पुणे जिल्हयामधील जुन्नर या तालुक्यात जीवधन हा किल्ला आहे. घाटघर परिसरातील नाणे घाटच्या व्यापारी महामार्गाचे संरक्षण करण्यासाठी जीवधन हा किल्ला बांधला होता. जीवधन हा किल्ला सातवाहन यांच्या काळामध्ये बांधला होता. १६६० साली निजामशाहीची अस्ताला सुरवात झालेली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी राजे यांनी या निजामशाहीच्या अस्ताचा फायदा घेतला. शहाजी राजांनी निजामशाहीचा शेवटचा वारसदार मूर्तिजा निजाम हा होता. हा मूर्तिजा निजाम जीवधन या किल्लावरती केद होता. शहाजी राजे यांनी मूर्तिजा निजाम याला जीवधन गडावरील कैदेतून सोडवले. शहाजीराजे मूर्तिजा याला संगमनेरजवळील हडसर किल्ल्यावर (पेमगिरी) घेऊन गेले आणि त्याला निजामशहा म्हणून घोषित केले. यानंतर, शहाजीराजे स्वतः वजीर बनले. या जीवधन किल्ल्याचा दरवाजा कातळात कोरलेला आहे.
How to go to Jivdhan fort | जीवधन किल्ल्यावर कसे जायचे?
कल्याण-अहमदनगर मार्गे नाणेघाट चढून गेल्यानंतर एक पठार लागते. या पठारच्या उजव्या बाजूला एक वाट आहे. हि वाट नजरेसमोर ठेवूनच पुढे चालत जावे लागते. या वाटे मध्ये दोन ओढे लागतात. यानंतर या ठिकाणी उभी असलेली कातळ भिंतीला चिकतूनच पुढे जावे लागते. या वाटेच्या उजव्या बाजूला असणारी वाटेनेच गडाच्या पश्चिम दरवाज्याकडे जाऊ शकतो.
जुन्नर- घाटघर मार्गे आपण जीवधन किल्ल्यावरती सहज पोहचवू शकतो. हि वाट अत्यंत सोपी आणि सोयीस्कर आहे. फक्त एक-दोन ठिकाणी उभ्या खोदलेल्या पायऱ्या पार कराव्या लागतात.
Things to see on Jivdhan fort | गडावरील पाहण्यासारखे ठिकाणे
या जीवधन किल्ल्याच्या गडाचा आकार आयताकृती आहे. पश्चिम दरवाज्याने जीवधन किल्ल्यावरती गेल्यानंतर समोरच गजलक्ष्मीचे शिल्प आहे गावकरी याला कोठी असे म्हणतात. या गजलक्ष्मीच्या मंदिराजवळच पाण्याची टाके आहेत. या मंदिराच्या दक्षिणेस जीवाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. या किल्ल्याच्या आतील बाजूला पाच धान्य कोठारे आहेत. या धांन्याच्या कोठाऱ्यामद्धे कमलपुष्पे कोरलेली आहेत.इंग्रजांनी १८१८ मध्ये या जीवधन किल्ल्याला आग लावलेली होती. ती राख आजही या कोठारांमध्ये आढळते. या जीवधन किल्ल्याच्या जवळच नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड, कुकडेश्वराचे मंदिर, धसइचे छोटेसे धरण इत्यादी पर्यटन स्थळे आहेत.
Best time to visit Jivdhan fort | जीवधन किल्ल्याला कधी भेट द्यावी?
ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये जीवधन किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वात्तम आहेत. जून–सप्टेंबरया महिन्यांमध्ये जीवधन किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य असतो परंतु पावसाळ्यामुळे पायवाटा घसरड्या झालेल्या आहेत.
राहाण्याची सोय
गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय
जेवणाची सोय आपण स्वत:च करावी लागते.
पाण्याची सोय
गडावर बारमाही पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ
घाटघर गावातून जीवधनवर जाण्यास २ तास लागतात.





