कोल्हापूर आणि नाशिकहून कोकण दर्शन: संपूर्ण प्रवास मार्गदर्शिका

महाराष्ट्रा मधील कोकण प्रदेश हा निसर्ग सोंदर्य स्वछ समुद्र किनारे ऐतिहासिक किल्ले धार्मिक स्थळे आणि स्वादिष्ट खाद्य संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूर आणि नाशिक येथून कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा प्रवास अत्यंत आनंददायी ठरतो. या मार्गदर्शिकेत कोल्हापूर आणि नाशिकहून कोकणात कसे जायचे, कोणती ठिकाणे पाहायची आणि प्रवासासाठी कोणता काळ योग्य आहे याची माहिती दिली आहे.

Konkan Tour from Kolhapur | कोल्हापूरहून कोकण दर्शन | Konkan Tour from Kolhapur

कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील महत्त्वाचे शहर असून ते कोकणाशी रस्ते आणि रेल्वे मार्गांनी उत्तम प्रकारे जोडलेले आहे. कोल्हापूरहून गगनबावडा घाट किंवा आंबा घाट मार्गे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करता येतो.

प्रमुख मार्ग | Main Road

कोल्हापूर – गगनबावडा – कणकवली – मालवण

कोल्हापूर ते मालवण हा मार्ग कोकणातील सर्वात निसर्गरम्य प्रवासांपैकी एक मानला जातो. या मार्गावर सह्याद्रीच्या डोंगररांगा, हिरवेगार जंगल, घाटरस्ते आणि कोकणातील सुंदर गावे पाहायला मिळतात. कोल्हापूरहून गगनबावडा घाट मार्गे कणकवली आणि पुढे मालवणपर्यंतचा प्रवास सुमारे १६० ते १८० किलोमीटरचा असून साधारण ४ ते ५ तास लागतात. 

कोल्हापूर – आंबा घाट – राजापूर – रत्नागिरी

कोल्हापूर ते रत्नागिरी हा आंबा घाट मार्गे जाणारा प्रवास कोकणातील सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य मार्गांपैकी एक मानला जातो. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, घनदाट जंगल, वळणावळणाचे घाटरस्ते आणि कोकणातील हिरवाई यांचा आनंद या मार्गावर अनुभवता येतो. कोल्हापूरहून आंबा घाट, राजापूर मार्गे रत्नागिरीपर्यंतचे अंतर सुमारे १४० ते १६० किलोमीटर असून प्रवासासाठी साधारण ४ ते ५ तास लागतात.

Places worth visiting from Kolhapur | कोल्हापूरहून पाहण्यासारखी ठिकाणे

गणपती पुळे बीच आणि मंदिर 

महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यामधील गणपती पुळे बीच हे कोल्हापूर पासून सुमारे १५७ किलोमीटर अंतरावर आहे. गणपती पुळे बीच हा अरबी समुद्राच्या काठावर वसलेला आहे. स्वछ वाळू निळाशार समुद्र आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. गणपती पुळे बीच वर गणपतीचे मंदिर आहे. हे गणपतीचे मंदिर स्वयंभू असून ते भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. गणपती पुळेचा बीच सुमारे ३ ते ४ किलोमीटर लांबीचा आहे. या गणपतीपुळे बीच वरुन सूर्योदय आणि सूर्यास्त याचे दृश्य अत्यंत सुंदर दिसते. समुद्र किनाऱ्यावरून फिरणे फोटोग्राफी करणे आणि समुद्राच्या लाटांचा आनंद घेणे इत्यादी गोष्टी आपण  गणपती पुळेच्या बीचवर संध्याकाळच्या वेळेला करू शकतो. गणपतीपुळे बीच वर आपण वॉटर स्पोर्ट्स आनंद सुद्धा घेऊ शकतो. 

जयगड किल्ला

गणपती पुळे पासून जयगड किल्ल्यावरती कसे जायचे याचा मार्ग खाली दिला आहे. 

गणपती पुळे – भंडारवाडा – मालगुड – मालगुड बीच –  जयगड किल्ला 

महाराष्ट्रा मधील रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड किल्ला हा ऐतिहासिक सागरी किल्ला आहे. कोल्हापूर पासून जयगड  किल्ला हा सुमारे १७० किलोमीटर अंतरावर आहे. जयगड हा किल्ला शास्त्री नदी आणि अरबी समुद्र यांच्या संगमाजवळ उंच टेकडीवर वसलेला आहे. जयगड हा किल्ला समुद्र किनाऱ्याच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेला असून हा किल्ला कोकणातील महत्वाच्या  किल्ल्यांपैकी एक मानला जातो.

 किल्ल्याची भक्कम तटबंदी, बुरुज आणि प्रवेशद्वारे आजही सुस्थितीत पाहायला मिळतात. किल्ल्याच्या माथ्यावरून अरबी समुद्र, शास्त्री नदीचे मुख आणि परिसरातील हिरवागार निसर्ग यांचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते. गणपतीपुळ्यापासून जयगड किल्ला सुमारे २०  किलोमीटर अंतरावर आहे.

देवगड आणि देवगड किल्ला 

महाराष्ट्रा मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड हे पर्यटन स्थळ आहे. देवगड का ऐतिहासिक किल्ला असून तो कोल्हापूर पासून सुमारे १३४ किलोमीटर अंतरावर आहे. स्वछ समुद्रकिनारे ऐतिहासिक किल्ला दीपग्रह आणि जगप्रसिद्ध हापूस आंब्यासाठी देवगड हे पर्यटन स्थळ ओळखले जाते. 

किल्ल्यामध्ये जुन्या तटबंद्या, बुरुज आणि काही ऐतिहासिक अवशेष आजही पाहायला मिळतात. किल्ल्याजवळील दीपगृह हे देखील पर्यटकांचे आकर्षण आहे. येथून सूर्यास्ताचे दृश्य विशेष सुंदर दिसते. देवगड मधील समुद्रकिनारे तुलनेने कमी गर्दीचे असल्यामुळे शांत वातावरणाचा आनंद घेता येतो.

मालवण 

महाराष्ट्रामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे पर्यटन स्थळ कोल्हापूर पासून सुमारे १६३ किलोमीटर अंतरावर आहे. मालवण मधील बीच वर आपण वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकतो. स्वछ समुद्र किनारे ऐतिहासिक किल्ले स्वादिष्ट मालवणी खाद्य संस्कृती इत्यादी मालवण पर्यटन स्थळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. 

मालवण मध्ये सिंधुदुर्ग किल्ला आहे. हा सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला आहे. मालवणच्या बीच वरून सूर्यास्ताचे दृश्य अत्यंत सुंदर दिसते. स्वच्छ,पारदर्शक पाणी आणि पांढरी वाळू यामुळे हा किनारा पर्यटकांना लोकप्रिय आहे. याशिवाय रॉक गार्डन मालवण आणि चिवला बीच ही देखील लोकप्रिय ठिकाणे आहेत.

तारकर्ली बीच

महाराष्ट्रामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तारकर्ली बीच असून तो कोल्हापूर पासून सुमारे १६८ किलोमीटर अंतरावर आहे. तारकर्ली बीच वर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो. स्वच्छ, निळेशार आणि पारदर्शक समुद्राचे पाणी हे या बीचचे मुख्य आकर्षण आहे. पांढरी शुभ्र वाळू, नारळ आणि सुरूच्या झाडांच्या रांगा यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना शांत आणि प्रसन्न वातावरणाचा अनुभव मिळतो. समुद्रातील रंगीबेरंगी मासे आणि प्रवाळ खडक जवळून पाहण्याची संधी स्कुबा डायव्हिंगमुळे मिळते. या तारकर्ली बीचच्या शेजारीच देवबाग बीच आणि कारली नदी यांचा संगम पाहायला मिळतो.    

Konkan Tour from Nashik | नाशिकहून कोकण दर्शन

नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन केंद्र आहे. नाशिकहून कोकणात जाण्यासाठी मुंबई मार्गे किंवा इगतपुरी-घोटी-कसारा घाट मार्गे प्रवास करता येतो.

प्रमुख मार्ग

नाशिक – मुंबई – अलिबाग – मुरुड – श्रीवर्धन

नाशिकहून कोकण दर्शनासाठी  नाशिक – मुंबई – अलिबाग – मुरुड – श्रीवर्धन  हा मार्ग अत्यंत लोकप्रिय मानला जातो. या मार्गावर समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि कोकणातील नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेता येतो. एकूण प्रवास सुमारे ३५० ते ४०० किलोमीटरचा असून ८ ते १०  तासांत पूर्ण करता येतो.

नाशिक – मुंबई – चिपळूण – गणपतीपुळे – रत्नागिरी

नाशिक – मुंबई – चिपळूण – गणपतीपुळे – रत्नागिरी हा मार्ग कोकणातील निसर्ग, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे आणि ऐतिहासिक वारसा अनुभवण्यासाठी अत्यंत लोकप्रिय आहे. नाशिकहून मुंबईमार्गे कोकणात प्रवेश करताना सह्याद्री पर्वतरांगा, हिरवीगार दऱ्या आणि कोकणातील रमणीय दृश्ये पाहायला मिळतात. हा प्रवास सुमारे ४५० ते ५०० किलोमीटरचा असून साधारण ९ ते १० तास लागतात.

Kashid Beach | काशीद बीच 

महाराष्ट्रा मधील रायगड जिल्ह्यातील काशीद बीच हा नाशिक पासून सुमारे २६२ किलोमीटर अंतरावर आहे. अलिबाग आणि मुरुड यांच्या दरम्यान वसलेला हा बीच पांढऱ्या शुभ्र वाळू, स्वच्छ समुद्र आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. मुंबई आणि पुण्याजवळ असल्यामुळे येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते.काशीद बीच हा सुमारे ३ किलोमीटर लांबीचा आहे. समुद्र किनाऱ्यावरून सकाळच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावरून फेरफटका मारणे आणि संध्याकाळी सूर्यास्त पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. 

Alibaug Beach | अलिबाग बीच 

महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग बीच असून हा अलिबाग बीच नाशिक पासून सुमारे २३९ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईजवळ असल्यामुळे अलिबाग हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय वीकेंड पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. स्वच्छ समुद्रकिनारा, ऐतिहासिक वारसा आणि निसर्गसौंदर्य यांमुळे दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. अलिबाग बीचवर कुलाबा किल्ला आहे. हा कुलाबा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला आहे. हा सागरी किल्ला भरती-ओहोटीच्या वेळी विशेष आकर्षक दिसतो. ओहोटीच्या वेळी पर्यटक पायी चालतही किल्ल्यापर्यंत जाऊ शकतात.

Murud-Janjira Fort | मुरुड जंजीरा किल्ला 

महाराष्ट्रामधील जंजीरा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये असून तो नाशिक शहरापासून सुमारे २९२ किलोमीटर अंतरावर आहे. जंजिरा  हा शब्द अरबी भाषेतील  जझीरा  या शब्दापासून आला असून त्याचा अर्थ  बेट असा होतो. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या खडकाळ बेटावर हा किल्ला बांधण्यात आला आहे. सिद्दी शासकांनी या किल्ल्याची उभारणी केली होती. 

अनेक मराठा, पोर्तुगीज आणि इंग्रज आक्रमणांनंतरही हा किल्ला जिंकला गेला नाही, त्यामुळे तो  अजिंक्य किल्ला म्हणून ओळखला जातो. किल्ल्याची तटबंदी सुमारे ४० फूट उंच असून त्यावर अनेक बुरुज आहेत. किल्ल्यामध्ये राजवाड्यांचे अवशेष, मशिद, पाण्याची तळी आणि जुन्या तोफा पाहायला मिळतात. त्यातील कलाल बांगडी, चावरी आणि लांडा कसम या विशाल तोफा विशेष प्रसिद्ध आहेत. 

Harihareshwar | हरीहरेश्वर 

हरिहरेश्वर हे रायगड जिल्ह्यामधील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. हरीहरेश्वर बीच नाशिक पासून सुमारे ३२५ किलोमीटर अंतरावर आहे. प्राचीन मंदिर मुळे हरीहरेश्वरला दक्षिण काशी सुद्धा म्हणतात. श्रीवर्धन पासून हरीहरेश्वर हे १८ किलोमीटर अंतरावर आहे. हरीहरेश्वर मध्ये शिव विष्णु ब्रह्मा आणि पार्वती यांचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरा शेजारीच हरीहरेश्वर बीच आहे. हरीहरेश्वर बीचच्या समुद्रालगत नारळाची झाडे आहेत.  

Shrivardhan Beach | श्रीवर्धन बीच 

महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन बीच आहे. शांत वातावरण, मऊ वाळू, निळाशार समुद्र आणि किनाऱ्यालगत असलेल्या नारळ-सुपारीच्या बागांमुळे हा समुद्रकिनारा पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. मुंबई आणि पुण्याजवळ असल्यामुळे वीकेंड ट्रिपसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. येथील कोकणी खाद्यसंस्कृतीही पर्यटकांना आकर्षित करते. ताजे मासे, कोळंबी, सोलकढी आणि पारंपरिक कोकणी जेवणाचा आस्वाद येथे घेता येतो.

The best time to visit Konkan | कोकणात जाण्यासाठी सर्वोत्तम काळ

ऑक्टोबर ते फेब्रुवारी

कोकण पर्यटनासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. हवामान आल्हाददायक असते आणि समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्याचा आनंद घेता येतो.

मार्च ते मे

उन्हाळ्यात हवामान उष्ण असले तरी हापूस आंब्यांचा हंगाम असल्याने अनेक पर्यटक कोकणाला भेट देतात.

जून ते सप्टेंबर

पावसाळ्यात कोकण हिरवाईने नटलेला दिसतो. धबधबे आणि घाटमाथ्यावरील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी हा काळ उत्तम असला तरी मुसळधार पावसामुळे प्रवासात काही अडचणी येऊ शकतात.

प्रवासासाठी काही उपयुक्त सूचना 

पर्यटन हंगामात हॉटेल बुकिंग आगाऊ करा.

समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षिततेचे नियम पाळा.

पावसाळ्यात घाटरस्त्यांवर काळजीपूर्वक वाहन चालवा.

स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या.

ऐतिहासिक किल्ले आणि धार्मिक स्थळांना भेट देताना स्वच्छता राखा.

FAQ

कोल्हापूरहून कोकणला जाण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता आहे?

कोल्हापूर–गगनबावडा–कणकवली किंवा कोल्हापूर–अंबोली–सावंतवाडी हा मार्ग निसर्गरम्य आणि लोकप्रिय मानला जातो.

नाशिकहून कोकणला जाण्यासाठी कोणते मार्ग उपलब्ध आहेत?

नाशिक–मुंबई–अलिबाग किंवा नाशिक–पुणे–रत्नागिरी मार्गे कोकणला जाता येते.

कोल्हापूरहून कोकणला पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो?

गंतव्यस्थानानुसार साधारण ४ ते ८ तासांचा प्रवास लागू शकतो.

नाशिकहून कोकणला जाण्यासाठी किती वेळ लागतो?

कोकणातील ठिकाणानुसार साधारण ७ ते १२ तासांचा प्रवास लागू शकतो.

कोल्हापूर आणि नाशिकहून कोकणला जाण्यासाठी कोणते वाहतुकीचे पर्याय आहेत?

खासगी वाहन, एसटी बस, रेल्वे आणि टॅक्सी सेवा उपलब्ध आहेत.

Scroll to Top