स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झालेला पुरंदर हा किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेस असून तो पुण्यापासून सुमारे ३९ किलोमीटर तर मुंबई पासून सुमारे २०६ किलोमीटर अंतरावर आहे. पुरंदर या किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची सुमारे ४४७२ फुट एवढी आहे. पुरंदर हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला आहे. किल्ल्याभोवती खोल दऱ्या, उंच कडे आणि नैसर्गिक संरक्षक भिंती असल्यामुळे हा किल्ला लष्करी दृष्ट्या अत्यंत मजबूत मानला जात असे. पुरंदर या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली पत्नी महाराणी सईबाई यांची समाधी आहे. पुरंदरचा किल्ला पुरंदरचा तह या गोष्टी वरून खूप प्रसिद्ध आहे.
पुरंदर किल्ल्यावरील पाहण्यासारखे ठिकाणे
बिनी दरवाजा
पुरंदर किल्ल्याच्या पायथ्या गावाचे नाव नारायणपूर आहे. या नारायणपूर गावामधून पुरंदर किल्ल्यावर जाताना बिनी हा दरवाजा लागतो. या बिनी दरवाज्यामधून आत प्रवेश केल्यानंतर पहारेकरांच्या देवड्या लागतात. या देवड्या समोरच खंडकडा आहे. आत शिरल्यावर दोन रास्ते लागतात. एक सरळ आणि दूसरा डावीकडच्या बाजूला वळतो. तुम्ही सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर लष्करांच्या बरकी आणि काही बंगले दिसतात.
पुरंदरेश्वर मंदिर
लष्करांच्या बंगल्यापासून थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याला पुरंदरेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर महादेवाचे आहे. तसेच या मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फुटापर्यंतची मूर्ती आहे. हे पुरंदरेश्वराचे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशेली सारखे आहे. स्वराज्याचे पेशवे थोरले बाजीराव यांनी या पुरंदरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे.
रामेश्वर मंदिर
पुरंदरेश्वर मंदिरच्या मागील कोपऱ्यामद्धे पेशवे वंशाचे रामेश्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर असून या मंदिरापासून थोडे वरती गेल्यावर पेशव्यांच्या दुमजली वाद्यांचे अवशेष दिसतात. हा वाडा बाळाजी विश्वनाथ यांनी बांधला होता. या वाड्यापासून थोडे पुढे चालत गेल्यास दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते, तर दुसरी खाली भेरव खिंडीच्या दिशेने जाते.
दिल्ली दरवाजा
दिल्ली दरवाजा हा उत्तरभिमुख असून त्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. या दिल्ली दरवाज्यातून आत गेल्यानंतर आणखी एक दरवाजा दिसतो. डावीकडची वाट बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाते. या वाटेने पुढे चालत गेल्यास काही पाण्याच्या टाक्या निदरणास येतात.
खंड कडा
दिल्ली दरवाज्यामधून आत गेल्यानंतर एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो. या कड्याच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरुजावरून दरवाज्या पर्यंत आल्यानंतर तेथून पुढे एक वाट जाते.या वाटेच्या आजूबाजूला काही पाण्याच्या टाक्या लागतात.
पद्मावती तळे
मुरारबाजी यांच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते.
शेन्दऱ्या बुरूज
शेन्दऱ्या बुरूज हा पद्मावती तळाच्या पाठीमागे बाले किल्ल्याच्या वायव्येस आहे.
केदारेश्वर मंदिर
केदार दरवाज्यामधून आत थोडे पुढे चालत गेल्यानंतर केदारेश्वर मंदिर लागते. केदारेश्वर हे पुरंदरचे मूळ देवत आहे. या केदारेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार झालेला आहे. या केदारेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. या केदारेश्वर मंदिर समोरच एक दगडी दीपमाळ आहे. राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहिड आणि मल्हार गड या किल्ल्याचा सर्व परिसर या केदारेश्वर मंदिरामधून दिसतो.
वीर मुरारबाजी
बिनी दरवाज्यामधून आत उजवीकडे गेल्यावर समोरच मुरार बाजी यांचा पुतळा आहे. हा पुतळा १९७० मध्ये उभा केला आहे.
पुरंदर किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा
पुण्यामधून पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात प्रथम पुण्यामधून सासवड या गावी यावे लागते. सासवड मधून महाराष्ट्र शासनाची सासवड ते भोर किंवा सासवड ते नारायणपूर या दोन्ही बस ने तुम्ही नारायणपूर या गावी पोहचवू शकता. नारायणपूर हे गाव पुरंदर किल्ल्याच्या पायथ्या गावाचे नाव आहे. नारायणपूर गावामधून पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक गाडी रास्ता आणि दूसरा जंगलामधून जाणारी पायवाट आहे. या दोन्ही रस्त्यांनी आपल्याला पुरंदर किल्ल्याच्या बिनी दरवाज्यापर्यंत जाता येते.
पुरंदर किल्ल्यावर राहण्याची आणि जेवणाची सोय
पुरंदर या किल्ल्यावरती मिलीटरीचे बंगले आहेत. या बंगाल्यांमद्धे राहण्याची सोय होऊ शकते. परंतु त्यासाठी मिलिटरी अधिकाऱ्यांची परमिशन घ्यावी लागते. पुरंदर किल्ल्यावर जाताना ओळखपत्र घेऊन जावे. ओळख पत्रा शिवाय पुरंदर किल्ल्यावरती प्रवेश नाही. या पुरंदर किल्ल्यावरती जेवणाची सोय स्वताच करावी लागते. केदारेश्वर मंदिरामध्ये आपण जेवणासाठी बसू शकतो.
पुरंदर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व
पुंरंदरचा किल्ला पुरंदरचा तह म्हणून प्रसिद्ध आहे हा तह छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजा जयसिंग यांच्या मध्ये झाला होता. याच किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली बायको महाराणी सईबाई यांची समाधी आहे. तसेच स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म याच किल्ल्यावरती झाला होता.
