Bhairavgad Fort Satara

Bhairavgad fort information in marathi | भैरवगड

सातारा जिल्ह्यामधील भैरव गड हा सातारा शहरापासून सुमारे १०० किलोमीटर तर पुण्यापासून सुमारे २१८ किलोमीटर अंतरावर आहे. भैरवगड हा डोंगरावर बांधलेला असून त्याच्या तिन्ही बाजूला दरी व तासलेल्या कडा आहेत. फक्त भैरव गडाची पूर्व बाजू सह्याद्री पर्वत रांगेला जोडलेली आहे. तसेच भैरव गड हे अरण अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळेच भैरव गडावर असणारी खेडे आणि वस्त्या गडाच्या बाहेर वास्तवास आहेत. २०१२ साली भैरव गडाच्या आजूबाजूचा परिसर टायगर रिजर्व म्हणून घोषित झालेला आहे. या भैरव गडावर भैरी देवी, तुळाई देवी, व वाघजाई देवी यांच्या २ ते ३ फूट उंचीच्या मूर्ती आहेत. या मंदिरामध्ये पर्यटकांची झोपण्याची सोय होऊ शकते. या मंदिरांच्या समोरच तुळशी वृंदावन आणि शंकराच्या पिंडीचा चबुतरा आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवलेला आहे.

How to go to Bhairavgad | भैरव गडावर कसे जायचे?

हेळवाकची रामघळ मार्गे

चिपळूण कऱ्हाड रस्त्यावरील कुभांर्ली घाट पार केल्यानंतर कोयना नगरच्या पाच ते सहा किलोमीटर अलीकडे हेळवाक गाव आहे. या हेळवाक गावा वरून मेंढेघरमार्गे कोंढावळे धनगरवाड्याला जायचे. या धनगर वाडच्या उजव्या बाजूला डोंगर आणि डाव्या बाजूला ओढा आहे. या ठिकाणाहून एका तासाच्या अंतरावर रामदास स्वामींचे वास्तव असलेले रामघळ लागते. या रामघळी मधूनच वर जाणारा रस्ता पकडल्यास भैरव गडावर जाता येते.

दुर्गवाडी मार्गे

चिपळूण-डेरवण-दुर्गवाडी अशी महाराष्ट्र शासनाची चिपळूण वरून सकाळी आठ वाजता बस आहे. हि बस एका तासामद्धे दुर्गवाडीला पोहोचते. दुर्गवाडीच्या गावाच्या शेजारी जंगल आहे आणि या जंगलामधून असणारी वाटेने थेट भैरव गडावर जाता येते. या वाटेने भैरव गडावर गेल्यास तीन ते चार तास लागतात. या वाटे मध्ये पाण्याची सोय नाही.  

गव्हारे मार्गे

दुर्गवाडी गावाच्या आधी गव्हारे गावाकडे जाणारा गाडीरस्ता लागतो. हि वाट मध्येच दुर्गवाडी गावातून येणाऱ्या वाटेस मिळते. पावसाळा सोडून इतर ऋतूत जीपने, कच्च्या रस्त्यावरून कोयनानगर – गव्हारे – पाथरपुंज मार्गे भैरवमंदिरापर्यंत जाता येते. तेथून भैरवगडापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास एकूण साडेतीन तास लागतात.

पाते किंवा गोवळ मार्गे 

चिपळूण पासून गोव्याच्या दिशेला जाताना सुयमरे २१ किलोमीटरच्या अंतरावर आसुर्डे फाटा लागतो. या फाटाच्या डाव्या बाजूचा रस्ता पाते गोवळ या गावापर्यंत जातो.  पाते गोवळ गावातून गडावर जाण्यासाठी गावकऱ्यांनी पायऱ्या बांधलेल्य़ा आहेत. गावाच्या वर असलेल्या पठारापर्यंत या पायऱ्यांनी जाता येते. पुढे खड्या चढणीच्या वाटेने २ तासात भैरवगडावरील मंदिरात पोहोचता येते. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास कमीत कमी दोन तास लागतात.


Bhairavgad Fort Trek | भैरव गडाचा ट्रेक करताना घ्यायची काळजी?

१. हेळवाकहून भैरवगड, पाथरपुंजकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर जंगल खात्याने चौकी बसवलेली आहे. त्यामुळेच वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या रस्त्याने जाता येत नाही. अभयारण्य क्षेत्रात चोरून प्रवेश केल्यास दंड आणि तुरुंगवासाची सजा होऊ शकते.

२. भैरवगडावर पावसाळ्यात जळवांचा त्रास फार मोठ्या प्रमाणात होतो. अंगाला चिकटलेल्या जळूवर मीठ किंवा हळद टाकल्यास ती अंगापासून सुटते.

३. भैरवगड ते प्रचितगड असा २ दिवसांचा ट्रेक करता येतो. या ट्रेकमध्ये रात्रीचा मुक्काम जंगलात तंबू ठोकून करता येतो. जंगलात वन्य पशूंचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. प्रचितगडच्या आजूबाजूचे अभयारण्य टायगर रिझर्व  घोषित केल्यामुळे वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय गडावर जाता येत नाही. 

Scroll to Top