ठाणे, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांच्या सीमेवर हरिश्चंद्र किल्ला आहे. याच हरिश्चंद्र किल्ल्याला अजस्त्र पर्वत असेही दुसरे नाव आहे. या हरिश्चंद्र किल्ल्याची उंची सुमारे ४६९१ फुट एवढी आहे. हा हरिश्चंद्र किल्ला अहमदनगर पासून सुमारे १४७ किलोमीटर अंतरावर आहे. या हरिश्चंद्र गडावर आदिवासी कोळी समाज यांच्या वस्त्या आहेत. कलचुरी राज वंशाच्या काळामध्ये हरिश्चंद्र किल्ला बांधला आहे. १७४७ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला जिंकला होता आणि कृष्णाजी शिंदे यांची किल्ल्याच्या किल्लेदार पदी निवड केली होती. या हरिश्चंद्र गडावरती करवंद, कारवीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती आढळतात. कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी सुद्धा आढळतात.
How to reach Harishchandragad Fort | हरिश्चंद्र गडावर कसे जावे?
हरिश्चंद्र हा अहमदनगरच्या सीमेवर असून इगतपुरी रेल्वे स्टेशन जवळचे असून ते सुमारे ४१ किलोमीटर अंतरावर आहे. या रेल्वे स्टेशन पासून आपण टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने हरिश्चंद्र गडावरती जावू शकतो. खिरेश्वर आणि पाचनई हे हरिश्चंद्र गडाच्या पायथ्या गावाचे नाव आहेत.
टोलार खिंडीमधून हरिश्चंद्र गडावरती जाण्यासाठी वाट आहे. या वाटेने ट्रेकणे हरिश्चंद्र गडावरती जाण्यासाठी तीन ते चार तास लागतात.
पाचनई मार्गाने सुद्धा हरिश्चंद्र गडावरती जाता येते. त्यासाठी तुम्हाला मुंबई – नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे लागेल. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी यावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते. राजुर – पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ किलोमीटर आहे. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ किलोमीटर आहे.
मुंबई – नक्षी रस्त्यामधील घोटी या गावी उतरावे लागेल. येथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी यावे लागेल. राजूर या गावामधून दोन मार्गाने हरिश्चंद्र गडावरती जाता येते. तसेच राजुर – पाचनई अशी बससेवा सुद्धा उपलब्ध आहे. पाचनई हे हरिश्चंद्र गडाच्या पायथ्या गावाचे नाव आहे. या पाचनई गावामधून हरिश्चंद्र गड चढण्यासाठी तीन ते चार तास लागतात.
हरिश्चंद्र गड चढण्यासाठी सावर्णे – बेलपाडा – साधले असा घाटमार्ग सुद्धा आहे. माळशेज घाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गाव लागते. या सावर्णे गावामधून बेलपाडा गावामध्ये जाण्यासाठी फाटा फुटतो. या फाट्यावरून २ – ३ किमी गेल्यावर उजव्या हाताला जाणार्या रस्त्याने बेलपाडा गावात पोहोचता येते. मुंबई – माळशेज रस्त्यावरून बेलपाड्या पर्यंत पायी चालत जाण्यास दिड ते दोन तास लागतात. बेलपाडा गावातून साधले घाट मार्गे हरिश्चंद्रगडावर जाता येते.परंतु हा मार्ग कठीण आहे. या ठिकाणाहून बेलपाडा या कोकण कड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या सहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेने हरिश्चंद्र गड गाठण्यासाठी दहा ते बारा तास लागतात.
Things to see on Harishchandragad Fort | हरिश्चंद्र गडावरील पाहण्यासारखे ठिकाणे
हरिश्चंद्रयाचे मंदिर
या मंदिराची तळा पासून उंची सुमारे १६ मीटर एवढी आहे. या मंदिर शेजारीच एक दगडी पूल आहे. य दगडी पुलाच्या खाली एक ओढा आहे. हा ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो. याच ओढ्याला मंगळगंगेचा उगम असेही म्हणतात. यानंतर ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत, तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार आहे. मंदिराच्या मागे असणार्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्यात जमिनी खाली एक खोली आहे.
केदारेश्वराची गुहा
मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते, यालाच केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कंबरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबांवर तोलली होती, पण सद्या स्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोली आहे .खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फाच्या पाण्यातून जावे लागते.
Taramati Peak | तारामती शिखर
तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. या तारामती शिखराची उंची साधारणत: ४८५० फूट एवढी आहे. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुंफेत गणेशाची सुमारे साडेआठ फूटाची भव्य आणि सुंदरमूर्ती आहे.याच गणेश गुहेच्या आजुबाजूला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते. गुहेच्या समोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाइनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखआहेत. माथ्यावर दोन ते तीन शिवलिंग आहेत.
Kokankada | कोकणकडा
कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण आहे. अर्ध्या किलोमीटर परिघाचा, अर्धगोल आकाराचा, हा कोकणकडाआहे. पायथ्यापासून कड्याची उंची सुमारे ४५०० फूट भरते. १८३५ मध्ये कर्नल साइक्सला येथे इंद्रव्रज दिसल्याची नोंद आहे. इंद्रव्रज म्हणजे गोलाकार इंद्रधनुष्य होय.
राहाण्याची सोय :
गडावरील गुहांमध्ये ५० ते ६० जणांची राहाण्याची सोय होते. तसेच पैसे दिल्यास राहाण्यासाठी तंबू उपलब्ध होतात.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय उपलब्ध आहे.
पाण्याची सोय :
पाणी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.
Best time to visit Harishchandragad fort | हरिश्चंद्र गडाला भेट कधी द्यावी?
हरिश्चंद्रगडाला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वोत्तम आहे कारण हवामान सुखद आणि ट्रेकिंगसाठी अनुकूल असते. जर तुम्हाला पावसाळ्यातील हिरवळ आणि आव्हानात्मक ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्ही जुलै ते ऑक्टोबर या काळातही भेट देऊ शकता, पण त्यासाठी तयारी ठेवावी लागते.
Harishchandragad Architecture | वास्तुरचना
हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. तो सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला असून, गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमींमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. या किल्ल्याचे ऐतिहासिक, धार्मिक आणि वास्तुरचनात्मक महत्त्व मोठे आहे.
हरिश्चंद्रगडाची वास्तुरचना बघताना आपल्याला प्राचीन काळातील स्थापत्यकलेचा उत्तम नमुना पाहायला मिळतो. किल्ल्याच्या माथ्यावर अनेक प्राचीन गुहा, मंदिरे आणि तलाव आहेत. यामध्ये मुख्य आकर्षण म्हणजे हरिश्चंद्रेश्वर मंदिर. हे मंदिर सातवहान किंवा चालुक्य काळातील असल्याचे मानले जाते. संपूर्ण मंदिर काळ्या दगडात कोरलेले असून त्यावर उत्कृष्ट कोरीव काम दिसून येते. मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून त्याच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे. मंदिराभोवती स्तंभयुक्त मंडप आहे, ज्यावर नक्षीकाम केलेले आहे.
मंदिराजवळच एक मोठा तलाव आहे, जो ‘सप्ततीर्थ पुष्करणी’ म्हणून ओळखला जातो. हा तलाव शिलाखंडांत कोरलेला असून त्याच्या बाजूंनी पायऱ्या आहेत. हे जलसाठा व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे. याशिवाय किल्ल्याच्या परिसरात अनेक गुहा आहेत, ज्या पूर्वी साधू-संतांसाठी निवासस्थान म्हणून वापरल्या जात होत्या. पाण्याच्या टंचाईच्या काळात वापरण्यासाठी काही टाक्यांचीही रचना केलेली आहे.
हरिश्चंद्रगडावरील सर्वात प्रसिद्ध आणि थरारक वैशिष्ट्य म्हणजे ‘कोकणकडा’. हा एक अर्धवर्तुळाकृती कडा असून तो खोल दरीकडे तोंड करून उभा आहे. त्याची भव्यता आणि त्यावरून दिसणारे सह्याद्रीचे विहंगम दृश्य हे वास्तुरचनेचा भाग नसले तरी निसर्गाने घडवलेले एक अद्भुत दृश्य आहे.
एकूणच हरिश्चंद्रगडाची वास्तुरचना ही प्राचीन भारतीय स्थापत्य, जलव्यवस्था आणि नैसर्गिक भूप्रदेश यांचा सुरेख संगम आहे. या गडावरून त्या काळातील लोकांच्या कौशल्याचा आणि दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. ही वास्तुशैली आजही अभ्यासकांना आणि पर्यटकांना आकर्षित करते.





