतवाडी प्लेस हा ऐतिहासिक राजवाडा विशेष प्रसिद्ध आहे. या राजवाड्याची वास्तु कला आणि त्यातील पारंपारीक कलाकुसर पर्यटकांना आकर्षित करते. सावंतवाडीच्या परिसरामध्ये नारळ आणि सुपारीच्या बागा सुद्धा आहेत.
या सावंत वाडीच्या परिसरामध्ये कोकणी आणि मालवणी खाद्यसंस्कृतीचा देखील विशेष आनंद घेता येतो. फिश थाळी, कोंबडी वडे, सोलकढी आणि ताजे सीफूड हे येथील प्रसिद्ध पदार्थ आहेत.
सावंतवाडी हे विशेषतः हाताने बनवलेल्या लाकडी खेळण्यांसाठी आणि हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे. येथील कलाकार पारंपरिक पद्धतीने रंगीत लाकडी खेळणी आणि सजावटीच्या वस्तू तयार करतात. सावंतवाडी बाजारामध्ये या वस्तू खरेदी करण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते.
कोकणातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ
कोकण प्रदेश हा आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांइतकाच स्वादिष्ट खाद्यसंस्कृतीसाठीही प्रसिद्ध आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असल्यामुळे येथे विविध प्रकारचे ताजे मासे आणि सीफूड मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. मालवणी मसाल्यांचा खास वापर ही कोकणी खाद्यपदार्थांची मुख्य ओळख मानली जाते.
कोकणातील सर्वात लोकप्रिय पदार्थांमध्ये फिश थाळी, सुरमई फ्राय, बांगडा फ्राय आणि कोळंबी करी यांचा समावेश होतो. या पदार्थांसोबत सोलकढी दिली जाते, जी कोकम आणि नारळाच्या दुधापासून तयार केली जाते. सोलकढी पचनासाठी खूप उपयुक्त मानली जाते.
कोम्बडी वडे हा कोकणातील आणखी एक प्रसिद्ध पदार्थ आहे. मसालेदार चिकन करीसोबत गरम वडे खाण्याची चव खूप खास असते. तसेच मोदक, घावने, आंबोळी आणि फणसाचे पदार्थही येथे लोकप्रिय आहेत.
उन्हाळ्यात देवगड आणि रत्नागिरीचा हापूस आंबा संपूर्ण देशात प्रसिद्ध असतो. नारळ, कोकम आणि आंबा यांचा वापर कोकणी जेवणात मोठ्या प्रमाणात केला जातो. स्वादिष्ट चव, पारंपरिक मसाले आणि ताजे साहित्य यामुळे कोकणातील खाद्यसंस्कृती पर्यटकांना कायम आकर्षित करते.
कोकण ट्रिपसाठी अंदाजे बजेट
पुण्याहून कोकण ट्रिपचा अंदाजे खर्च
बाईक ट्रिप खर्च (२ व्यक्ती)
पेट्रोल खर्च (खर्च रुपायांमद्धे)
एकूण अंतर : अंदाजे १३०० ते १५०० किमी
पेट्रोल खर्च : ४,५०० ते ६,५००
राहण्याचा खर्च (रुपायांमद्धे)
होमस्टे / लॉज : ४,००० ते ७,०००
जेवण खर्च (रुपायांमद्धे)
मालवणी आणि स्थानिक जेवण : ३,००० ते ५,०००
पर्यटन आणि वॉटर स्पोर्ट्स (रुपायांमद्धे)
स्कुबा डायव्हिंग, बोटिंग : २,००० ते ५,०००
एकूण खर्च (रुपायांमद्धे)
१२,००० ते २२,०००
कार ट्रिप खर्च (४ व्यक्ती)
इंधन खर्च (रुपायांमद्धे)
पेट्रोल / डिझेल : ८,००० ते १४,०००
टोल आणि पार्किंग (रुपायांमद्धे)
२,००० ते ४,०००
हॉटेल खर्च
८,००० ते १५,०००
जेवण खर्च
६,००० ते १०,०००
पर्यटन खर्च
३,००० ते ₹८,०००
एकूण खर्च
२५,००० ते ₹५०,०००
(४ लोकांमध्ये वाटल्यास प्रति व्यक्ती ७,००० ते १२,०००)
बस आणि ट्रेन ट्रिप खर्च (प्रति व्यक्ती)
प्रवास खर्च
बस / ट्रेन तिकीट : ३,००० ते ६,०००
राहणे
३,००० ते ६,०००
जेवण
२,००० ते ४,०००
स्थानिक प्रवास
१,५०० ते ३,०००
एकूण खर्च
१०,००० ते १८,०००
अतिरिक्त खर्च
स्कुबा डायव्हिंग : ८०० ते ३,५००
सिंधुदुर्ग बोट सेवा : १०० त ५००
शॉपिंग आणि आंबे खरेदी : वैयक्तिक खर्च
फोटोग्राफी / ड्रोन शूट : अतिरिक्त खर्च
कोकण ट्रिपसाठी महत्त्वाच्या टिप्स
पावसाळ्यात घाटरस्त्यावर काळजीपूर्वक वाहन चालवा.
बीचवर प्लास्टिक टाकू नका.
वॉटर स्पोर्ट्स करताना सुरक्षा नियम पाळा.
उन्हाळ्यात सनस्क्रीन आणि टोपी वापरा.
ऑनलाइन हॉटेल बुकिंग आधीच करून ठेवा.
