धारेश्वर धबधबा | Dhareshwar waterfall Information In Marathi

महाराष्ट्रामधील  धारेश्वर धबधबा हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यात आहे. धारेश्वर धबधबा हा मार्लेश्वर मंदिर परिसरातील एक नयनरम्य धबधबा आहे. हा धबधबा सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगर रांगामधून कोसळणारा पावसाळ्यामध्ये प्रचंड वेगाने वाहतो. धारेश्वर धबधबा मार्लेश्वरच्या गुहा-मंदिरासमोर दिसणाऱ्या डोंगररांगांमध्ये आहे. 

देवरुख पासून सुमारे १८ किमी अंतरावर असलेले हे ठिकाण धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनाचा संगम मानले जाते. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग असून आसपास दाट जंगल, खोल दऱ्या आणि धुक्याने वेढलेले सह्याद्रीचे दृश्य अतिशय सुंदर दिसते.

पावसाळ्यात अनेक लहान धबधबे एकत्र येऊन मुख्य धारेश्वर धबधबा तयार करतात. उंचावरून फेसाळत कोसळणारे पाणी, हिरवाईने नटलेले उतार आणि सतत ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे हा परिसर फोटोग्राफरआणि निसर्गप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरतो. 

How do I get there? | कसे जायचे?

रेल्वे ने 

धारेश्वर धबधबा पासून जवळचे रेल्वे स्टेशन संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशन पासून आपण टॅक्सी, ऑटो ने किंवा प्रायवेट गाडीने जाऊ शकतो. 

रस्त्याने 

रत्नागिरी चिपळूण आणि संगमेश्वर या ठिकाणापासून महाराष्ट्राच्या शासनाची बस उपलब्ध आहे. 

धारेश्वर धबधब्यावर जाण्यासाठी सर्वात्तम काळ 

जून ते सप्टेंबर

या महिन्यांमध्ये धारेश्वर धबधब्याच्या ठिकाणी पाऊस असतो. 

ऑक्टोबर ते फेब्रुवारी

या महिन्यांमध्ये दहर्षवर धबधब्याच्या ठिकाणी भरपूर ठाणी असते. 

मार्च ते मे 

 या महिन्यांमध्ये धारेश्वर धबधब्यावरती कडक ऊन असते, तसेच धबधब्याचा पाण्याचा प्रवाह कमी झालेला असतो. 

FAQ

धारेश्वर धबधबा कुठे आहे?

महाराष्ट्रामधील धारेश्वर धबधबा हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यात आहे.

धारेश्वर धबधब्यावर जाण्यासाठी सर्वात्तम काळ?

धारेश्वर धबधब्यावर जाण्यासाठी जून ते सप्टेंबेर हे महिने सर्वात्तम आहेत.

Scroll to Top