कोकण किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या लाटांशी छातीठोक उभा असलेला विजयदुर्ग किल्ला हा केवळ एक किल्ला नसून तो मराठा साम्राज्याच्या सागरी सामर्थ्याचे जिवंत प्रतीक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात वसलेला हा किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार धोरणाचा कणा मानला जातो. मजबूत बांधणी, अद्वितीय स्थापत्यशास्त्र आणि समृद्ध इतिहास यामुळे विजयदुर्ग किल्ला आजही इतिहासप्रेमी, ट्रेकर्स आणि पर्यटकांना आकर्षित करतो. विजयदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये असून तो सिंधुदुर्ग शहरापासून सुमारे ८३.५ किलोमीटर मुंबई पासून ३८२ सुमारे किलोमीटर तर पुण्यापासून सुमारे ३४१ किलोमीटर अंतरावर आहे. विजयदुर्ग हा किल्ला १७ एकरा मध्ये पसरलेला आहे. विजयदुर्ग या किल्ल्याला तीन तटबंदी आहेत. या तटबंदीला चिलखती तटबंदी असे म्हणतात, आणि या तटबंदीच्या तिन्हीही बाजू पाण्याने वेढलेल्या आहेत. तसेच विजयदुर्ग किल्ल्यामद्धे दोन भुयारी मार्ग आहेत. विजयदुर्ग या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक १३ डिसेंबर, इ.स. १९१६ या दिवशी घोषित करण्यात आलेले आहे.
विजय दुर्गावर कसे जायचे?
रेल्वे ने
कणकवली रेल्वे स्टेशन हे विजय दुर्गापासून जवळचे असून ते विजयदुर्गापासून सुमारे ६९.७ किलोमीटर अंतरावर आहे.या रेल्वे स्टेशन पासून आपण टॅक्सी ने किंवा प्रायवेट गाडीने विजयदुर्गावर जाऊ शकतो.
विमानाने
सिंधुदुर्ग या शहरामधील चिंपी विमानतळ हे विजय दुर्गापासून जवळचे असून ते विजयदुर्गापासून सुमारे ९३.१ किलोमीटर अंतरावर आहे.
बसने
देवगड आणि कणकवली या दोन शहरापर्यंत आपण महाराष्ट्र शासनाच्या बस ने येऊ शकतो. विजयदुर्ग हा देवगड पासून सुमारे २८.७ किलोमीटर अंतरावर, तर कणकवली शहरापासून सुमारे ७६ किलोमीटर अंतरावर आहे.
विजयदुर्गावर जाण्यासाठी सर्वात्तम महिना
विजयदुर्ग या किल्ल्यावर पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडतो, तर हिवाळ्यामध्ये सुद्धा हवामान थंड असते. उन्हाळ्या मध्ये विजय दुर्गवारील वातावरण उष्ण असते. त्यामुळे ऑक्टोमबर ते जानेवारी या महिन्यांमध्ये आपण विजयदुर्गावर जाऊ शकतो.




