तोरणा किल्ला | Torna Fort information in Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६ व्या वर्षी तोरणा  किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून याला प्रचंडगड असे नाव देऊन स्वराज्याचा पाया रचला. हा तोरणा किल्ला पुण्यापासून सुमारे ५८ किलोमीटर अंतरावर तर मुंबई पासून सुमारे २१३ किलोमीटर अंतरावर आहे. या तोरणा किल्लेच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. या गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.तोरण हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे  १४०३ मीटर उंचीवर आहे. तोरणा हा किल्ला १३ व्या शतका मध्ये शैव पंथीयांनी बांधला असावा असा अंदाज आहे. तोरणा किल्ला ट्रेकिंग साथी मध्यम पातळीचा आहे.

Places to Visit on Torna Fort | तोरणा या किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट

तोरणा किल्ल्याच्या पायथ्या गावाचे नाव वेल्हे आहे. पुण्यापासून वेल्हे गावाचे अंतर सुमारे ५८ किलोमीटर आहे. पुणे-नसरापुर वेल्हे, पुणे-पानशेत-वेल्हे आणि पुणे-खानापूर-पाबे मार्गे वेल्हे अशा मार्गांनी तोरणा किल्ल्याच्या पायथ्या गावापर्यंत जाता येते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील वेल्हे-वेग्रे आळीमार्गे पाऊलवाटेने दीड दोन तासात बिनी दरवाज्यातून तोरण्यावर जाता येते. हा मार्ग इतर मार्गांपेक्षा सोपा आहे. अवघड ठिकाणी पुरातत्त्व खात्याने लोखंडी संरक्षक कठडे बसवले आहेत. त्यामुळे सहज चढउतार करता येते. 

तोरण किल्ल्यावर जाण्यासाठी दूसरा अजून एक रस्ता आहे. वेल्ह्य पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या भट्टी या गावामधून आहे. गावाच्या पश्चिमे कडे वाळणजाई दरवाजातून बुधला माचीवर थेट वाट जाते. 

Places to Visit on Torna Fort | तोरणा किल्ल्यावरील पाहण्यासारखे ठिकाणे

वेल्हे गावातून किल्ल्यावर जाताना प्रथम बिनी दरवाजा लागतो. या बिनी दरवाज्यामधून थोडे  पुढे चालत गेल्यावर कोठी दरवाजा लागतो. या कोठी दरवाज्याचा जवळच तोरणजाई देवीचे मंदिर आहे. त्याच्या पुढे दोन तलाव पाहायला ,मिळतात. तोरण किल्ल्याच्या माथ्यावर मेंगाई देवीचे मंदिर आहे. या मेंगाई मंदिराच्या जवळच तोरणेश्वराचे  मंदिर आहे. या तोरणेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला पाण्याच्या दोन टाक्या आहेत. तोरण या किल्ल्याच्या माथ्यावर आल्यानंतर आपल्याला झुंजार आणि विशाळा या माच्यावर जाता येते. तोरण किल्ल्याच्या पश्चिम टोकावर झुंजार बुरूज आहे. या झुंजार बुरुजाच्या जवळच तटबंदी असलेला गुप्त दरवाजा आहे. या दरवाज्यामधूनच झुंजार माचीवर जाता येते.  

How to get to Torna Fort? | तोरणा या किल्ल्यावर कसे जायचे? 

रेल्वे ने 

तोरणा किल्ल्यापासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन पुणे स्टेशन आहे. ते तोरणा किल्ल्यापासून सुमारे ५८ किलोमीटर अंतरावर आहे. या पुणे रेल्वे स्टेशन पासून आपण टॅक्सी किंवा प्रायवेट गाडीने जावू शकतो. 

विमानाने 

तोरणा किल्ल्यापासून सर्वात जवळचे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. किल्ल्यापासून हे विमानतळ सुमारे ६४ किलोमीटर अंतरावर आहे. 

The best month to visit Torna Fort | तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात्तम महिना

तोरणा  किल्ल्यावर जाण्यासाठी हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी) हा सर्वोत्तम काळ आहे, कारण हवामान आल्हाददायक आणि आकाश निरभ्र असते, ज्यामुळे ट्रेकिंग करणे सोपे होते. पावसाळा (जून ते सप्टेंबर) देखील चांगला पर्याय आहे, जिथे निसर्गाची हिरवळ आणि धबधबे दिसतात, पण पायवाटा निसरड्या असू शकतात, त्यामुळे अनुभवी ट्रेकर्ससाठी हा काळ उत्तम आहे; उन्हाळा (मार्च ते मे) टाळावा कारण खूप उष्णता असते. या महिन्यांमध्ये हवामान कोरडे असते. 

राहाण्याची सोय

गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय

जेवणाची सोय आपल्याला स्वत:लाच करावी लागते. 

पाण्याची सोय

मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारामही पाण्याचे टाके आहे.

FAQs

तोरणा किल्ल्याची कथा काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तोरणा हा किल्ला जिंकला होता. तोरण या किल्ल्याचे जुने नाव प्रचंडगड असे होते.

तोरणा किल्ल्याचा ट्रेक अवघड आहे का?

होय, तोरणा किल्ल्याचा तट्रेक अवघड आहे. कारण तोरणा हा किल्ला सर्वात उंच किल्ला आहे.


Scroll to Top