मुंबईहून कोकण दर्शन: रोड ट्रिप गाइड आणि पॅकेज माहिती

मुंबईहून कोकण दर्शन हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय प्रवासांपैकी एक मानला जातो. एका बाजूला अथांग अरबी समुद्र, दुसऱ्या बाजूला हिरव्यागार सह्याद्री पर्वतरांगा आणि मधोमध वसलेली शांत गावं यामुळे कोकण प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करतो. शहरातील धावपळ, ट्रॅफिक आणि गोंगाटापासून दूर जाऊन काही दिवस शांत वातावरणात घालवायचे असतील, तर कोकण ट्रिप हा उत्तम पर्याय ठरतो. मुंबईपासून सुरू होणारा हा प्रवास निसर्ग, इतिहास, समुद्रकिनारे आणि स्वादिष्ट खाद्यसंस्कृतीचा एक सुंदर अनुभव देतो.

How do I get from Mumbai to Konkan? | मुंबई हून कोकणला कसे जायचे?

रेल्वे मार्गाने 

मुंबई हून कोकण दर्शनासाठी रेल्वे हा लोकप्रिय पर्याय आहे. मुंबई मधील सीएसएमटी, दादर, पनवेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गाड्या उपलब्ध असतात. रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी यांसारख्या रेल्वे स्थानकांवर उतरता येते. या रेल्वे मार्गाच्या प्रवास दरम्यान आपल्याला डोंगर बोगदे आणि निसर्गरम्य दृश्ये पाहायला मिळतात. 

एसटी बसने 

मुंबई सेंट्रल दादर आणि परळ येथून कोकणासाठी बसेस उपलब्ध असतात. रत्नागिरी गणपतीपुळे मालवण देवगड सावंतवाडी आणि गोवा मार्गावर नियमित बस सेवा असते. 

फेरीबोटने

गेट वे ऑफ इंडिया येथून मांडवा जेट्टी पर्यंत फेरी बोट ने जाता येते. अलिबागला आणि काशीद बीचला जाण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. या फेरी बोट ने जाताना समुद्राचा आनंद घेता येतो. 

स्वतःच्या वाहनाने

मुंबई -गोवा महामार्गाने कर किंवा बाइक ने प्रवास करता येतो. या महामार्गाने जात असताना रस्त्यात घाट समुद्रकिनरे आणि कोंकणी अनुभव घेता येतो. ग्रुप ट्रीप साथी हा उत्तम मार्ग समजला जातो. 

The best season to visit Konkan | कोकणला जाण्यासाठी सर्वोत्तम ऋतू

पावसाळा (जून ते सप्टेंबर)

पावसाळ्यामध्ये कोकण पूर्णपणे हिरवागार असतो. पावसाळ्यामध्ये घाट धबधबे आणि निसर्गाचे सोंदर्य अधिक खुळून दिसते.तसेच पावसाळ्यामध्ये आंबोली घाट रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसर खूप सुंदर दिसतो. परंतु पावसाळ्यामध्ये संयद्रा खवळलेला असू शकतो, त्यामुळे पावसाळ्यामध्ये समुद्राच्या किनाऱ्यावरती अॅक्टिविटी कमी असतात. तसेच मुसळधार पाऊस असेल तर प्रवास करताना काळजी घ्यावी लागते.  

हिवाळा (ऑक्टोबर ते मार्च)

हिवाळा हा ऋतु कोकण फिरण्यासाठी सर्वात उत्तम काळ मानला जातो. समुद्रकिनाऱ्यावर फिरणे वॉटर स्पोर्ट्स आणि पर्यटनासाठी हिवाळा हा ऋतु योग्य मानला जातो. स्कूबा डायव्हिंग आणि बोटिंगसाठी हा काळ उत्तम असतो.

उन्हाळा (एप्रिल ते मे)

उन्हाळा या ऋतु मध्ये कोकण मध्ये हवामान कोरडे गरम आणि दमट असते. समुद्र किनाऱ्यावरती दुपारी उष्णता जास्त जाणवते. 

Tourist attractions worth visiting in Konkan | कोकणमधील पाहण्यासारखे पर्यटन स्थळे 

अलिबाग बीच 

महाराष्ट्रा मधील रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग बीच आहे. हा अलिबाग बीच मुंबई पासून सुमारे  ९९.४ किलोमीटर अंतरावर आहे. या अलिबाग बीच वरती काली वाळू नारळाची झाडे थंड समुद्री हवा आणि शांत वातावरण इत्यादी गोष्टींमुळे अलिबाग बीच पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. या अलिबाग बीच वरच कुलाबा किल्ला आहे.  भरती-ओहोटीच्या वेळी या किल्ल्यापर्यंत चालत जाता सुद्धा येते. संध्याकाळच्या वेळी येथे दिसणारा सूर्यास्त अत्यंत सुंदर दिसतो. त्यामुळे फोटोग्राफी आणि समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात. अलिबाग बीच वर आपण घोडा राइड बोटिंग आणि वॉटर स्पोर्ट्स इत्यादी अॅक्टिविटी चा आपण आनंद घेऊ शकतो. तसेच अलिबागच्या समुद्रा लगतच स्थानिक खाद्यपदार्थांचे दुकाने सुद्धा आहेत. या दुकानामद्धे कोकणी सीफूड, भेळ, नारळपाणी आणि विविध स्नॅक्स मिळतात. समुद्रकिनाऱ्याजवळ अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे उपलब्ध असल्यामुळे पर्यटक आरामदायी मुक्काम करू शकतात.

काशीद बीच 

महाराष्ट्रा मधील काशीद बीच हा रायगड जिल्ह्यामध्ये असून तो मुंबई पासून सुमारे १२८ किलोमीटर अंतरावर आहे. अलिबाग आणि मुरुड यांच्या दरम्यान काशीद बीच वसलेला आहे. काशीद बीच वर आपण वॉटर स्पोर्टसचा आनंद घेऊ शकतो. या काशीद बीच च्या समुद्रालगत अनेक रेसॉर्टस आणि होम सते उपलब्ध आहेत. कशिद बीचवर स्थानिक कोकणी खाद्यपदार्थांचीही मजा घेता येते. ताजे सीफूड, सोलकढी आणि कोकणी जेवण पर्यटक विशेष आवडीने खातात.

गणपतीपुळे 

महाराष्ट्रामधील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणपती पुळे बीच आहे. गणपती पुळे हे गाव अरबी समुद्राच्या काठावर वसलेले आहे. मुंबई पासून गणपती पुळे बीच हा सुमारे ३३४ किलोमीटर अंतरावर आहे. या गणपती पुळे बीचच्या शेजारीच गणपतीचे मंदिर आहे. निलक्षर समुद्रा मऊ वाळू थंड समुद्री वारा पर्यटकांना आकर्षित करतो. गणपती पुळे बीचच्या जवळच आरे वारे बीच जाउगड किल्ला आणि थिबा पॅलेस हि देखील लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत. येथील कोकणी खाद्यसंस्कृतीही विशेष प्रसिद्ध आहे. सोलकढी, कोम्बडी-वडे, ताजे सीफूड आणि उकडीचे मोदक पर्यटक आवडीने खातात.

मालवण 

महाराष्ट्रामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण हे पर्यटन स्थळ प्रसिद्ध आहे. मालवण हे मुंबई पासून सुमारे ४७६ किलोमीटर अंतरावर आहे. मालवण हे शर अरबी समुद्राच्या काठावर वसलेले आहे.  शांत वातावरण आणि स्वछ समुद्रा किनाऱ्यांमुळे मालवण बीच पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. मालवण शहरामध्येच सिंधुदुर्ग किल्ला आहे. हा सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला आहे. या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज याच्या हाताचे आणि पायाचे ठसे आहेत. मालवण बीच वर आपण वॉटर स्पोर्ट्सचा आनंद सुद्धा घेऊ शकतो.  मालवणी मसाल्यातील ताजे मासे, कोळंबी, सुरमई फ्राय, सोलकढी आणि कोम्बडी-वडे पर्यटक आवडीने खातात. येथील घरगुती कोकणी जेवण खूप चविष्ट असते.

 तारकर्ली बीच 

महाराष्ट्रा मधील तारकर्ली बीच हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असून तो मुंबई  पासून सुमारे ४८१ किलोमीटर अंतरावर आहे. तारकर्ली बीच वरती आपण वॉटर स्पोर्ट्स चा आनंद घेऊ शकतो. समुद्रातील स्वच्छ पाण्यात रंगीबेरंगी मासे, प्रवाळ आणि सुंदर जलजीवन जवळून पाहण्याचा अनुभव पर्यटकांना रोमांचित करतो. याशिवाय बोटिंग, जेट स्की, बनाना राइड आणि डॉल्फिन सफारी यांचाही आनंद येथे घेता येतो. येथील मालवणी खाद्यसंस्कृतीही खूप प्रसिद्ध आहे. ताजे मासे, कोळंबी फ्राय, सोलकढी आणि कोम्बडी-वडे यांची चव पर्यटक आवडीने घेतात. समुद्रकिनाऱ्याजवळ अनेक रिसॉर्ट्स आणि होमस्टे उपलब्ध असल्यामुळे पर्यटकांना आरामदायी मुक्काम करता येतो.

सावंतवाडी 

महाराष्ट्रा मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंत वाडी शहर असून ते मुंबई पासून सुमारे ४८३ किलोमीटर अंतरावर आहे. कोकण आणि गोव्याच्या सीमेवर वसलेले हे ठिकाण आपल्या निसर्ग सोंदर्य लाकडी हस्तकला आणि शांत वातावरणा साठी प्रसिद्ध आहे. हिरव्यागार डोंगररांगा, तलाव आणि पारंपरिक कोकणी संस्कृती यामुळे सावंतवाडी पर्यटकांना आकर्षित करते. सावंतवाडी जवळच आंबोली घाट, समुद्रकिनारे आणि अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. त्यामुळे कोकण ट्रिपमध्ये सावंतवाडीला विशेष महत्त्व दिले जाते. येथे कोकणी आणि मालवणी खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येतो. सोलकढी, कोम्बडी-वडे आणि ताजे सीफूड पर्यटक आवडीने खातात.

Food Culture | खाद्यसंस्कृती

कोकणातील खाद्यसंस्कृती हि  महाराष्ट्रातील सर्वात स्वादिष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपरंपरांपैकी एक मानली जाते. समुद्रकिनारी प्रदेश असल्यामुळे येथे ताजे मासे आणि सीफूड मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. कोकणी जेवणात नारळ, कोकम, तांदूळ आणि पारंपरिक मसाल्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे येथील पदार्थांना खास चव आणि सुगंध मिळतो.

कोकणात सुरमई, बांगडा, पापलेट, कोळंबी आणि खेकडा यांसारखे विविध प्रकारचे मासे लोकप्रिय आहेत. फिश फ्राय, फिश करी आणि कोळंबी मसाला हे पदार्थ पर्यटक विशेष आवडीने खातात. मालवणी मसाल्यात बनवलेले पदार्थ तिखट आणि चविष्ट असतात. यासोबत मिळणारी सोलकढी ही कोकम आणि नारळाच्या दुधापासून बनवलेली पेयप्रकाराची डिश खूप प्रसिद्ध आहे. ती पचनासाठीही फायदेशीर मानली जाते.

कोकणातील शाकाहारी पदार्थांनाही विशेष महत्त्व आहे. उकडीचे मोदक, घावणे, आंबोळी, फणसाची भाजी आणि कोकम सरबत हे पदार्थ पारंपरिक पद्धतीने बनवले जातात. गणेशोत्सवाच्या काळात उकडीचे मोदक विशेष बनवले जातात.

कोकणातील गावांमध्ये घरगुती पद्धतीने बनवलेले जेवण पर्यटकांना खूप आवडते. ताजे मसाले, नारळाचा वापर आणि पारंपरिक पाककृती यामुळे कोकणी जेवणाचा स्वाद वेगळाच असतो. स्वादिष्ट सीफूड, घरगुती पदार्थ आणि पारंपरिक चवीमुळे कोकणातील खाद्यसंस्कृती पर्यटकांच्या कायम लक्षात राहते.

अंदाजे खर्च

मुंबईहून ४ ते ५ दिवसांची कोकण ट्रिप साधारणपणे प्रति व्यक्ती ८,००० ते २०,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते. हा खर्च प्रवासाचे साधन, हॉटेल, जेवण आणि वॉटर स्पोर्ट्सवर अवलंबून असतो. एसटी बस आणि बजेट हॉटेल निवडल्यास खर्च कमी होतो, तर रिसॉर्ट आणि खासगी वाहन वापरल्यास खर्च वाढू शकतो.

FAQ

1. मुंबईहून कोकणला जाण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता?

कोकण रोड ट्रिपसाठी NH-66 (मुंबई-गोवा महामार्ग) हा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. या मार्गावर समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे आणि निसर्गरम्य घाट अनुभवता येतात.

रोड ट्रिपसाठी सर्वोत्तम हंगाम कोणता?

ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वात उत्तम मानला जातो. या काळात हवामान आल्हाददायक असते आणि पर्यटनाचा आनंद अधिक घेता येतो

कुटुंबासोबत कोकण रोड ट्रिप सुरक्षित आहे का?

होय. रस्त्यांची स्थिती पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. मात्र पावसाळ्यात घाट आणि किनारी रस्त्यांवर वाहन सावधगिरीने चालवणे आवश्यक आहे.

कोकण रोड ट्रिपचे सर्वात मोठे आकर्षण काय?

SUV किंवा चांगल्या ग्राउंड क्लिअरन्सची कार अधिक सोयीची ठरते. मात्र बहुतांश प्रमुख रस्त्यांवर हॅचबॅक आणि सेडान वाहनांनीही आरामात प्रवास करता येतो.

कोकण दर्शनासाठी किमान किती दिवस ठेवावेत?

मुख्य पर्यटन स्थळे आरामात पाहण्यासाठी 4 ते 5 दिवस, तर संपूर्ण कोकण अनुभवण्यासाठी 7 ते 8 दिवसांचा कालावधी आदर्श मानला जातो.

Scroll to Top