कुटुंबासह कोकण ट्रिप: मुलांसाठी सर्वोत्तम ठिकाणे आणि टिप्स

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेला कोकण हा निसर्ग सोंदर्य स्वछ समुद्रकिनारे ऐतिहासिक किल्ले स्वादिष्ट खाद्य संस्कृती आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. कुटुंबा सह सुट्टी घालवण्यासाठी कोकण हा एक एक उत्कृष्ट पर्याय मानला जातो. विशेषतः लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी येथे अनेक सुरक्षित आणि मनोरंजक ठिकाणे उपलब्ध आहेत. समुद्रकिनाऱ्यावर खेळणे, बोटिंगचा आनंद घेणे, डॉल्फिन सफारी अनुभवणे आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे अशा अनेक गोष्टी मुलांना येथे अनुभवता येतात.

मुलांसाठी कोकणातील सर्वोत्तम ठिकाणे

गणपती पुळे 

महाराष्ट्रा मधील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती पुळे हे कोकणातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. गणपती पुळे येथील स्वछ आणि विस्तीर्ण समुद्र किनारा मुलांना वाळूत खेळण्यासाठी उत्तम जागा उपलब्ध करून देतो. प्रसिद्ध गणपती मंदिरामुळे धार्मिक आणि पर्यटनाचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो. समुद्रकिनाऱ्यावर चालणे, सूर्यास्त पाहणे आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे इत्यादी अॅक्टिविटी आपण गणपती पुळे बीच वर करू शकतो. 

तारकर्ली

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तारकर्ली हा समुद्रकिनारा त्याच्या स्वच्छ आणि निळ्याशार पाण्यासाठी ओळखला जातो. मुलांना येथे बोटिंग, डॉल्फिन सफारी आणि समुद्रकिनाऱ्यावरील विविध खेळांचा आनंद घेता येतो. सुरक्षित वातावरणामुळे कुटुंबांसाठी हे ठिकाण विशेष लोकप्रिय आहे.

मालवण आणि सिंधुदुर्ग किल्ला 

महाराष्ट्रा मधील मालवण हे कोकणातील एक महत्वाचे पर्यटन केंद्र आहे. समुद्राच्या मध्यभागी सिंधुदुर्ग किल्ला आहे. हा सिंधुदुर्ग  किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला आहे. बोटीतून किल्ल्यापर्यंत जाण्याचा प्रवास देखील मुलांना खूप आवडतो. 

देवगड 

महाराष्ट्राच्या कोकणमधील देवगड हे शहर सुंदर समुद्र किनारे आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला जर बीच वर शांत वातावरण कमी गर्दी आणि निसर्ग रम्य दृश्य पहायचे असेल तर देवगड बीच हा उत्तम पर्याय आहे. देवगडमधील हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहे. 

सावंतवाडी 

महाराष्ट्राच्या कोकण मधील सावंतवाडी हे निसर्ग प्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. सावंत वाडी मधील मोती तलाव राजवाडा आणि पारंपारीक लकडो खेळणी मुलांना विशेष आवडतात. सावंत वादीच्या स्थानिक बाजारपेठातून सुंदर हस्तकला वस्तु खरेदी करता येतात. 

काशीद बीच 

महाराष्ट्राच्या कोकण मधील रायगड जिल्ह्यामध्ये काशीद बीच असून तो स्वछ आणि शांत समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुलांना समुद्र किनाऱ्यावर खेळण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध असते. कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. 

अलिबाग 

अलिबाग हे पर्यटन स्थळ मुंबई पासून जवळ असून ते मुंबई पासून सुमारे ९८.८ किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रकिनारे, किल्ले आणि जलक्रीडा यामुळे मुलांना येथे भरपूर मनोरंजन मिळते. विकेंड ट्रिपसाठी अलिबाग हा उत्तम पर्याय आहे.

मुलांसोबत कोकण प्रवास करताना लक्षात ठेवण्याच्या टिप्स

योग्य ऋतू निवडा

कोकण फिरण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी सर्वात योग्य मानला जातो. या काळात हवामान आल्हाददायक असते आणि समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्याचा आनंद अधिक मिळतो. उन्हाळ्यात तापमान जास्त असू शकते, तर पावसाळ्यात निसर्गरम्य दृश्ये पाहायला मिळतात; मात्र काही ठिकाणी प्रवासात अडचणी येऊ शकतात.

सुरक्षिततेची काळजी घ्या. 

मुलांना समुद्रात खेळू देताना नेहमी त्यांच्यावर लक्ष ठेवा. समुद्राच्या खोल भागात जाणे टाळा आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. लाइफ जॅकेटचा वापर करणे सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.

आवश्यक वस्तू सोबत ठेवा.  

प्रवासादरम्यान सनस्क्रीन, टोपी, पाण्याच्या बाटल्या, औषधे, अतिरिक्त कपडे आणि मुलांसाठी आवश्यक स्नॅक्स सोबत ठेवा. उन्हापासून संरक्षणासाठी हलके आणि आरामदायक कपडे वापरणे फायदेशीर ठरते.

योग्य निवासस्थान निवडा. 

कुटुंबासाठी सुरक्षित आणि स्वच्छ हॉटेल किंवा होमस्टे निवडणे महत्त्वाचे आहे. समुद्रकिनाऱ्याजवळील निवासस्थान निवडल्यास प्रवासाचा वेळ वाचतो आणि मुलांना अधिक वेळ खेळण्यासाठी मिळतो.

स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या

कोकणातील सीफूड, सोलकढी, आंबोळी, घावणे, मोदक आणि हापूस आंबा हे प्रसिद्ध पदार्थ आहेत. मात्र मुलांसाठी अति तिखट पदार्थ टाळून हलका आणि ताजा आहार निवडणे अधिक योग्य ठरेल.

प्रवासाचे योग्य नियोजन करा

एका दिवसात खूप ठिकाणे पाहण्याऐवजी निवडक ठिकाणे पाहण्यावर भर द्या. त्यामुळे मुलांना थकवा जाणवत नाही आणि संपूर्ण प्रवासाचा आनंद घेता येतो.

Scroll to Top